Jammu Kashmir Election 2024 : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार आहे. याआधी दोन टप्प्यासाठी मतदान झालेले आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आता तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी नेत्यांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. या विधानसभेच्या निवडणुकीत सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्स आणि इंजिनियर रशीद यांच्या नेतृत्वाखालील अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) या पक्षांचे भवितव्य देखील ठरवण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा तिसरा आणि अंतिम टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. या तिसऱ्या टप्प्यात विधानसभेच्या एकूण ४० जागांसाठी मतदान होणार होणार आहे.

दरम्यान, बारामुल्ला, कुपवाडा आणि बांदीपूर जिल्ह्यांचा समावेश असलेला उत्तर काश्मीरच्या राजकारणाच्या संपूर्ण स्पेक्ट्रमचे प्रतिनिधित्व करतो. नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) या सारख्या फुटीरतावाद्यांपासून ते मुख्य प्रवाहातील पक्षांपर्यंत प्रत्येकाची या प्रदेशात लक्ष केंद्रीत केलं आहे. पीपल्स कॉन्फरन्स (PC) आणि अवामी इत्तेहाद पार्टी (एआयपी) या दोन्हींचा उगम कुपवाडा जिल्ह्यातून झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक पीपल्स कॉन्फरन्स आणि अवामी इत्तेहाद पार्टीच्या भवितव्यासाठी महत्वाची ठरणार आहे.

Yuva Sena is celebrate with the victory in the Adhi Sabha elections print politics news
अधिसभा निवडणुकीच्या विजयाने युवासेनेत उत्साह
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Resident of the village Katlaheri talking with Indian Express team regarding upcoming elections
Haryana : “घुंगट वगैरे सगळं उडून गेलं आता..” हरियाणातल्या महिला मतदार असं का म्हणत आहेत?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Devendra Fadnavis Answer to Uddhav Thackeray
Devendra Fadnavis : ‘एक तर तू राहशील किंवा मी राहिन’, उद्धव ठाकरेंच्या आव्हानाला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर, “त्यांना वाटत असेल तर..”
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Defence Minister Rajnath Singh
Defence Minister Rajnath Singh: “तुम्ही आमचे आहात, पाकिस्तान तुम्हाला…”, पीओकेमधील नागरिकांना राजनाथ सिंहाचे भारतात येण्याचे आवाहन
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह

हेही वाचा : Haryana Assembly Election 2024 : भाजपा नेत्यांना प्रश्न विचारुन कोंडीत पकडण्यासाठी हरियाणातल्या शेतकऱ्यांना खास प्रशिक्षण; प्रशिक्षणात काय शिकवलं?

१९९९ मध्ये पीडीपीचा उदय होण्यापूर्वी उत्तर काश्मीर हा नॅशनल कॉन्फरन्सचा (एनसी) बालेकिल्ला होता. २००२ च्या जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत एनसीने प्रदेशात नऊ जागा जिंकल्या होत्या. मात्र, पुढे २००८ मध्ये एनसीच्या नऊ वरून सात जागा आल्या तर पीडीपीने सहा जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनसीच्या जागा तीनवर आल्या तर तर पीडीपीला सात जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, उत्तर काश्मीरमधील राजकारणात अलिकडच्या काही काळात लक्षणीय बदल झाले आहेत. २००२ मध्ये सोफी मोहिदिन हे सज्जाद लोनचे मित्र होते. हंदवाडा विधानसभा जागा जिंकली होती. सज्जाद लोन त्यावेळी फुटीरतावादी गट हुर्रियत कॉन्फरन्सशी संबंधित होते आणि मुख्य प्रवाहातील राजकारणात त्यांचा सहभाग नव्हता. मात्र, पुढे सक्रिय राजकारणात आल्यानंतर त्यांच्यात वाद निर्माण झाले. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांना सज्जाद लोन आणि पीपल्स कॉन्फरन्सने या गटापासून वेगळे व्हावे अशी त्यांची इच्छा होती. त्यानंतर सज्जाद लोनने हुर्रियत कॉन्फरन्स सोडली आणि २०१४ मध्ये मुख्य प्रवाहातील निवडणुकीच्या राजकारणात सामील झाले. त्यानंतर सज्जाद लोन यांनी हंदवाडा मतदारसंघात विजय मिळवला आणि त्यांच्या पक्षाचे सहकारी बशीर अहमद दार यांनी कुपवाडा मतदारसंघात विजय मिळवला.

हेही वाचा : गंगाजल-गोमूत्र प्राशन करायला लावून काँग्रेस नगरसेवकांचं शुद्धीकरण? महापौर म्हणाल्या, “आता ते भ्रष्टाचारमुक्त झाले”

२००८ मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रोजेक्ट्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (JKPCC) चे सरकारी कर्मचारी असलेल्या रशीदने निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि सर्वानाच धक्का दिला. एवढंच नाही तर कुपवाडा जिल्ह्यातील लंगेट विधानसभा मतदारसंघातून विजय देखील मिळवला. सज्जाद लोनने कुपवाड्यात आपला आधार तयार केला आहे, तर इंजिनियर रशीद यांनी उत्तर काश्मीरमधील तीन जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात पाठिंबा मिळवला. दरम्यान, पीडीपी आणि एनसीकडून या खोऱ्यात भाजपाच्या विरोधात आरोपांचा सामना करणाऱ्या सज्जाद लोन आणि इंजिनियर रशीद यांच्यासाठी निवडणुकीचा अंतिम टप्पा महत्त्वाचा आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सज्जाद लोन यांचा बारामुल्ला मतदारसंघात पराभव झाला. त्यानंतर ते आता हंदवाडा आणि कुपवाडा या दोन विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे आणि दोन्ही जागा जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान, काही महिन्यापर्यंत ‘एआयपी’कडे रशीद यांच्या मूळ लंगेट मतदारसंघाच्या पलीकडे अस्तित्व नसलेला एक छोटा पक्ष म्हणून पाहिले जात होते. लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलली जेव्हा बारामुल्ला लोकसभा जागेचा भाग असलेल्या १८ पैकी १५ विधानसभा मतदारसंघात राशिद यांनी आघाडी घेतली होती.

तसेच लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर रशीद यांना आपल्या पक्षाचा पाया मजबूत करण्याची आशा आहे. यावेळी, एआयपी जो अद्याप नोंदणीकृत राजकीय पक्ष नाही. काश्मीर विभागातील ३५ जागांवर उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. त्यापैकी जागा १५ उत्तर काश्मीरमध्ये येतात. प्रतिबंधित सामाजिक-राजकीय संघटना जमात-ए-इस्लामीचे उत्तर काश्मीरमधील तीन जिल्ह्यांमध्ये अस्तित्व आहे. केंद्राशी चर्चा करत असलेल्या जमात पॅनलने तिसऱ्या टप्प्यासाठी पाच उमेदवार उभे केले आहेत. निवडणुकीचे निकाल आणि त्यातील उमेदवारांना मिळालेली मतेही भविष्यात जमातची राजकीय दिशा ठरवू शकतात. त्यांच्या मतदार आणि कॅडरने दिलेला हिरवा सिग्नल हे सूचित करेल की जमात नवी दिल्लीशी संवाद सुरू ठेवू शकते. निकाल वेगळा लागला तर निवडणुकीच्या दृष्टिकोनावर संघटनेत मतभेद होऊ शकतात.