आंध्र प्रदेश विधानसभेच्या सोमवारी होणाऱ्या मतदानात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे सत्ता कायम राखतात की तेलुगू देशमचे चंद्राबाबू नायडू, जनासेनाचे पवन कल्याण आणि भाजप युती हे सत्तेत येतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. एकाच पक्षाला कौल देण्याचा आंध्रचा कल कायम राहतो का, यावरही सत्तेची गणिते अवलंबून आहेत.

आंध्र विधानसभेच्या १७५ जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. सध्या मुख्यमंत्री जगनमोहन यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस (युवाजाना श्रमिका रयतू काँग्रेस पार्टी) सत्तेत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५१ जागा जिंकून जगनमोहन यांनी एकतर्फी विजय मिळविला होता. यंदा जगनमोहन यांना चंद्राबाबू नाायडू यांचा तेलुगू देशम, सुपरस्टार पवनकल्याण यांचा जनासेना आणि भाजप या युतीने आव्हान दिले आहे. चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे. ही संधी गेल्यास ७४ वर्षीय चंद्राबाबूंची राजकीय कारकीर्द संपुष्टात येऊ शकते. काँग्रेस पक्षही रिंगणात आहे. कर्नाटक आणि तेलंगणातील विजयाने काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Maharashtra Kesari 2025
Maharashtra Kesari 2025 : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी; सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Bullet train
महसूल आणि खर्च: देखाव्यापेक्षा सुधारणा हव्या आहेत…
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Loksatta Analysis in Mulund Control inflation through budget mumbai new
अर्थसंकल्पातून महागाईवर नियंत्रण कितपत?उद्या सायंकाळी मुलुंडमध्ये ‘लोकसत्ता विश्लेषणा’तून वेध
Loksatta editorial on Uniform Civil Code implemented in Uttarakhand
अग्रलेख: दुसरा ‘जीएसटी’!
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
aaditya thackeray (1)
Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याबाबत आदित्य ठाकरेंचं सूचक विधान; म्हणाले, “काही गोष्टी लवकरच समोर येतील”

हेही वाचा – इंदूरमध्ये काँग्रेसचा ‘NOTA’साठी प्रचार; भाजपा अडचणीत?

जगनमोहन यांनी गेल्या पाच वर्षांत विविध कल्याणकारी योजना राबविल्या. त्यात ज्येष्ठ नागरिकांना निवृत्ती वेतन, महिलांसाठी अनुदान, मुलांना शाळेत पाठविण्यासाठी महिलांना १५ हजारांचे अनुदान, दुर्बल घटकातील महिलांना पाच वर्षांसाठी ७५ हजारांचे अनुदान यासारख्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागात जगनमोहन यांच्याबद्दल काहीशी सहानुभूती आहे. गेल्या वेळेस १५१ जागा जिंकलेल्या जगनमोहन यांनी यंदा सर्व १७५ जागा का नाही, असा नारा दिला आहे. ग्रामीण भागात जगनमोहन यांना किती पाठिंबा मिळतो यावर सत्तेची गणिते अवलंबून आहेत. कारण शहरी भागात भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे कल दिसतो.

महाराष्ट्राच्या राजकारणात पश्चिम महाराष्ट्राच्या हातात वर्षानुवर्षे सत्तेच्या चाव्या असतात. तसेच आंध्रमध्ये किनारी भागातील कौल निर्णायक मानला जातो. कृष्णा, गुंटुर, नेल्लोर, प्रकाशम, पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी या जिल्ह्यांतील कौल महत्त्वाचा असतो. गेल्या वेळी या पट्ट्यात जगनमोहन यांना एकतर्फी यश मिळाले होते. या पट्ट्यातील कप्पू समाजाची मते निर्णायक आहेत. सूपरस्टार आणि जनासेना पार्टीचे पवन कल्याण हे कप्पू समाजाचे असल्याने या समाजाची मते जगनमोहन यांच्या विरोधात जाऊ शकतात. रायलसीमा हा जगनमोहन यांचा बालेकिल्ला मानला जातो. पण जगनमोहन यांची बहीण शर्मिला यांनी काँग्रेसमध्ये प्र‌वेश करून जगनमोहन यांना आव्हान दिले आहे. यामुळे कडाप्पा या जगनमोहन यांच्या बालेकिल्ल्यातच चुरशीच्या लढती होत आहेत. चंद्राबाबूंमुळे कम्मा तर पवन कल्याण यांच्यामुळे कप्पू असे कम्मा आणि कप्पू समाजाच्या मतांचे गणित जुळविण्याचा प्रयत्न झाला आहे. जगनमोहन यांची मदार अनुसूचित जाती, जमाती तसेच दुर्बल घटक आणि मुस्लिमांवर आहे. स्वत: जगनमोहन हे ख्रिश्चन समाजाचे असल्याने या मतांवर त्यांची भिस्त आहे.

लढतीतील मुख्य नेते वा पक्ष :

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी : गेली पाच वर्षे मुख्यमंत्री, विविध कल्याणकारी योजना राबविल्या असल्या तरी सरकारच्या विरोधातील नाराजीचा फटका बसू शकतो. बहीण शर्मिला, आई व चुलत बहीण सारेच विरोधात. सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान. वडील राजशेखर रेड्डी यांच्या पुण्याईचा लाभ उठविण्याचा प्रयत्न.

एन. चंद्राबाबू नायडू : ७४ वर्षीय चंद्राबाबू नायडू यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे. तेलुगू देशमला जनासेना आणि भाजपशी युती करावी लागली यावरूनच चंद्राबाबू स्वबळावर सत्तेत येण्याबाबत साशंक असावेत. गैरव्यवहारावरून मध्यंतरी अटक झाल्याने प्रतिमेला धक्का. पण त्यातून सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न. आंध्रमध्ये प्रत्येक निवडणुकीत भाकरी फिरविण्याची मतदारांची परंपरा कायम राहिल्यास चंद्राबाबूंना संधी. युतीत सर्वाधिक १४४ जागा तेलुगू देशम लढत असल्याने सत्ता मिळाल्यास चंद्राबाबू मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील.

पवन कल्याण : चित्रपट अभिनेता आणि सूपरस्टार म्हणून प्रसिद्ध. जनासेना पार्टीची सारी मदार १५ टक्के कप्पू समाजाच्या मतांवर आहे. एन. टी. रामाराव यांच्यानंतर चित्रपट क्षेत्रातील पवनकल्याण यांची आंध्रचे मुख्यमंत्री भूषविण्याची महत्त्वाकांक्षा होती. पण त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होत असली तरी राजकीयदृष्ट्या त्यांना बस्तान बसविता आलेले नाही. जनासेना पार्टी युतीत २१ जागा लढवित आहे.

हेही वाचा – ना बालाकोट, ना राम मंदिराचा प्रभाव; मोदींनी विरोधकांसमोर गुडघे टेकल्याचा अधीर रंजन चौधरींचा दावा

शर्मिला : जगनमोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला या प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत. तेलंगणातील विजयामुळे आंध्र काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शर्मिला यांच्या सभांना जागोजागी चांगला प्रतिसाद मिळत आहे. शर्मिला या कडप्पा या वडील राजशेखर रेड्डी यांच्या बालेकिल्ल्यातून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यांच्या विरोधात त्यांचे चुलतबंधू जगनमोहन यांच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित आहेत.

भाजप : आंध्रात भाजपची पाटी कोरी आहे. जगनमोहन किंवा चंद्राबाबू कोणीही सत्तेत आले तरी भाजपशी जवळीक राखून असतात. यामुळे भाजप स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

Story img Loader