मुंबई : भाजपाने ‘महाविजय संकल्प २०२४’ अभियान जाहीर केले असून, लोकसभेसाठी ४२, तर विधानसभेसाठी २०० जागांचे लक्ष्य निश्चित केले आहे. भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीत लढून हा विजय संपादन करतील, असे जाहीर करण्यात आले असले, तरी भाजपाचे बाहू स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी फुरफुरत असून, हा बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी धोक्याचा इशारा आहे.

भाजपा व शिवसेनेने महाराष्ट्रात २०१४ च्या विधानसभा निवडणुकांचा अपवाद वगळता ३० वर्षे युतीत निवडणुका लढविल्या. विधानसभा जागावाटपाचा विचार करता शिवसेना सुरुवातीला १७१ व भाजपा ११७ आणि लोकसभेसाठी भाजपा २६ व शिवसेना २२ जागा लढवीत होते. मात्र, शिवसेनेच्या विधानसभेच्या जागा युतीच्या जागावाटपात कमी होऊन २०१९ मध्ये १२६ पर्यंत घसरल्या. युती तुटली, तेव्हा भाजपाला विधानसभेत १२२, तर २०१९ मध्ये युतीत लढल्यावर १०५ जागा मिळाल्या होत्या.

News About Eknath Shinde
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांची भेट, महायुतीत एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा दुसरा अंक?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
nashik BJP rebels girish mahajan
बंडखोरांचा पुन्हा भाजपमध्ये प्रवेश अवघड
Eknath Shinde , Rickshaw ,
VIDEO : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हाती पुन्हा रिक्षाचे स्टेरिंग, शिंदे यांनी दिला जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा
dcm eknath shinde loksatta news
“सर्वसामान्यांसाठी राज्यात परवडणारे घरी उभारण्याचा आमचा अजेंडा”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Eknath Shinde Group , Pratap Sarnaik,
स्बळाच्या नाऱ्यानंतर शिंदे गटाकडून ठाकरे गटावर टिकेचे बाण
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
Eknath shinde
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीचे संकेत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत लढल्या जाणार

हेही वाचा – नवे राज्यपाल कोण आहेत?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरकार राज्यात सत्तेवर असले तरी वरचष्मा भाजपाचा असून केंद्रातील सत्तेमध्ये शिंदे गटाला अद्याप वाटा मिळालेला नाही. भाजपा व शिवसेनेची युती असतानाही निवडणुकांमध्ये एकमेकांचे उमेदवार पाडले गेल्याचे आरोप झाले आणि भाजपाने उद्धव ठाकरे यांचे खच्चीकरणही केले. शिंदे यांच्याकडे सध्या ४० आमदार व १३ खासदार असून, भाजपा व शिंदे गटाचे जागावाटप जाहीर झालेले नाही. शिंदे गटाला लोकसभेसाठी १३ – १४ आणि विधानसभेसाठी ६० – ७० जागांहून अधिक जागा भाजपाकडून जागावाटपात मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे, भाजप लोकसभेसाठी ३४ आणि विधानसभेसाठी २०० हून अधिक जागा लढविण्याची शक्यता आहे.

भाजपाचे महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळविण्याचे उद्दिष्ट असून, १२२ पर्यंतचा टप्पा २०१४ मध्ये गाठला होता. भाजपाने युतीत २०० जागा मिळविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असले, तरी भाजपाला १३०-१४० जागा मिळतील, असे नियोजन करण्यात येत आहे. अपक्ष व इतरांच्या मदतीने भाजपाला स्वबळावर सत्ता मिळण्याची परिस्थिती निर्माण झाली की बाळासाहेबांच्या शिवसेनेला सत्तावाटपात फारसा अधिकार उरणार नाही. सध्या शिंदे गटात असलेले ४० आमदारही पुन्हा निवडून येण्याची शक्यता नाही व ही संख्या कमी होणे भाजपच्या पथ्थ्यावर पडणार आहे.

हेही वाचा – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; नव्या राज्यपालांचे नाव आले समोर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नाशिक येथील प्रदेश कार्यकारिणीत बोलताना ‘ शत प्रतिशत भाजपा’च्या घोषणेचा जुना संदर्भ आपल्या भाषणात दिला, तरी तो बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी पुरेसा सूचक असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे भाजपा श्रेष्ठींशी सध्या चांगले संबंध असल्याने तेच २०२४ नंतर पुढील पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी राहतील आणि फडणवीस यांना लवकरच केंद्रात पाठविले जाईल, अशा राजकीय कंड्या सध्या एका गटाकडून पिकविल्या जात आहेत. भाजपने ३० वर्षे युतीत राहिलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शकले केली. तेव्हा शिंदे यांचीही ताकद २०२४ नंतर फार वाढणार नाही, उलट कमी होईल, याची काळजी भाजपाकडून घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच भाजपने लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघात तयारी सुरू केली असून, मतदान केंद्र निहाय कार्यकर्त्यांवर जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी चांगले संबंध असलेल्या व फडणवीस यांचे विश्वासू ,माजी संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांच्याकडे लोकसभा व विधानसभा निवडणुकीची पूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपा युतीची भाषा बोलत असला तरी कमळ चिन्हावर अधिकाधिक उमेदवार निवडून आणून स्वबळावर सत्ता मिळविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे, भाजपाचे महाविजय संकल्प २०२४ अभियान हा बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी सूचक इशारा असून, त्यांना भविष्यात आपले महत्व टिकवून ठेवण्यासाठी व राजकीय भवितव्यासाठी झगडावे लागणार आहे.

Story img Loader