पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पंतप्रधान पदाची ८ वर्षे पूर्ण केली आहेत. २०१४ साली पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली तर २०१९ साली दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी आपण तिसऱ्या टर्मसाठी तयार असल्याचे संकेत दिले आहेत. एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले ” विरोधी पक्षातील एका अत्यंत जेष्ठ नेत्याने मला एकदा विचारले होते की दोन वेळा पंतप्रधान झाल्यावर काय साध्य करायचे राहिले आहे”.यावर मोदी म्हणाले की ” सरकारी योजना देशातील १०० % लोकांपर्यंत पोचल्याशिवाय मी गप्प बसणार नाही”.

७१ वर्षीय नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यानंतर जन्मलेले देशातील पहिले पंतप्रधान आहेत. गेल्या ७ दशकांमध्ये भारताने सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांसह १५ पंतप्रधान पाहिले आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’ ने पंतप्रधानांचा कालखंड शिर्षस्थानी ठेवत भारतीय संसदीय लोकशाहीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Challenges facing by political parties in Maharashtra state assembly elections 2024
लक्षवेधी लढत : प्रतिष्ठा, अस्तित्व आणि वर्चस्वाची लढाई
Rights and Duties of the Opposition in democracy
चतु:सूत्र : लोकशाहीत विरोधी पक्षाची गरज
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Devendra Fadnavis applauded by Narendra Modi Amit Shah print politics news
मोदी, शहांकडून फडणवीस यांच्यावर कौतुकाची थाप! मुख्यमंत्री पदाचे संकेत
who was pramod mahajan
पत्रकार, भाजपाचे लक्ष्मण ते पंतप्रधानपदाचे दावेदार; कशी होती प्रमोद महाजनांची राजकीय कारकीर्द?
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….

१७ वर्षे अखंडपणे देशाचे पंतप्रधान

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे तब्बल १७ वर्षे अखंडपणे देशाच्या पंतप्रधान पदावर विराजमान होते. त्यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी हा ६,१३० दिवस इतका होता. अखेर २७ मे १९६४ रोजी त्यांच्या निधनामुळेच त्यांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीचा शेवट झाला. त्यावेळी त्यांचे वय ७४ वर्षे होते. 

स्वातंत्र्यपूर्व काळात भारतातील अंतरिम सरकारचे नेतृत पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच केले होते. पुढे १९४७ साली भारताला स्वतंत्र मिळाल्यानंतर नेहरू यांच्याकडेच देशाच्या पंतप्रधान पदाची धुरा सोपवण्यात आली. १९५१-५२ मध्ये झालेल्या देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व केले होते. 

देशतील पहिली सार्वत्रिक निवडणूक</strong>

देशातील पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत १४ पक्ष सहभागी झाले होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अखिल भारतीय जन संघ, बोल्शेवीक पार्टी ऑफ इंडिया, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, फॉरवर्ड ब्लॉक ( मार्क्सवादी), फॉरवर्ड ब्लॉक ( रुईकर गट), अखिल भारतीय हिंदू महासभा, कृषिकर लोकपक्ष, किसान मजदूर प्रजा पार्टी, भारतीय क्रांतिकारी कम्युनिस्ट पक्ष, अखिल भारतीय रामराज्य परिषद, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, अखिल भारतीय अनुसूचित जाती महासंघ आणि समाजवादी पक्ष या पक्षांचा समावेश होता. या निवडणुकीत तब्बल ५३३ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. 

नेहरूंच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या निवडणुक जिंकल्या. काँग्रेसने ४८९ जागांपैकी ३६४ जागांवर विजय मिळवत देशातील पहिल्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवले. या निवडणुकीत प्रत्येकी ४ जागांपैकी ३ जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. ही निवडणूक लढवणाऱ्या १४ राष्ट्रीय पक्षांपैकी ११ पक्षांनी विधानसभेत प्रवेश केला होता. या निवडणुकीत बोल्शेविक पार्टी ऑफ इंडिया, फॉरवर्ड ब्लॉक ( रुईकर गट), आणि भारतीय क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टी हे ३ पक्ष आपली एकही जागा निवडून आणू शकले नाहीत. पुढील काही दशकांनंतर भारतीय जनसंघाची सह शाखा असणाऱ्या भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला. 

या पहिल्या निवडणुकीत नेहरूंच्या नेतृवाखाली काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळाले कारण प्रत्यक्षात  समोर मजबूत असा विरोधक नव्हताच. शेवटी अपक्षांनी एकत्र येऊन सभागृहातील दुसरा सर्वात मोठा गट बनवला. या गटाची एकूण मते होती ७% आणि त्यांनी जिंकलेल्या एकूण जागा होत्या ३७. काँग्रेस व्यतिरिक्त सीपीआय ( १६ जागा) आणि सोशालिस्ट पार्टी (१२ जागा) फक्त हे दोनच राष्ट्रीय पक्ष दोन अंकी आकडा गाठू शकले.

मतांचा आलेख वाढला

पुढे १९५७ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरूंनी काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा विजय मिळवून दिला. ४९४ लोकसभेच्या जागांपैकी ३७१ जागांवर विजय मिळवला. यावेळीसुद्धा ४२ जागा मिळवून अपक्षांच्या गटाने सभागृहातील दुसऱ्या मोठ्या गटाचे स्थान मिळवले. या निवडणुकीत सहभागी झालेल्या इतर राष्ट्रीय पक्षांच्या कामगिरीचा आलेख उंचावला होता. दुसऱ्या लोकसभेत नेहरूंना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले नाही. 

१९६२ मधील लोकसभा निवडणूक की नेहरूंच्या मृत्यूपूर्वीची शेवटची राष्ट्रीय निवडणूक होती. या निवडणुकीत ६ राष्ट्रीय पक्ष आणि ११ मान्यताप्राप्त स्थानिक पक्षांचा समावेश होता. १० नवख्या पक्षणीसुद्धा आपले उमेदवार उभे केले होते. या निवडणुकीतही काँग्रेसने बाजी मारली. यावेळी पक्षाची आकडेवारी ही मागील आकडेवारीपेक्षा थोडीशी कमी झाली होती. यात निवडणुकीत इतर राष्ट्रीय पक्षांच्या प्रगतीचा आलेख उंचावला होता तर अपक्ष उमेदवारांची संख्या ४२ वरून २० झाली होती. 

देशातील लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत नेहरूंनी अलाहाबाद जिल्हा (पूर्व) – जोनपूर जिल्हा (पश्चिम) या मतदार संघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. दुसऱ्या आणि तिसऱ्या निवडणुक त्यांनी फुलपूर मतादारसंघातून विजय मिळवला होता. १९६२ च्या निवडणुकीत ६४,५७१ मतांनी विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांनी जेष्ठ समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचा पराभव केला.