दीपक महाले

जळगाव : कपाळावर टिळा, गळ्यात भगवं उपरणं आणि थेट भिडण्याची आक्रमकता या अस्सल शिवसैनिकाला साजेशा गुणांमुळे जळगावचे गुलाबराव पाटील हे शिवसेना-भाजप सरकारमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता खात्याच्या मंत्रिपदी विराजमान झाले. परंतु, वर्षभरात त्यांची ऊर्जा आपल्या खात्याच्या कामांऐवजी ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यातच अधिक खर्ची पडली. ठाकरे गटाचे शाब्दीक हल्ले परतावून लावण्याची जबाबदारी जणू शिंदे गटाने त्यांच्या शिरावर सोपविलेली दिसते. राजकीय साठमारीत स्वत:च्या जळगाव ग्रामीण मतदार संघासह जिल्ह्यातील टंचाई, कपाशीला कमी दर, अशा अनेक प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. खुद्द पाणी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यात टंचाईचे संकट भेडसावत असल्याने याआधीची ‘पाणीवाले बाबा’ म्हणून जमविलेली पुंजी आता खर्चात बदलत आहे.

harbhara farming
लोकशिवार: किफायतशीर हरभरा!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
farm distress maharashtra election
विधानसभा निवडणुकीत शेतीचे मुद्दे किती प्रभावी? राज्यातील शेतीची सद्यस्थिती काय?
Nagpur, food vendors Nagpur, Traffic congestion Nagpur, food vendors encroachment Nagpur,
नागपूर : खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून हप्तेखोरीतून लाखोंची उलाढाल; नागरिकांकडून चौकशीची मागणी
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
water supply in pune hadapsar magarpatta area will be closed
हडपसर, मगरपट्टा भागातील पाणीपुरवठा ‘ या ‘ दिवशी राहणार बंद, हे आहे कारण !
lokjagar nepotism in the political families kin of influential leaders get ticket for assembly polls
लोकजागर : घराणेशाहीच्या टीकेला ‘घरघर’
Anti farmer ideology of Modi government
लेख : शेतकरीहिताची ‘चित्रफीत’; राष्ट्रहित की मित्रहित?

खानदेशची मुलुख मैदानी तोफ म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. ते जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. जळगाव जिल्हा औद्योगिक प्रगतीच्या बाबतीत आजवर मागासलेलाच राहिला आहे. दोन-तीन मोठे प्रकल्प सोडले तर रोजगार निर्मितीच्या अंगाने मागील काही वर्षात नवीन असे काहीच झाले नाही. दळणवळणाची उत्तम सुविधा, जंक्शन रेल्वेमार्ग असतानाही जळगावकर मात्र औद्योगिक प्रगतीपासून वंचितच आहेत.

हेही वाचा… जमाखर्च : सुरेश खाडे; ना कामगार, ना जिल्ह्याचे फक्त स्वत:चेच ‘कल्याण’

जळगावात उद्योगाला पोषक वातावरण नाही. विजेचाही प्रश्न आहे. स्थानिक पातळीवर जमिनीचे दर प्रचंड आहेत. त्यामुळे उद्योजक या ठिकाणी येण्यास तयार नसतात. लगतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा औद्योगिक विकास होत असताना जळगाव मात्र त्यापासून वंचित आहे. तसे वातावरण तयार व्हावे, यासाठीही पालकमंत्री या नात्याने गुलाबरावांकडून फारसे प्रयत्न होताना दिसत नसल्याने त्यांची जमा बाजू कमकुवतच आहे.

हेही वाचा… जमाखर्च : तानाजी सावंत, एक रिंगण वादाचे, दुसरे बलवानपणाचे!

गुलाबराव ज्या भागाचे नेतृत्व करतात, तेथील प्रमुख शहर जळगावमधील रस्त्यांची चाळण झाली आहे. निधी मंजूर होऊनही जळगाव शहरातील रस्ते होत नाहीत. गाळेधारकांचा प्रश्न मार्ग लागत नाही. घनकचरा प्रकल्प रखडलेला आहे. जळगावकरांना वेळेवर पाणी मिळत नाही, अशा चक्रात शहर गुरफटले आहे.

