ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझादी यांच्या डेमोक्रॅटिक आझाद पक्षाला(डीएपी) अनेक धक्के बसत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत गुलाम नबी यांची साथ दिलेल्या अनेक बड्या नेत्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शुक्रवारीदेखील (६ जानेवारी) १७ नेत्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यचा निर्णय घेतला. यामध्ये माजी मंत्री पीरजादा मोहम्मद सय्यद यांचादेखील समावेश आहे. याच कारणामुळे गुलाम नबी आझाद यांचा पक्ष नावारुपाला येण्याआधीच संपुष्टात येतो की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> शालेय पोषण आहारात मांसाहार देण्याचा पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय, भाजपासह विरोधकांची टीका; म्हणाले, “हा निर्णय…”

मागील काही दिवसांपासून माजी आमदार बलवान सिंग, माजी मंत्री पीरजादा मोहम्मद, माजी उपमुख्यमंत्री ताराचंद या तीन महत्त्वाच्या नेत्यांनी डीएपी या आझाद यांच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे गुलाम नबी आझाद यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. आझाद यांच्याकडून चेनाब भागातील नेत्यांना जास्त महत्त्व दिले जात असल्यामुळे या नेत्यांमध्ये नाराजी होती, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> आगामी निवडणुकीसाठी भाजपाकडून १६० मतदारसंघांवर विशेष लक्ष; काय आहे लोकसभा प्रवास योजना?

तसेच जम्मू काश्मीर या भागात आझाद यांचा पक्ष भाजपाला पर्याय म्हणून उभा राहील अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र तसे न होता, आधाद यांच्या पक्षामुळे भाजपाविरोधातील मते फुटण्याचा धोका आहे, अशी भावना या नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन काँग्रेसने असंतुष्ट नेत्यांना आमचे दरवाजे खुले असल्याचे सांगितले. परिणामी आझाद यांच्या पक्षाला ओहोटी लागली आहे.

हेही वाचा >>>“तुम्ही राजकीय नेते आहात, पुजारी नाही”; राम मंदिराच्या उद्घाटनावरून खरगेंचं अमित शाहांवर टीकास्र; म्हणाले, “मोदी सरकारने…”

दरम्यान, पक्षाला लागलेल्या गळतीवर आझाद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्यासाठी हा धक्का नाही. ताराचंद, बलवान सिंग, सय्यद यांच्याकडे स्वत:चे असे मतदारसंघ नव्हते. मी त्यांना शुभेच्छा देतो. ते माझे जुने सहकारी आहेत. त्यामुळे मी त्यांच्याविषयी वाईट बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया आझाद यांनी दली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu kashmir leaders leaving ghulam nabi azad aap party joining congress know detail prd
Show comments