जमियत उलेमा-ए हिंदच्या विभाजनाच्या चौदा वर्षांनंतर आता मुस्लिम धार्मिक संघटनेचे दोन गटांच्या विलीनीकरणाची शक्यता निर्माण झाली आहे. समाजाच्या हितासाठी सर्व संघटनांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे् मत संघटनेनतील लोकांनी मांडले. या भुमिकेमुळे १४ वर्षे सुरू असलेला वाद संपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवबंदी मौलवींच्या नेतृत्वाखालील दोन प्रभावशाली मुस्लिम संघटना विलीनीकरणासाठी पुढाकार घेत आहेत. मौलाना अर्शद मदनी यांनी २००८ मध्ये जमियत उलेमा-ए-हिंद या संस्थेच्या विभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. संस्थेचे कामकाज चालवण्याच्या पद्धतीवर तिच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांनी आक्षेप घेतल्याने विभाजन करण्यात आले होते.
त्यावेळी अर्शद मदनी हे प्रमुख होते आणि संपुर्ण संघटना चालवत होते. २००८ च्या आसपास संघटनात्मक कुरबुरी वाढल्यामुळे अर्शद मदनी यांनी त्यांची स्वतंत्र जमियत संघटना स्थापन केली. दरम्यानच्या काळात अर्दश मदानी यांचा मुलगा मौलाना महमूद मदनी याने प्रथम सरचिटणीस आणि नंतर अध्यक्ष म्हणून जेयूएचच्या इतर गटांची जबाबदारी घेतली. त्यानंतर आता मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी अंतर्गत वाद विसरून एकत्र येण्याची भूमिका काही जेष्ठ मुस्लिम नेत्यांकडून मांडली गेली. या आवाहनाला प्रतिसाद सर्व गटांनी संघटना मजबूत करण्यासाठी एकत्र येण्याच्या दिशेने पाउले टाकण्यास सुरवात केली आहे.
जमियत ही भारतातील सर्वात मोठ्या मुस्लिम संघटनांपैकी एक आहे. सुमारे दीड कोटी अनुयायी असल्याचा दावा संघटनेने केला आहे. विभाजन झाले त्यावेळी संघटनेच्या अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर कार्यकारिणी सदस्यांनी आक्षेप घेतला होता. ही पूर्णपणे संघटनात्मक बाब होती. त्यामध्ये कुठलीही वैचारिक दुफळी नव्हती असे संघटनेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
गेल्या महिन्यात २८ चे रोजी महमूद मदनी गटाने अर्शद मदनी यांना देवबंदमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. या बैठकीला देशभरातून दोन हजार सदस्य उपस्थित होते. संघटना एकसंध आणि बळकट करता येईल का, हे पाहणे हा या आमंत्रणामागील उद्देश असल्याचे सूत्रांनी सांगितले. संघटना मजबूत आणि एकसंध करण्यासाठी जेयुएचने “सद्भावना संसद” नावाची मोहीम सुरू करण्याची योजना आखली आहे. ही मोहीम संपूर्ण देशात नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जाणार आहे.
यासाठी ‘जेयुएच’ ने इतर धार्मिक समुदायातील नेत्यांना तसेच गैर-धार्मिक नेते आणि विचारवंतांना देखील जोडण्याची योजना आखत आहे. पण जर इतर समाजातील लोकांना बोलावले तर प्रथम आपल्या समाजाला संघटित आणि मजबूत करणे आवश्यक आहे. येथे कोणतीही दुफळी नसावी यासाठी विलीनीकरणाचा प्रस्ताव पुढे आल्याचे ‘जेयुएच’ मधील एका नेत्याने संगीतले.