चित्रपट निर्माते बोनी कपूर यांनी नोएडामध्ये नवीन फिल्म सिटी उभारण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. बोनी कपूरच्या बेव्यू प्रोजेक्ट्स आणि रिअल इस्टेट कंपनी भुतानी ग्रुपला नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ यूपी सरकारच्या फिल्म सिटी विकसित करण्याचे अधिकार मिळाले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बोनी कपूर यांच्यात आंतरराष्ट्रीय फिल्म सिटी तयार करण्यासाठी कागदपत्रांची देवाणघेवाणही झालीय. त्यामुळे प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
खरं तर योगी आदित्यानाथ यांची १ हजार एकर क्षेत्रात फिल्मसिटी उभारण्याची योजना आहे, त्यापैकी २२० एकर व्यावसायिक वापरासाठी ठेवण्यात येणार आहे. फिल्मसिटी टप्प्याटप्प्याने बांधली जाणार असून, विकासाच्या पहिल्या टप्प्यात ही फिल्म सिटी २३० एकरांमध्ये तयार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यमुना एक्सप्रेस वे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अथॉरिटी (YEIDA) अंतर्गत इंटरनॅशनल फिल्म सिटी प्रकल्पाची बहुप्रतीक्षित सुरुवात येत्या काही महिन्यांत सुरू होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रयत्नातून नियुक्त केलेल्या भूखंडावर उत्खनन आणि सीमांकन यांसारख्या महत्त्वाच्या हालचालीही लवकरच सुरू होणार आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा