जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडलं असून यावेळी एकूण २४ मतदारसंघांमध्ये मतदान झालं. तसेच राज्यात ६१ टक्के मतदानाची नोंद झाली. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, किश्तवाडमध्ये सर्वाधिक ७७.२३ टक्के मतदान झालं. त्यानंतर दोडामध्ये ६९.३३, रामबन ६७.७१ टक्के, कुलगाम ६२.०७ टक्के, शोपियान ५३.६५ टक्के आणि अनंतनागमध्ये ५४.१७ टक्के मतदान झाले. याशिवाय पुलवामा येथे सर्वात कमी ४३.८७ टक्के मतदानांची नोंद झाली.

पहिल्या टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलं असलं तरी यंदाच्या निवडणुकीत अनेक महत्त्वाचे बदल बघायला मिळाले, त्यापैकीच एक म्हणजे यंदा नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. विशेष म्हणजे कधीकाळी ज्या गावात मतदानावर बहिष्कार टाकला जायचा त्या गावातही मतदानासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा बघायला मिळाल्या. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Manoj Jarange On Dhananjay Munde
Manoj Jarange : ‘धनंजय मुंडे सरकारवरील डाग, त्यांच्या गुंडाची टोळी थांबवा, अन्यथा आम्ही…’, मनोज जरांगेंचा मोठा इशारा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
akola ZP
वंचितची प्रतिष्ठा पणाला लागणार; अकोला जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध, राजकीय पतंगबाजी रंगणार
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
bjp deciding direction of campaign for the delhi assembly elections
लाल किल्ला : दिल्ली निवडणुकीची सूत्रे भाजपच्या हाती?
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
ec hearing against district collector dr sachin ombase for obstructing election process
लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांचा सावळा गोंधळ; निवडणूक आयोगाकडून दखल; जिल्हाधिकार्‍यांची सुनावणी
अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने कोणता प्लान आखला? (फोटो सौजन्य पीटीआय)
Delhi Elections 2025 : अरविंद केजरीवाल यांना सत्तेतून हटवण्यासाठी भाजपाने कोणता प्लान आखला?

हेही वाचा – ‘एक देश, एक निवडणूक’, राज्यावर परिणाम नाही; पालिका निवडणुकांबाबत संदिग्धता

या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना काश्मीरच्या कोकपारा गावातील वसीम अहमद म्हणाले, आमच्या गावात कधीकाळी शून्य टक्के मतदानाची नोंद होत होती. मात्र, काल मतदान सुरू झाल्यानंतर गावातील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर नागरिकांच्या लांब रांगा बघायला मिळाल्या. हा बदल बघून आनंद होत होता.

हे मतदान केंद्र कुलगाम विधानसभा मतदारसंघातील बोगम या भागात येते. हा भाग जमात-ए-इस्लामीचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, सरकारने आता या संघटनेवर बंदी घातली आहे, त्यामुळेच की काय या संघटनेने १० अपक्ष उमदेवारांना पाठिंबा दिला आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जमात समर्थित उमेदवारांनी या भागात रॅली काढत मोठं शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याचाच परिणाम पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान दिसून आला, असं बोललं जात आहे.

कुलगाम विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत बघायला मिळाली. नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस युतीचे उमेदवार एम. वाय. तारिगामी, पीडीपीचे मोहम्मद अमीन दार आणि जमात-ए-इस्लाम समर्थित अपक्ष उमेदवार सय्यर अहमद रेशी हे यावेळी निवडणुकीच्या रिंगणात होते. खरंतर जमात-ए-इस्लामी ही तीच संघटना आहे, ज्यांनी गेली अनेक वर्ष निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी आता स्वत:च उमेदारांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या संघटनेबाबत नाराजी असल्याचं दिसून आलं आहे. त्याचा फटका अपक्ष उमेदवार सय्यर अहमद रेशी यांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – BJP MLA Munirathna Naidu : कंत्राटदाराचा छळ केल्याप्रकरणी भाजपाच्या आमदाराला अटक; कोण आहेत मुनीरत्न नायडू?

मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितले, इतक्या वर्षांत मी पहिल्यांदाच मतदान करतो आहे. मात्र, मी सय्यर अहमद रेशी यांना मत देणार नाही. त्यांनी निवडणूक लढायला नको होती. गेली अनेक वर्ष ते आम्हाला निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यास सांगत होते. मात्र, आता ते स्वत: निवडणूक लढवत आहेत. तसेच जमातच्या एका माजी कार्यकर्त्याने सांगितले, मी जमात समर्थित उमेदवाराला मतदान केलेले नाही, कारण मला वाटते की त्यांच्याकडे भविष्यासाठी रोडमॅप नाही. त्यामुळे कुलगाममध्ये पीडीपी आणि एनसी यांच्यातच मुख्य लढत आहे. याशिवाय अन्य एका तरुणाने सांगितले, गेल्या दशकात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आपल्या समस्यांवर मतदानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट जर रेशी यांनी कळली असेल, तर ते चांगलंच आहे,

दरम्यान, कुलगाममध्ये यंदा ६२.०७ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१४ मध्ये केवळ ५८.४ टक्के मतदान झाले होते, तर २००८ मध्ये ६१.५९ टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे कुलगाममध्ये जमात-ए-इस्लामच्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसून आला, तो पुलवामामध्ये दिसून आलेला नाही. पुलवामामध्ये जमातने अपक्ष उमेदवार डॉ. तलत मजिद यांना पाठिंबा दिला आहे.

Story img Loader