Jammu and Kashmir Assembly Election 2024 Second Phase High-Profile Faces : जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ जागांसाठी आज (२५ सप्टेंबर) मतदान होत आहे. या टप्प्यात एकूण २३९ उमेदवार रिंगणात असून, २५ लाख मतदार त्यांचा मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काश्मीर खोऱ्यातील तीन आणि जम्मूतील तीन अशा एकूण सहा जिल्ह्यांमध्ये हे मतदान चालू आहे. या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना, जम्मू व काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे प्रमुख उमेदवार आहेत. अब्दुल्ला हे गांदेरबल, तसेच बडगाव या दोन मतदारसंघांतून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, कारागृहात असलेला फुटीरतावादी सर्जन अहमद वॅघे ऊर्फ बरकती बीरवाहमधून निवडणुकीच्या रिंगणात आहे.

जम्मू-काश्मीर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तारिक हमीद कारा हे सेंट्रल शाल्टेंग या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे वरिष्ठ नेते-खासदार राहुल गांधी यांनी कारा यांचा प्रचार केला होता. दरम्यान, मतदानाच्या पूर्वसंध्येला पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार आगा मुतझीर मेहदी यांनी ओमर अब्दुल्लाह यांच्या नॅशनल कॉन्फरन्सवर बडगामधील मतदारांमध्ये पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच मेहदी म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांना व मतदारांना धमकावलं जात आहे. दुसऱ्या बाजूला पीडीपीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रकरणी कठोर पावलं उचलण्याची मागणी केली आहे.

maharashtra vidhan sabha election 2024 ajit pawar vs yugendra pawar baramati assembly constituency
बारामतीत अटीतटीचा सामना अजित पवार की युगेंद्र… मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवार यांच्या सभेची चर्चा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
maharashtra vidhan sabha election 2024 sanjay kelkar avinash jadhav rajan vichare thane assembly constituency
लक्षवेधी लढत : ‘शिवसेना- ठाणे’ समीकरण अडचणीत?
Kishor Patkar latest marathi news
नवी मुंबई: शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी किशोर पाटकर, बंडाच्या हंगामात पक्ष जोडणीचे आव्हान
navi Mumbai Narendra modi
महायुतीची मतपेरणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेत विकास प्रकल्पांवर भाष्य
ajit pawar expressed about obc vote in an interview given to the indian express
ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत
dhananjay munde vs rajesaheb deshmukh in parli
लक्षवेधी लढत: धनंजय मुंडेंसमोर ‘मराठा उमेदवाराचे’ आव्हान
maharashtra assembly election 2024 rohit pawar campaign for maha vikas aghadi candidate ajit gavhane in bhosari assembly constituency
महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल, महायुतीच्या सोबतच्या पक्षांची मदत लागणार नाही – रोहित पवार

मुफ्ती यांनी समाजमाध्यमांवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की बडगाम व गांदेरबल मतदारसंघांमध्ये पैसे देऊन मतं विकत घेण्याचा प्रयत्न होत असल्याचं आमच्या निदर्शनास आलं आहे. निवडणूक आयोगानं पोलिसांना आदेश देऊन या प्रकरणांना आळा घालायला हवा, तसेच गुन्हेगारांवर कठोर कारवाई करायला हवी. यापूर्वी या लोकांनी (नॅशनल कॉन्फरन्स) १९८७ च्या निवडणुकीत हेराफेरी करून, मतं विकत घेऊन निवडणूक जिंकली होती.

हे ही वाचा >> तिरुपती लाडू भेसळ वाद आणि नितीश कुमारांकडून राम मंदिराचे कौतुक; भाजपाच्या मित्रपक्षांनीही रेटला हिंदुत्वाचा मुद्दा

काश्मीरमध्ये चुरस

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काश्मीरमधील १५ मतदारसंघांमध्ये मतदान झालं होतं. या १५ पैकी आठ जागा महबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीनं जिंकल्या होत्या; तर नॅशनल कॉन्फरन्सनं सात जागा जिंकल्या होत्या. पीडीपीनं जिंकलेल्या जागांमध्ये अब्दुल्लाह यांच्या बिरवाह जागेचाही समावेश आहे. तर, जम्मूमधील या टप्प्यातील ११ जागांपैकी दोन जागा पीडीपीनं, तीन भाजपानं, एक काँग्रेसनं व पाच जागा नॅशनल कॉन्फरन्सनं जिंकल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत तीन नव्या मतदारसंघांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये बुधल, थन्नामंडी व श्री माता वैष्णोदेवी या मतदारसंघांचा समावेश आहे.

हे ही वाचा >> आरक्षण आंदोलनातील तूट महिला मतपेढीतून भरुन काढण्याची भाजपची तयारी, तीन हजार लाडक्या बहिणींचे मेळावे

ओमर अब्दुल्लाह पारंपरिक गंदेरबलमधून निवडणुकीच्या रिंगणात

नॅशनल कॉन्फरन्ससाठी गंदेरबलची जागा खूप महत्त्वाची आहे. कारण- अब्दुल्लाह कुटुंबातील तीन पिढ्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाह पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाच्या बालेकिल्ल्यातून विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. आजवरच्या इतिहासात २००२ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच नॅशनल कॉन्फरन्सनं ही जागा गमावली होती. त्यावेळी पीडीपीनं ही जागा जिंकली होती.

श्रीनगरमध्ये मुफ्तींच्या पीडीपीला अब्दुल्लाह यांच्या एनसीचं आव्हान

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीनगरमधील आठपैकी पाच विधानसभा जागांवर विजय मिळविणाऱ्या पीडीपीला यावेळी नॅशनल कॉन्फरन्सकडून कडवी टक्कर मिळणार आहे. तसेच यावेळी श्रीनगरमधील अनेक मतदारसंघांमध्ये इतर लहान पक्ष व अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे. मोठ्या पक्षांना या गोष्टींचादेखील सामना करावा लागणार आहे.

हे ही वाचा >> Siddaramaiah : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना MUDA प्रकरण भोवणार? राज्यपालांचा आदेश न्यायालयाने कायम ठेवल्याने सिद्धरामय्या अडचणीत

अल्ताफ बुखारी चिन्नापोरा आणि रवींद्र रैना नौशेरामधून निवडणूक रिंगणात

दरम्यान, अपनी पार्टीचे नेते अल्ताफ बुखारी हे श्रीनगरच्या चिन्नापोरा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना हे जम्मूमधील नौशेरा मतदारसंघातून उभे आहेत. झाडीबलमधून माजी महापौर जुनैद अझीम मट्टू विधानसभेच्या रिंगणात आहेत. ते अपनी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत.