Delhi Assembly Elections: दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आम आदमी पक्ष सलग चौथ्यांदा सत्ता मिळविणार? तसेच भाजपा दिल्ली काबीज करणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान दिल्लीतील मुस्लीमबहुल मतदारंसघात मुस्लीम मतदारांमध्ये काय भावना आहे? याबद्दल द इंडियन एक्सप्रेसने एक लेख प्रकाशित केला आहे. दरम्यान २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. या दंगलीला आता पाच वर्ष झाली आहेत. मात्र या दंगलीवेळी आम आदमी पक्षाने मौन बाळगले होते. याबद्दल स्थानिक लोक आजही नाराज आहेत. ‘आप’ने त्यावेळी काहीच केले नाही, तरी आम्हाला त्यांना मतदान करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे येथील मतदार सांगत आहेत. राजधानी दिल्लीत इतर अनेक राजकीय पक्ष समोर असले तरी ‘आप’शिवाय पर्याय नसल्याची अजब परिस्थिती लोकांसमोर आहे.

ईशान्य दिल्लीतील मुस्तफाबाद येथील रिकाम्या असलेल्या अल-हिंद रुग्णालयातील डॉ. अन्वर यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, भाजपाला जर बहुमत मिळाले तर ते सत्ता स्थापन करतील, अशी मुस्लीम मतदारांमध्ये भीती आहे. त्यामुळे ते ‘आप’ला मतदान करतील. पाच वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीवेळी ‘आप’ निष्क्रिया राहिल्याची चीड नागरिकांमध्ये नक्कीच आहे. पण त्यालाही आता बराच काळ लोटला आहे. आता आमच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.

delhi assembly elections 2025
लालकिल्ला : दिल्ली भाजपसाठी आणखी प्रतिष्ठेची!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
The proposed Bill had proposed to change the composition of Waqf Boards in states. (Photo: X/jagdambikapalmp)
Waqf Borad : “वक्फ विधेयकामुळे मुस्लिमांचे हक्क कमकुवत होतील आणि…”, विरोधी पक्षातील सदस्यांची ‘त्या’ अहवालावर नाराजी
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Image Of PM Narendra Modi, Home Minister Amit Shah An Former CM Uddhav Thackeray
BJP : “मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवणाऱ्या व्यक्तीला…”, १९९३ च्या दंगलीवरून भाजपा, उद्धव ठाकरेंमध्ये जुंपली
Rahul Gandhi list on dishonest people
‘आप’च्या बेईमानांच्या यादीत राहुल गांधींचाही समावेश, भाजपानंतर आता थेट काँग्रेसही लक्ष्य

हे वाचा >> Arvind Kejriwal House: अरविंद केजरीवाल यांच्या घराची गोष्ट; १९४२ चं बांधकाम आणि ३३.६६ कोटींचा दुरुस्ती खर्च!

दिल्ली विधानसभेच्या ७० मतदारंसघापैकी सात मतदारसंघात मुस्लीम मतदारांचे वर्चस्व आहे. मुस्तफाबाद, चांदणी चौक, मटिया महाल, बाबरपूर, सीलमपूर, ओखला आणि बल्लीमारान हे ते सात मतदारसंघ आहेत. तथापि या मतदारसंघात पक्षाचे मताधिक्य कमी झाल्याचे आप नेतेही मान्य करतात. मागच्या निवडणुकीसारखा आम्हाला प्रतिसाद मिळणार नाही, तरीही आम्ही सातही मतदारसंघात विजय मिळवू, असेही एका आप नेत्याने सांगितले. भाजपाने मात्र या सात मतदारसंघात अद्याप उमेदवार घोषित केलेले नाहीत.

मुस्तफाबाद

२०१५ च्या निवडणुकीत ‘आप’ला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. ज्या तीन मतदारसंघात ‘आप’चा पराभव झाला, त्यापैकी मुस्तफाबाद हा एक मतदारसंघ होता. भाजपाचे उमेदवार जगदीश प्रधान यांनी याठिकाणी विजय मिळविला होता. तर २०२० च्या निवडणुकीत ‘आप’च्या हाजी युनूस यांनी तब्बल ५३.२ टक्के मते घेऊन विजय मिळविला. प्रधान ४२.०६ टक्के मते मिळवून दुसऱ्या स्थानावर राहिले. तर काँग्रेसचे उमेदवार अली मेहदी २.८९ टक्के मतदानासह तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यामुळे यावेळीही भाजपाला दूर ठेवण्याचा प्रयत्न मतदार करतील, असे सांगितले जाते.

