दयानंद लिपारे

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यात पुन्हा लढत होणार असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले असताना आता यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही नाव पुढे आले आहे. यामुळे या मतदार संघातील लढतीला नवा आयाम मिळणार असून ती आणखी चुरशीची होऊ शकते. येथे जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनी आधीच चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे महा विकास आघाडी कडून जयंत पाटील कि प्रतीक पाटील राहणार याचीही उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांचा आढावा मुंबई येथे ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह प्रमुख नेत्यांनी घेतला. कोल्हापूर मतदार संघासाठी काही नावे सुचित काही नावे जिल्ह्यातील नेत्यांनी सुचवली आहेत. मात्र ती नेतृत्वाच्या पसंतीस उतरलेली नाहीत.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Pusad Naik family, Indranil Naik , Vasantrao Naik,
अजित पवारांसोबत गेलेल्या नाईक घराण्याला मंत्रिपदाची भेट ?
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
evm machines scam loksatta news
मारकडवाडी ठरतेय राज्यातील राजकीय संघर्षाचे केंद्र
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हातकणंगलेत पुन्हा गायकवाड

हातकणंगले मतदार संघासाठी दिवंगत खासदार उदयसिंह गायकवाड यांचे नातू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड यांचे सुपुत्र रणवीरसिंग गायकवाड यांचे नाव पुढे केले आहे.कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले रणवीरसिंग गायकवाड यांना उमेदवारी मिळाली तर गायकवाड घराण्याचे राजकारण पुन्हा चर्चेत येऊ शकते. याचवेळी या मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी असेही या बैठकीमध्ये सुचवण्यात आले.

हेही वाचा… रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघांतही भाजप आण शिंदे गटात स्पर्धा

जुने नाते ; गहिरा संपर्क

सांगली जिल्ह्यातील प्रभावी घराणे असलेल्या बापू घराण्याचा कोल्हापूरशी जुना संपर्क राहिला आहे. हातकणंगले मतदारसंघांमध्ये सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून तेथे जयंत पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वाळवा मतदारसंघात जयंत पाटील सातत्याने मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकत आले आहेत. शिराळा मतदार संघात त्यांना मानणारे पक्षाचे आमदार मानसिंगराव नाईक हे निवडून येत आहेत. खेरीज भाजपचा त्याग करून माजी आमदार शिवाजीराव नाईक यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विधानपरिषदेचे दिवंगत सभापती शिवाजीराव देशमुख यांचे सुपुत्र सत्यजित देशमुख हे त्यांचे मेहुणे आहेत. सत्यजित हे सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आता ते भाजपात आहेत.असून विधान परिषदेवर जाण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

हेही वाचा… शिंदे यांच्याकडून फडणवीसांवर कुरघोडी ; भाजपमध्ये अस्वस्थता

जयंत पाटील पुत्र रिंगणात ?

दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला अनुकूल असल्याचे मानले जाते. ही बाब लक्षात घेऊन प्रतीक पाटील यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संपर्क वाढवला आहे. विशेषतः गेल्या दिवाळीनंतर त्यांनी हातकणंगले, शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन चाचपणी सुरु केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. शुभमंगल पार पडल्यावर संपर्क काहीसा थंडावलेला आहे. असे असताना आता या मतदारसंघासाठी जयंत पाटील यांचे नाव पुढे येऊ लागले आहे. जयंत पाटील यांचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कोल्हापूर जिल्ह्यातील चारही मतदारसंघाशी जुना संपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून प्रत्येक निवडणुकीत जयंत पाटील हे या मतदारसंघातील निवडणुकीत अत्यंत सक्रिय होते. विशेष म्हणजे निवेदिता माने, कल्लाप्पांना आवाडे, राजू शेट्टी तिन्ही माजी खासदारांच्या प्रचारात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. यातूनच या उमेदवारांची प्रचार यंत्रणा कशी राबवली जाते, त्यातील कच्चे – पक्के दुवे कोणते आहेत हे त्यांनी जवळून अनुभवले आहे. हातकणंगले मतदारसंघात उभे राहिल्यास एकीकडे धैर्यशील माने तर दुसरीकडे राजू शेट्टी यांच्या प्रचार यंत्रणेला शह देऊन प्रभाव कसा निर्माण करायचा हेही ते दाखवून देऊ शकतील. दुसरीकडे, ते स्वतः लोकसभेला उभे राहून प्रतीक पाटील यांना तुलनेने सुरक्षित असणाऱ्या वाळवा विधानसभा मतदारसंघात उभे करू शकतात. प्रतीक यांना लोकसभा निवडणुकीला उभे करून निवडणुकीच्या पहिल्याच प्रयत्नात यशापयशाचा धोका घेण्यापेक्षा त्यांच्या दृष्टीने विधानसभेचा पर्याय अधिक सुरक्षित ठरू शकतो, असेही राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा… भाजपमधील निष्ठावंतांनी विखे पिता-पुत्राविरुद्ध थोपटले दंड!

राजू शेट्टी स्वबळावर

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून दुसऱ्या दिवसापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर शेट्टी महाविकास आघाडी सोबत होते. विधान परिषदेची आमदारकी स्वप्नवत असल्याने आणि शेतकरी प्रश्नांना महा विकास आघाडी सरकारकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही असे दिसल्यावर त्यांनी राम राम ठोकला. भाजप व महाविकास आघाडी या दोन्ही पासून समान अंतरावर राहून स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा शेट्टी यांनी शिरोळ तालुक्यात झालेल्या एका मेळाव्यात नुकतीच केली आहे. खासदार धैर्यशील माने यांनी मतदारसंघांमध्ये संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. माने – शेट्टी या आजी माजी खासदारांमध्ये लोकसभा निवडणुकीची लढत अपेक्षित असताना त्यामध्ये जयंत पाटील यांच्या नावाचा नाट्यमय प्रवेश झाल्याने निवडणुकीचे समीकरण बदलू लागले आहे.

Story img Loader