सुहास सरदेशमुख

छत्रपती संभाजीनगर : ध्रुवीकरणाच्या टोकावर उभे ठाकून मतविभाजनाचे गणित मांडत ‘एमआयएमचा पतंग’ २०१९च्या लोकसभा निवडणुकीत उंच उडाला. खासदार म्हणून इम्तियाज जलील निवडून आले. ‘पतंग’ ही मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन म्हणजे एमआयएमचे निवडणूक चिन्ह. राज्याच्या राजकारणात वापरले जाऊ लागले. प्रचारात हिरव्या रंगाचा पतंग वापरणाऱ्या या पक्षाच्या एकगठ्ठा मतांचा धसका मुख्य प्रवाहातील ‘धर्मनिरपेक्ष’ पक्षांना जाणवू लागला. त्याचे कारण एमआयएमने वंचित बहुजन आघाडीबरोबर केलेली युती. आता ती युती तुटली आहे. त्याचवेळी एमआयएमच्या भाजपला हरविण्याच्या भूमिकेलाही अन्य पक्षांकडून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. न मिळालेले राजकीय मित्र आणि मतविभाजनाच्या खेळावर असणाऱ्या अवलंबित्वामुळे आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार इम्तियाज जलील यांचा राजकीय मार्ग खडतर होईल असे मानले जात आहे.

Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
devendra fadnavis, public rally, nagpur west assembly constituency
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही पाकिस्तानमधून उमेदवार…”
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’

शहराचे औरंगाबाद हे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्यानंतर एमआयएमचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर वंदे भारत रेल्वे कार्यक्रमाच्या उद्घाटनात भाजप आणि एमआयएमचे कार्यकर्ते घोषणाबाजीसाठी समोरासमोर आले. कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याची नाराजी खासदार जलील यांनी आवर्जून व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांमध्ये विरोध करताना संघटनही व्हावे, असा कार्यक्रम एमआयएमने आयोजित केला नाही. संघटनात्मक पातळीवर अन्य समाजाला जोडून घेण्याचे खासदार जलील यांचे प्रयत्नही धर्मनिरपेक्ष होऊ शकले नाही. किराडपुरा भागात राममंदिरात दंगलीच्या वेळी ते आवर्जून गेले होते. त्यांच्यामुळे वाढलेला तणाव काहीअंशी निवळला. विशेषत: आरोग्याच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांनी केलेला युक्तिवाद महत्त्वपूर्ण मानला जातो. मात्र, राजकीय व्यासपीठांवर खासदार इम्तियाज जलील आणि त्यांचा एमआयएम हा पक्ष ‘धार्मिक’च राहिला. जलील यांना २०१९ च्या निवडणुकीत तीन लाख ८८ हजार ७८४ मते मिळाली होती. सर्वाधिक मते औरंगाबाद मध्य मतदारसंघातून ९९ हजार ४५० मते त्यांनी घेतली होती.

आणखी वाचा-आमदार विश्वजित कदम यांची कोंडी करण्याची भाजपची व्यूहरचना

औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून ९२ हजार ३४७ मते त्यांना मिळाली. ग्रामीण भागातील वंचित बहुजनची मतेही खासदार जलील यांच्या पारड्यात पडली होती. गंगापूर, वैजापूर आणि कन्नड या विधानसभा मतदारसंघातून अनुक्रमे ५६ हजार २३, ३५ हजार ४६२ आणि ३४ हजार २६३ एवढी मते त्यांनी घेतली होती. एकूण लोकसभा मतदारसंघातील रचनेनुसार २१.८ टक्के मतदान मुस्लिम आहे, तर १९ टक्क्यांहून अधिक मतदान एससी-एसटी प्रवर्गातील असल्याची आकडेवारी राजकीय पक्षांनी आता गोळा करून ठेवली आहे.

आणखी वाचा-बीडमधील ठाकरे गटाच्या अंतर्गत वादात नेतृत्वाचे सुषमा अंधारे यांनाच बळ

शिवसेना-भाजपा युतीत लढत असताना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना तीन लाख ८४ हजार ५५० मते मिळाली होती. पण मराठा उमेदवार अशी प्रतिमा निर्माण करून ट्रॅक्टरच्या चिन्हावर निवडणूक लढविणारे हर्षवर्धन जाधव यांनाही दोन लाख ८३ हजार ७९८ मते मिळाली होती. मतविभाजनाचा फायदा खासदार जलील यांना उचलता आला, पण तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या मतांची बेरीजही त्यांच्या विजयात समाविष्ट होती. आता वंचित बहुजनची मते खासदार जलील यांच्या बाजूने असणार नाही. ‘जय भीम-जय मीम’ असा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी एमआयएमने केलेले प्रयत्न कमालीचे तोकडे होते. त्यामुळे खासदार जलील यांचे राजकीय भवितव्य ‘खडतर प्रवास’ या दोन शब्दांभोवती वर्णावे लागतील. लोकसभा मतदारसंघात एमआयएमचे उतरणे भाजपासाठी चांगले असते, अशी कबुली केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अलिकडेच हसत हसत दिली होती.