विशेष म्हणजे, यावेळी एमआयएमनेही दिल्ली विधानसभेच्या दहा मतदारसंघात निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मुस्तफाबादमद्ये त्यांनी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसैन यांना रिंगणात उतरवले आहे. दिल्लीतील दंगलीप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते, तसेच काही काळ त्यांनी तुरुंगातही घालवला होता. काँग्रेसने पुन्हा एकदा मेहदींना तर ‘आप’ने यावेली आदील अहमद खान यांना तिकीट दिले आहे.

बाबरपूर

शेजारच्याच बाबरपूर मतदारसंघातही ४५ टक्के मुस्लीम मतदार आहेत. ‘आप’ने इथे पुन्हा एकदा गोपाल राय यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने ‘आप’चे सीलमपूरचे माजी आमदार मोहम्मद इशराक यांना तिकीट दिले आहे. मात्र यामुळे काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्तेच नाराज असून त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

हे ही वाचा >> Congress : २४, अकबर रोड; हा काँग्रेसचा पत्ता सुमारे पाच दशकांनी बदलणार, १५ जानेवारीला नव्या मुख्यालयाचा उद्घाटन सोहळा

बाबरपूरमधील मतदारही यावेळी पुन्हा एकदा ‘आप’लाच मतदान करण्यास इच्छुक असल्याचे बोलून दाखवत आहेत. वीज बिल माफ करणे आणि इतर कल्याणकारी योजनांमुळे फायदा झाल्याचे मतदारांचे म्हणणे आहे.

ओखला

ओखला विधानसभा मतदारसंघात ‘आप’ने अमानतुल्लाह खान यांच्या साथीने आपला गड कायम राखला आहे. परिस्थिती बदलली तरी इथल्या लोकांनी ‘आप’लाच निवडले. या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या ५५ टक्के इतकी आहे. २०१९ साली शाहीन बाग आंदोलनाचे आयोजन करणाऱ्यांपैकी एक असलेल्या सय्यद खालिद राशीद (४४) यांनी सांगितले की, ‘आप’ने गेल्या काही वर्षांत सॉफ्ट हिंदुत्वाची बाजू उचलून धरल्याचे प्रत्येकालाच माहीत आहे. पण आम्ही काय करू शकतो? पण आमचा एक मतदारसंघ पूर्ण दिल्लीचे चित्र बदलू शकत नाही, अशी भावना मतदारांमध्ये आहे. त्यामुळेच ‘आप’ला मतदान करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही.

हे ही वाचा >> Delhi Election 2025 Dates : ठरलं! दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारीला आणि निकाल ८ फेब्रुवारीला; निवडणूक आयुक्तांची घोषणा

मटिया महल

दिल्लीच्या मध्यभागी असलेल्या मटिया महल विधानसभा मतदारसंघात जामा मशीद मोडते. याही मतदारसंघात जवळपास ६० टक्के मुस्लीम मतदार आहेत. याही मतदारसंघातील खाद्य विक्रेते आणि इतर काही मान्यवर मंडळी ‘आप’च्या मागे उभे राहिल्याचे दिसते. येथील एका कबाब विक्रेत्याने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, रात्री १० वाजल्यानंतर स्टॉल चालू ठेवला तर आम्हाला आधी त्रास दिला जात होता. मात्र केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर यामध्ये सकारात्मक बदल झाला. छोट्या विक्रेत्यांना त्यांनी त्रास दिला नाही.

तर दुसरे मतदार रिझवान खान यांनी सांगितले की, केजरीवाल यांच्या काळात दिल्लीतील शाळांमध्ये आमूलाग्र बदल झाला. माझी मुले सरकारी शाळेत शिकतात. या सरकारच्या काळात शैक्षणिक क्षेत्रात बरेच सकारात्मक बदल घडले आहेत.

२०२० च्या निवडणुकीत ‘आप’चे शोएब इकबाल मटिया महलमधून निवडून आले. त्यांना ७५.९६ टक्के मतदान मिळाले आहे. तर भाजपाच्या रवींद्र गुप्ता यांना १९.२४ टक्के मते मिळाली. तर काँग्रेसच्या मिर्झा जावेद अली यांना तर केवळ ३.८५ टक्के मते मिळाली.

Story img Loader