हेही वाचा… जमाखर्च: संजय राठोड,अन्न व औषध प्रशासन मंत्री; वाद अधिक, कामे कमी

पाणी पुरवठामंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांना मान्यता मिळून कामे सुरू झाली. धरणगाव तालुक्यात सौर ऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. तिची चाचणीही यशस्वी झाली आहे. मात्र, त्यांच्याच ग्रामीण मतदार संघातील धरणगावमध्ये पिण्याचे पाणी वेळेवर येत नसल्याने अनेकदा नागरिकांना आंदोलने करावी लागतात. धरणगावकर सध्या पाण्यासाठी कासावीस झाले आहेत. १२-१२ दिवसांआड त्यांना पाणी मिळते. मतदारसंघातील नशिराबाद, ममुराबाद, मन्यारखेडासह अनेक गावे तहानलेली असल्याची स्थिती आहे. अवैध वाळू वाहतुकीचाही प्रश्न नेहमीच चर्चेत असतो. अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांच्या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे.

हेही वाचा… जमाखर्च : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात रविंद्र चव्हाण ‘नामधारी’

रखडलेल्या बंधाऱ्यांचा विषय पुढे सरकत नाही. १४ प्रकल्पांवर आतापर्यंत सहा हजार कोटींपेक्षा अधिक खर्च झाला आहे. कामांची स्थिती व मिळणारा निधी पाहता, प्रकल्प २०२४ पूर्ण होणार नसल्याची स्थिती आहे. अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या घरात अजूनही ३० ते ३५ टक्के कापूस पडून आहे. केळी उत्पादक अडचणीत आहेत. शेती व्यवसाय गारपीट, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, कडक उन्हाळा अशा नैसर्गिक संकटांत सापडला आहे. पालकमंत्री यासंदर्भात नेमके काय करतात, हेच जळगावकरांना कळेनासे झाले आहे.

हेही वाचा… जमाखर्च : उदय सामंत, उद्योगमंत्री; खरोखरीच ‘उद्योगस्नेही’ होणार का?

पालकमंत्री पाटील यांच्या पाठपुराव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने ५४४ किलोमीटरच्या १६५ ग्रामीण शेतरस्त्यांना ग्रामीण मार्ग दर्जा मंजूर म्हणून घोषित केले आहे, तसेच ३७१ किलोमीटरच्या ग्रामीण मार्गांना इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नतीसाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे तब्बल ९१५ किलोमीटरच्या रस्त्यांचा कायापालट होणार आहे.

शिवसेनेतील फुटीपूर्वी उद्धव ठाकरे सरकारमध्ये आक्रमक शिवसैनिक म्हणून गुलाबराव यांची ओळख होती. फुटीनंतर एकनाथ शिंदे हेच आपले नेते कसे आहेत, हे ते सांगू लागले. गुलाबराव पाटील भाषणात आमचा पक्ष जळत होता, आमचे घर जळत होते, यामुळे आम्ही हा उठाव केल्याचे नेहमी सांगतात. मात्र, त्यांच्या उठावाने जिल्ह्यातील रखडले प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. कामांमधील अपयश ते आक्रमक भाषणांनी झाकण्याचा प्रयत्न करतात. एकंदरीत, कामे कमी आणि पसारा जास्त, अशी त्यांची स्थिती आहे. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री शिंदे हे जिल्ह्यात चार-पाच वेळा येऊन गेले. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांच्या भूमिपूजनासह लोकार्पण कार्यक्रम झाले. परंतु, कापूस प्रश्नी मुख्यमंत्रीही कधी काही बोलले नाहीत. गुलाबराव हे त्यांच्या आक्रमक भाषणांमुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या लेखी जमा बाजूला असले तरी जिल्ह्याला त्यांच्या मंत्रिपदाचा फारसा फायदा होताना दिसत नसल्याने जळगावकरांच्या दृष्टीने ते खर्चाच्या बाजूलाच आहेत.