दिगंबर शिंदे

सांगली : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असल्याचे सांगत असले तरी अंतर्गत अस्वस्थ आहेत. सद्यस्थितीत पक्षामध्ये फुटीचे संकेत नसले तरी नजीकच्या काळात प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेली मंडळी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारण्याच्या मनस्थितीत आहेत. महापालिकेची मुदत काही दिवसांची उरली असल्याने शहराच्या राजकारणामध्ये आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप दृष्टीपथात नसल्याने सध्याच्या स्थितीत फारसे अजितदादांच्या हाती लागेलच असे दिसत नाही.

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Baramati protests that Pratibha Pawar was prevented from campaigning Inspection of Sharad Pawar bag Pune news
प्रतिभा पवार यांंना प्रचारापासून रोखल्याचे बारामतीत पडसाद; शरद पवार यांच्या बॅगची तपासणी
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
Hadapsar, NCP, Hadapsar latest news,
हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्चस्वासाठीची लढाई

रविवारी झालेल्या राजकीय नाट्यामुळे जिल्ह्यात केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गटामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुंबईच्या राजभवनामध्ये राष्ट्रवादीतील नऊ आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर अवघ्या चार तासात अजितदादा पवार आणि मिरजेचे जावई असलेले कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनाचे डिजिटल फलक मिरजेत झळकले. माजी महापौर इद्रिस नायकवडी यांनी हे शुभेच्छा फलक झळकावले आहेत. त्यांचा मुलगा अतहर नायवकडी नगरसेवक असला तरी सत्तेच्या खेळात त्यांना फारसे महत्व मिळालेले नाही. गेली पाच वर्षे महापालिकेच्या राजकारणापासून अलिप्त असलेले नायकवडी आता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी नसले तरी परीघावर येण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपचे संख्याबळ अधिक असताना महापौर निवडीमध्ये काँग्रेसच्या मदतीने सत्ताबदल करण्यात नायकवडी कुटुंबाची मदत घेण्याविना पर्याय नव्हता.त्यावेळी सर्व काही जुळणी माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी केली होती, मात्र, अखेरच्या क्षणी नायकवडी यांच्या तीव्र विरोधामुळे दिग्विजय सुर्यवंशी यांना महापौरपदाची संधी मिळाली. तेव्हापासून बागवान आपला स्वतंत्र गट करण्याच्या मनस्थितीत असताना नायकवडी यांनी वेळ न दवडता अजितदादांच्या शुभेच्छाचे फलक लावले असावेत.

हेही वाचा… नव्‍या घडामोडींमुळे आमदार बच्‍चू कडू यांचे समर्थक अस्‍वस्‍थ

जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे चार आमदार, पक्षाचे जिल्हा पदाधिकारी सध्या तरी थोरल्या साहेबांसोबत आहेत. मात्र, हीच परिस्थिती कायम राहील असेही नाही. कारण आ. जयंत पाटील यांची मदत आवश्यक असल्यानेच हा निर्णय घेतला गेला असावा असे प्रथमदर्शनी वाटते. शिराळ्याचे आमदार. मानसिंगराव नाईक यांना वाळवा तालुययातील ४८ गावातील मतदान आवश्यक आहे. याचबरोबर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद सध्या त्यांच्याकडेच आहे. यामुळे आमदार पाटील यांच्या मदतीशिवाय शिराळ्याचे ठाणे ताब्यात राहणार नाही याची जाणीव त्यांना आहे. तासगाव-कवठेमहांकाळच्या आरआर आबांचा गटाचे जय्ंत. पाटील यांच्याशी फारसे सख्य नसले तरी त्यांची निष्ठा शरद. पवार यांच्याशीच कायम राहणार आहे, तर पदवीधर मतदार संघातून विधानपरिषदेवर निवडून आलेले आ.मदार अरूण लाड यांची भूमिका सद्यस्थितीत थोरल्या पवारासोबतच असल्याचे सांगण्यात आले. यामुळे विधीमंडळातील संख्येमध्ये अजित पवार यांच्या हाती सांगली जिल्ह्यातून फारसे काही लागेल असे दिसत नाही. राजकीय भवितव्याचा विचार करून सारेजण सावध भूमिका घेत आहेत.

हेही वाचा… ठाण्यातील शिंदे गटाला आनंद परांजपे नकोसे

राष्ट्रवादीतील घडामोडीचा परिणाम सर्वच पक्षावर होणार असल्याचे आणि त्या त्या पक्षात नाराज असलेली मंडळी अजितदादांचे नेतृत्व स्वीकारतील असा अंदाज जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी व्यक्त केला आहे. जत विधानसभेचे किंगमेकर अशी त्यांची ओळख असल्याने त्यांच्या शब्दालाही जिल्ह्याच्या राजकारणात दुर्लक्षित केले जात नाही. नाराजांना अजितदादांचा पर्याय उपलब्ध झाला असल्याचे त्यांचे वक्तव्य असून हा खुद्द भाजपलाही इशारा ठरू शकतो. अजितदादांचा जिल्ह्यात स्वत:चा असा गट नसला तरी त्यांचे आबा गटाबरोबरच एकेकाळी राष्ट्रवादीतील नाराज मंडळींनी स्थापन केलेल्या दुष्काळी फोरमशी आजही सलोख्याचे संबंध आहेत. या फोरममधील बहुसंख्य मंडळी सध्या भाजपमध्ये आहेत. त्यांची भूमिकाही आता कशी राहणार हे पाहणे औत्सुययाचे ठरणार आहे.