सांगली : विधानसभा निवडणुकीत इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा विजय झाला. मात्र, हा विजय त्यांना धड साजराही करता आला नाही, आणि राज्यभर मिरवताही आला नाही. महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली. यात हा विजय दुर्लक्षित ठरला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार करता आमदार पाटील यांना पुन्हा नव्याने राजकीय मांडणी केली तरच जिल्ह्यात खचलेला नेतृत्वाचा शिरपेच डोईवर येईल अशी स्थिती निर्माण झाली आहे. इस्लामपूर मतदारसंघात विरोधकांचे वाढलेले बळ भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोलाचे भांडवल तर ठरणार आहेच, पण आमदार पाटील यांना आपल्या बालेकिल्ल्यातील ताकद अबाधित ठेवण्यासाठी अधिक जागृत राहावे लागणार असे दिसते.

इस्लामपूरला यावेळी राज्याचे सर्वोच्च पद मिळणारच अशी भाबडी आशा इस्लामपूरकरांनाच नव्हे तर अख्ख्या जिल्ह्याला होती. महाविकास आघाडी एकसंघपणे निवडणूक रिंगणात उतरणार असे दिसत होते. मात्र, आपला-तुपला अशी गटबाजीची सवय झालेल्या जिल्ह्यातील राजकारणात यावेळची विधानसभा निवडणूकही अपवाद ठरली नाही. आमदार पाटील यांना मतदारसंघातच अडकवून प्रचारासाठी राज्यभर जाता येणार नाही अशी व्यूहरचना महायुतीने यावेळी केली होती. गेल्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली होती. त्यावेळी शिवसेनेकडून गौरव नायकवडी आणि अपक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील हे होते. युती धर्मानुसार त्यांच्यावर भाजपकडून कारवाईही करण्यात आली होती. मात्र, पुन्हा भाजपने त्यांना सन्मानाने जिल्हाध्यक्ष करून कारवाई खुंटीला टांगली. आजपर्यंत विरोधकामध्ये ऐक्याचा अभाव असल्याने आमदार पाटील यांना प्रत्येक निवडणूक सोपी होती. लाखाचे मताधिक्य कायम राखत आलेल्या आमदार पाटील यांचे यावेळी एकसंघ विरोधकामुळे मताधिक्य लाखाचे बारा हजार झाले. सोयीचे राजकारण यावेळी मात्र फारसे मदतीला आले नाही ही वस्तुस्थिती आता तरी ध्यानी घ्यायला हवी आहे.

Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
kalyan municipalitys Rukminibai Hospital show that three people were bitten by stray dog
कल्याणमधील भटक्या श्वानाचे तीन जणांना चावे, भटक्या श्वानांच्या उपद्रवाने नागरिक, शाळकरी विद्यार्थी त्रस्त
how many press conference taken by dr manmohan singh
Dr. Manmohan Singh Death: डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षांत किती पत्रकार परिषदा घेतल्या? पंतप्रधान मोदींशी याची तुलना का केली जाते?

हेही वाचा – Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले

यावेळी आमदार पाटील यांचे मताधिक्य केवळ साडेतेरा हजारापर्यंत रोखण्यात महायुतीला यश आले आहे. महाविकास आघाडीतील अन्य घटक पक्षांना विश्‍वासात न घेता प्रचारात मानसन्मान न देता त्यांना गृहित धरून प्रचाराची यंत्रणा कार्यान्वित केली जात होती. गेल्या सात निवडणुकीत हे प्रकार खपून गेले. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही इस्लामपूरची निवडणूक मनावर घेतली होती, त्याला अर्थात साथ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्लामपूरची जागा मित्रपक्षाला देत असताना उमेदवारही उसनवारीवर दिला. भोसले-पाटील यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवित असताना स्थानिक पातळीवर असलेल्या महायुतीतील विरोधकांनाही चार खडे बोल सुनावून यावेळी गमजा चालणार नाहीत असा इशारा दिला होता. यामुळे महािउक गटासह विक्रम पाटील, आमदार सदाभाऊ खोत, केदार पाटील आदी मंडळी आपल्या घरचेच काम आहे या पद्धतीने कार्यरत झाले. या उलट आमदार पाटील गट अतिआत्मविश्‍वासाच्या भरवशांवर गाफील राहिला. आष्ट्यामध्ये भाजप वासीय झालेल्या वैभव शिंदे यांना आमदार पाटील यांनी जिल्हा बँकेत संधी देऊन बेरजेचे राजकारण केले असले तरी आष्ट्याने फारशी साथ दिली नाही हे उपलब्ध मतावरून दिसते. मिरज तालुक्यातील गावामध्ये लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून निर्माण झालेला संशय दूर करण्यात यश आले नाही. यामुळे वसंतदादा घराण्याला दूर करण्याचा प्रयत्नही मताधिक्य कमी करण्यात हातभार लावणारे ठरले.

हेही वाचा – मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन

आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. इस्लामपूर नगरपालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आमदार पाटील यांच्या गटाची कसोटी लागणार आहे. जे अवती भोवती कार्यकर्ते आहेत ते आता उपयुक्त किती याची चाचपणी करायला हवी. केवळ सहकारी संस्था ताब्यात आहेत, म्हणजे सगळा मतदारसंघ ताब्यात आहे असे समजण्याचे दिवस आता कालबाह्य झाले. शिराळा मतदारसंघातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मानसिंगराव नाईक यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. यामुळे आमदार पाटील यांचे तालुक्यावर एकहाती असलेल्या वर्चस्वाला तडे गेले आहेत हे मात्र निश्‍चित.

Story img Loader