काश्मीरी पंडितांच्या हत्यांचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालं आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक काश्मीरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी मोठं विधान केलं आहे. काश्मीरमध्ये जोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत काश्मीरी पंडितांचे जम्मूमध्ये स्थलांतर करावं, असं ते म्हणाले. काश्मीरमध्ये आयोजित एका स्थानिक कार्यक्रमात ते बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – ‘वन रँक, वन पेन्शन’ कायद्याच्या सुधारणांवरून राजकारण तापलं, ‘भारत जोडो’ला ‘क्रेडिट लेलो’ यात्रा म्हणत भाजपाचे काँग्रेसवर टीकास्र

काय म्हणाले गुलाब नबी आझाद?

“मागील काही दिवसांत काश्मीरमधील परिस्थिती चिघळत आहे. काश्मीरी पंडितांच्या हत्या झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जोपर्यंत काश्मीर घाटीत परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत येथील काश्मीरी पंडितांचे जम्मूमध्ये स्थलांतर करावं, जेव्हा परिस्थित नियंत्रणात येईत तेव्हा त्यांना काश्मीरमध्ये परत बोलवता येईल, अशी प्रतिक्रिया गुलाब नबी आझाद यांनी दिली आहे. मनमोहनसिंग यांचे सरकार असताना आम्ही काश्मीरी पंडितांच्या रोजगाराचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी जवळपास तीन हजार काश्मीरी पंडिताना रोजगार देण्यात आले होता”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – मोफत धान्य योजनेतून भाजपाची लोकसभा निवडणुकीची तयारी

पुढे बोलताना ते म्हणाले, “मानवाच्या जीवापेक्षा नोकऱ्या महत्त्वाच्या असू शकत नाहीत. याबाबत जम्मू-काश्मीर प्रशासनाची काय भूमिका आहे, हे मला माहिती नाही. मात्र, आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेसाठी आम्ही आवश्यक त्या सर्व उपायोजना करू. मात्र, तोपर्यंत काश्मीरी पंडितांचे जम्मूमध्ये स्थलांतर करावं”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘भारत जोडो’ यात्रेत व्यग्र असणाऱ्या राहुल गांधींची संसदेत केवळ ५३ टक्के उपस्थिती

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत. त्यापार्श्वभूमीवर गुलाब नबी आझाद यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढण्यात येत आहेत. विशेष म्हणजे कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. २०१९ मध्ये केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला असलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लद्दाख, अशा दोन स्वतंत्र केंद्रशासीत प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती.