दीपक महाले

कोणत्याही शहरातील महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष असतो. राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेने दोन्ही कॉंग्रेसची साथ धरल्यापासून तर मुंबई, औरंगाबादसह शिवसेनेची सत्ता असलेल्या शहरांत भाजपने अत्यंत आक्रमक भूमिका घेत विविध नागरी प्रश्नांवरून रान उठवले आहे. काही ठिकाणी तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या असंतोषाचे नेतृत्व करण्यासाठी गेल्याचे दिसले. पण सुवर्णनगरी जळगावमध्ये नागरिकांना विविध प्रश्न भेडसावत असताना शिवसेना सत्तेत असूनही विरोधी बाकांवरील भाजपने अत्यंत गोडीगुलाबीची व खेळीमेळीची भूमिका घेतल्याने आपल्याला वाली कोण असा प्रश्न जळगावकरांना पडला आहे.

Firing at the house of an independent candidate in Jalgaon news
जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात
shinde shiv sena got responsibility in Maharashtra state assembly elections 2024 for pune
‘धोका’ टाळण्यासाठी ‘मित्रा’ला साकडे; महायुतीकडून शहरात एकही जागा न लढविणाऱ्या शिवसेनेची (शिंदे) यंत्रणा सक्रिय

काय घडलं ? काय बिघडलं ?

सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणऱ्या जळगाव महापालिकेचे राजकारण कायमच आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असले तरी भाजपमधील एक गट शिवसेनेत सामील झाल्यापासून पालिकेचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. सध्या अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात महापालिकेचा कारभार सुरू असून जळगावकरांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असतानाही विरोधक त्याविरोधात आवाज उठवत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज्यात इतरत्र आक्रमकपणे विरोधक असलेली भाजपची मंडळी या ठिकाणी शिवसेना सत्तेत असतानाही गप्प आहे.

विलासराव देशमुखांच्या राजकीय कारकीर्दीला कलाटणी देणारा पराभव, यंदाही परंपरा कायम राहणार?

महापालिकेच्या २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत ७५ पैकी भाजपला ५७, शिवसेनेला १५ तर, एमआयएमला तीन जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेला विशेष यश मिळाले नसतानाही आणि सत्ता मिळण्याची कोणतीही शक्यता दिसत नसताना अडीच वर्षानंतर अचानक चमत्कार झाला. महापौरपद महिला राखीव झाल्यानंतर भाजपमधील ३० नगरसेवकांचा गट फुटून शिवसेनेत दाखल झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भूमिका त्यात महत्त्वपूर्ण ठरली. एमआयएमच्या तिघांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला. ठरलेल्या तडजोडीनुसार शिवसेनेत दाखल झालेल्या भाजप गटाच्या जयश्री महाजन यांच्याकडे महापौरपद गेले. जयश्री महाजन या महापौर झाल्यापासून महापालिकेतील आरोप-प्रत्यारोप, विरोधी पक्षांकडून आखण्यात येणारे डावपेच यावर मर्यादा आल्या. सध्या शहरात अनेक समस्या असल्या तरी विरोधी पक्ष म्हणून भाजप त्याविरोधात आवाज उठवत नसल्याने तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफु मोत्यांच्या माळा, याप्रमाणे जळगावचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे.

मूलभूत नागरी समस्या ‘आ’ वासून उभ्या आहेत. आम्ही जळगावकरांसोबत आहोत, अशी सोयीची भूमिका घेण्याचे राजकारणातील प्रमाण वाढले आहे. सुमारे पाच लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जळगावातील मुख्य रस्त्यांसह उपनगरांतील अंतर्गत रस्त्यांची दैना झाली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे वाहनचालकांना मणक्यांचे विकार जडले आहेत. गटारांची दुरवस्था झाली आहे. विजेची समस्या आहे. अस्वच्छतेमुळे जळगावकरांचे आरोग्य बिघडले आहे. याशिवाय, इतरही समस्या आहेत. रस्ते, पिण्याचे शद्ध पाणी, स्वच्छता देण्यात महापालिका प्रशासनासह लोकप्रतिनिधींना अपयश आले आहे. या अपयशाकडे डोळेझाक करता येणार नाही. वाढीव घरपट्टी, पिण्याच्या पाण्याच्या अमृत योजनेचे कोलमडलेले नियोजन, सदनिकांमध्ये दिल्या जाणाऱ्या नळसंयोजनातील घोळ याचा त्रास जळगावकरांनाच सहन करावा लागत आहे. विरोधी पक्ष प्रखर विरोधकाच्या भूमिकेत निस्तेज आहे.

राज्यातील सत्तेचे कुतूहल अद्यापही मंत्र्यांच्या देहबोलीत!

संभाव्य राजकीय परिणाम

सध्याचे राजकारण भूमिकाहीन आहे. भाजपची महापालिकेतील कचखाऊ भूमिका सर्वांनाच अचंबित करणारी आहे. जळगाव जिल्ह्याचे भाजपचे सर्वेसर्वा आमदार गिरीश महाजन यांची शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी असलेली गट्टी सर्वश्रुत आहे. परंतु, याचा फटका पुढील राजकारणात दोघा पक्षांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्यातरी महापालिकेच्या राजकारणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्वच नाही. पण आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केल्यास विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी पुढे आल्यास आश्चर्य वाटणार नाही.