माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या इस्त्रायलमधील एका कंपनीने जगभरातील ३० निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा धक्कादायक अहवाल उघडकीस आला आहे. विविध माध्यमसमूहातील ३० पत्रकारांनी मागील आठ महिने संबंधित इस्त्रायली कंपनीवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर संशोधन केलं. त्यानंतर या कंपनीने जगातील ३० निवडणुकांमध्ये फेरफार केल्याचा धक्कादायक अहवाल सादर केला. हा अहवाल समोर आल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला. भारतातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी भाजपानेही परदेशी हॅकर्सचा वापर केला का? असा सवाल काँग्रेसने गुरुवारी विचारला. संबंधित इस्त्रायली हॅकर्स कंपनीचं नाव ‘जॉर्ज’ (JORGE) आहे. कंपनीच्या सॉफ्टवेअरचे नाव ‘AIMS’ अर्थात Advance Impact Media Solution असं आहे. या कंपनीने सोशल मीडियावर हॅकिंग करून आणि चुकीची माहिती पसरवून जगभरातील ३० पेक्षा अधिक निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा दावा आहे.

हेही वाचा- Nagaland Election : नागालँड जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली, जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस

हा अहवाल प्रसारित झाल्यानंतर काँग्रेस मीडिया युनिटचे प्रमुख पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर निशाणा साधला. “भाजपा आणि मोदी सरकारने भारतातील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी परदेशी हॅकर्सचे नेटवर्क वापरले का?” असा सवाल त्यांनी विचारला. त्यांनी ‘जॉर्ज’ इस्त्रायली कंपनीची तुलना भाजपाच्या आयटी सेलशी केली. तसेच केंब्रिज अॅनालिटिका आणि पेगासस व्हायरसचा उल्लेख करत भाजपावर टीकास्त्र सोडलं.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या वनमंत्र्याची जीभ घसरली; भरसभेतून युवकाला शिवीगाळ, म्हणाले…

खरं तर, ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ आणि फ्रान्समधील ‘द ले माँडे’सह अन्य ३० माध्यमसमूहाच्या शोध पत्रकारांनी इस्त्रायली कंपनीचा पर्दाफाश केला. त्यांनी संबंधित कंपनीला अहवालामध्ये “टीम जॉर्ज” असं संबोधले. कंपनीची काम करण्याची पद्धत आणि त्यांच्या क्षमतांबद्दल माहिती गोळा करण्यासाठी या पत्रकारांच्या टीमने बनावट ग्राहक पाठवले. या अहवालानुसार, ही कंपनी ताल हानान (वय-५०) नावाच्या व्यक्तीकडून चालवली जाते. हानान हा इस्रायली स्पेशल फोर्समध्ये ऑपरेटिव्ह म्हणून काम करत होता. तो सध्या “जॉर्ज” हे टोपणनाव वापरून काम करतो. मागील दोन दशकांहून अधिक काळ विविध देशांतील निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचा त्याच्यावर संशय आहे. त्यामुळे तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता, असंही या अहवालात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israeli firm team gorge aims manipulated more than 30 elections congress bjp it cell rmm