नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील उमेदवारांची मागे घेतलेली यादी मंगळवारी भाजपने पुन्हा जाहीर केली. मागे घेतलेल्या पहिल्या यादीतील एखादा अपवाद वगळता सर्व उमेदवारांची नावे कायम ठेवण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या तीनही टप्प्यांतील ४४ उमेदवारांची यादी भाजपने सोमवारी जाहीर केली होती. मात्र, या यादीमध्ये अन्य पक्षांतून आलेल्या नेत्यांना प्रामुख्याने उमेदवारी देण्यात आल्याने जम्मूमधील प्रदेश कार्यालयात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. नेते व कार्यकर्त्यांचे उग्र रूप पाहून भाजपला पहिली यादी मागे घ्यावी लागली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील जागांसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

मात्र, भाजपने नेते व कार्यकर्त्यांच्या दबावाला न जुमानता मंगळवारी तीन टप्प्यांतील आणखी २९ उमेदवारांची यादी जाहीर केली. सोमवारी जाहीर केलेल्या २८ उमेदवारांना नव्या यादीमध्ये कायम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे बंधू देवीदर सिंह राणा यांचाही समावेश आहे. उमेदवारी देण्यात आलेले काही नेते नॅशनल कॉन्फरन्स, पीडीडी, पँथर पार्टी आदी पक्षांतून भाजपमध्ये आले आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये हे नेते भाजपमध्ये आले असून मूळ भाजपमधील नेत्यांना या नेत्यांमुळे उमेदवारी दिली गेली नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

Harshwardhan Patil Meets Sharad Pawar
Harshwardhan Patil : हर्षवर्धन पाटील विधानसभेला तुतारी हाती घेणार? शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Amol mitkari jaydeep apte 1
Amol Mitkari : “जयदीप आपटे याचा त्या पुतळ्याद्वारे छुपा अजेंडा…”, मिटकरींचे गंभीर आरोप; देवेंद्र फडणवीसांना म्हणाले…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
eknath shinde Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse at Rajkot Fort Malvan Sindhudurg
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण
Scammer impersonates CJI DY Chandrachud
CJI DY Chandrachud : “मीटिंगला जायचंय, ५०० रुपये पाठवा”, स्कॅमरने सरन्यायाधीशांच्या नावाने टॅक्सीसाठी पैसे मागितले; पुढे काय झालं?
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

हेही वाचा : Mallikarjun Kharge : खरगे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप; सिद्धरामय्यांनंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न?

जम्मू-काश्मीरमध्ये १८ व २५ सप्टेंबर व १ ऑक्टोबर अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. तब्बल दहा वर्षांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप जम्मू व काश्मीर या दोन्ही विभागांत मिळून ६०-७० जागा लढवणार असल्याचे सांगितले जाते. भाजपने दोन दिवसांमध्ये उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या असून अन्य जागांवरील उमेदवारांची प्रतीक्षा केली जात आहे.

हेही वाचा : Kolkata Doctor Case : काय आहे पश्चिमबंग छात्र समाज? नबन्नावरील मोर्चाआड विद्यार्थी संघटनेकडून कोलकात्यात हिंसाचार?

ओमर अब्दुल्ला गांदरबल मतदारसंघातून लढणार

नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे गांदरबल विधानसभा मतदारसंघातून जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. पक्षाने मंगळवारी ही माहिती दिली. केंद्रशासित प्रदेश विधानसभेत निवडणूक न लढण्याची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्र्यांचा हा यू-टर्न आहे. नॅशनल कॉन्फरन्सने ३२ उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यात गांदरबल विधानसभा जागेसाठी ओमर अब्दुल्ला यांच्या नावाचाही समावेश आहे. अब्दुल्ला यांनी २००९ ते २०१४ पर्यंत विधानसभेत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यानंतर ते नॅशनल कॉन्फरन्स-काँग्रेस आघाडी सरकारचे मुख्यमंत्री होते. निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर आपण पुनर्विचार करू शकतो, असे संकेत ओमर यांनी सोमवारी दिले होते.