आगामी लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून येथे सत्ताधारी महाआघाडीमधील राष्ट्रीय जनता दल (राजद) आणि संयुक्त जनता दल (जदयू) यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. नुकतेच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जदयू पक्षाचे अध्यक्षपद स्वत:कडे घेतले आहे. असे असतानाच आता त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल केले आहेत. त्यांनी पक्षातील नेते लल्लन सिंह यांच्या जवळच्या खासदारांना कार्यकारिणीतून वगळले आहे.

फूट टाळण्यासाठी मोठा निर्णय

जदयू पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांची राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्याशी जवळीक वाढल्याचे म्हटले जाते. याच कारणामुळे नितीश कुमार यांनी लल्लन सिंह यांना जदयूच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून दूर केले आणि पक्षाचे अध्यक्षपद स्वत:कडे ठेवले. पक्षातील संभाव्य फूट टाळण्यासाठी नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतल्याचे तेव्हा म्हणण्यात आले. त्यानंतर आता नितीश कुमार यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत मोठे बदल केले आहेत. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत एकूण २१ नव्या नेत्यांची नियुक्ती केली आहे. या नव्या नियुक्त्या करताना त्यांनी सध्या लोकसभेत खासदार असणाऱ्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांना वगळले आहे. हे सहा खासदार जदयूचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह यांच्या जवळचे मानले जातात.

wardha Aam Aadmi Party which helped Amar Kale win taken candidate wise stance now
आघाडीस धक्का! ‘ आप ‘चा दोन ठिकाणी आघाडीस तर दोन ठिकाणी अपक्षास पाठिंबा.
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur district thackeray shiv sena chief devendra godbole resigned from his post
ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाचा राजीनामा
Jitendra Awhad on Ajit Pawar
Jitendra Awhad: “अजित पवार मर्द असतील तर…”, जितेंद्र आव्हाड यांचे आक्षेपार्ह विधान; अजित पवार गटाचा पलटवार
Sunil Tatkare On Jayant Patil
Sunil Tatkare : ‘अजित पवारांना व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न केला तर…’, सुनील तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा
end the Jayant Patils reckless politics says Sadabhau Khot
जयंत पाटलांच्या अविचारी राजकारणाला पूर्णविराम द्या – सदाभाऊ खोत
Gopal Shetty Borivali Vidhansabha Contituency
Gopal Shetty : गोपाळ शेट्टींची बंडखोरी की माघार? फडणवीसांना भेटून आल्यानंतर भूमिका काय?
Mallikarjun Kharge marathi news
Mallikarjun Kharge: केवळ सवंग घोषणा नकोत! मल्लिकार्जुन खरगेंचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

सहा नव्या सचिवांची नियुक्ती

नितीश कुमार यांनी नव्याने नियुक्ती केलेल्या नेत्यांत राज्यसभेचे खासदार बशिष्ठ नारायण सिंह यांचा समावेश आहे. त्यांची पक्षाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्षाची जबाबदारी अगोदर माजी खासदार मंगनीलाल मंडल यांच्यावर होती. माजी खासदार के. सी. त्यागी हे जदयूचे सल्लागार आणि राष्ट्रीय प्रवक्ते होते. त्यांच्याकडे आता पक्षाचे राजकीय सल्लागार आणि राष्ट्रीय प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नितीश कुमार यांनी सहा नव्या सचिवांचीदेखील नियुक्ती केली आहे.

विधानसभा-लोकसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी प्रयत्न

सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीसोबतच बिहारच्या विधानसभेचीही निवडणूक घ्यावी, असे मत नितीश कुमार यांचे आहे. त्यासाठी नितीश कुमार लालूप्रसाद यादव यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. जदयू पक्षातील अनेक नेत्यांनाही लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र व्हाव्यात असे वाटत आहे, त्यासाठी हे नेते नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकत आहेत.

जाहिरातीत तेजस्वी यादव यांचा उल्लेख नाही

सध्या २४३ सदस्यीय बिहार विधानसभेत राजद हा सर्वांत मोठा पक्ष आहे. राजदचे एकूण ७९ आमदार आहेत. त्यानंतर भाजपाचे एकूण ७८ आमदार आहेत. जदूयचे फक्त ४५ आमदार आहेत. बिहारची आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये होणार आहे. बिहारमध्ये सध्या राजद आणि जदयू यांच्यात नाराजी असल्याचे म्हटले जात असताना सर्व काही आलबेल आहे, असे या दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून सांगितले जाते. असे असले तरीही दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत. बिहार सरकारने नुकतेच आरोग्य विभागाची एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा कोठेही उल्लेख करण्यात आलेला नव्हता. खरं पाहता तेजस्वी यादव हे आरोग्यमंत्री आहेत, तरीदेखील त्यांचा या जाहिरातीत साधा उल्लेखही नसल्यामुळे राजद पक्षातील नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. या जाहिरातीला उत्तर म्हणून राजदच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मुख्यालय परिसरात एक मोठे पोस्टर लावले होते. तेजस्वी यादव यांनी सहा लाख लोकांना नोकरी देण्याचे आश्वासन पूर्ण केले आहे. तेजस्वी यादव हे जातीआधारित सर्वेक्षणाची खात्री देत आहेत, असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला होता.

“नावाचा तरी उल्लेख करायला हवा होता”

बिहार सरकारच्या या पोस्टरवर राजदच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. “राजदकडे आरोग्य विभागाची महत्त्वाची जबाबदारी आहे, याची सर्वांनाच कल्पना आहे. त्या जाहिरातीवर आरोग्यमंत्र्यांचा फोटो नसला तरी कमीत कमी नावाचा तरी उल्लेख असायला हवा होता. नुकतेच ९४ हजार शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळीही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला नाही. आम्ही १० लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. आमचा तो अजेंडा होता. नितीश कुमार यांनी आमच्याच कल्पनेचा आधार घेतला”, असे राजदच्या एका नेत्याने म्हटले.

“नितीश कुमार यांना पक्ष फुटण्याची भीती”

तसेच नितीश कुमार यांना त्यांच्या पक्षातील काही नेते अन्य पक्षात जाण्याची भीती वाटत आहे, त्यामुळेच लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्र घ्यावी, असे त्यांना वाटत आहे. मात्र, दीड वर्षांआधीच लोकांवर निवडणूक का लादावी? असा सवालही या राजदच्या नेत्याने केला.