झारखंडमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. कथित जमीन घोटाळ्यात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने सातव्यांदा नोटीस बजावली आहे. त्यानंतर सोरेन यांना अटक होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. असे असतानाच सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) पक्षाचे आमदार सरफराज अहमद यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. असे असतानाच आता सत्ताधारी युतीतील आमदारांनी आम्ही हेमंत सोरेन यांच्यासोबत आहेत, आमचा त्यांना पाठिंबा आहे, असे सांगितले आहे.

“मुख्यमंत्रिपद सोडणार नाही, आमदारांनी विदेशात जाऊ नये”

बुधवारी (३ जानेवारी) जेएमएमच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी युतीच्या आमदारांची सोरेन यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत सत्ताधारी गटाचे जवळपास सर्वच आमदार होते. या बैठकीत आमदारांनी आम्ही सोरेन यांच्यासोबत असल्याची भूमिका मांडली. आपल्या सरकारला कोणताही धोका नाही, आपले सरकार स्थिर आहे, असे एकमत बैठकीतील आमदारांचे झाले; तर दुसरीकडे मी मुख्यमंत्रिपदावरून पायऊतार होणार नाही, असे सोरेन यांनी स्पष्ट केले. तसेच सध्याच्या काळात अफवांना बळ मिळू नये यासाठी आमदारांनी विदेशात जाणे टाळावे, असे आवाहनही सोरेन यांनी आपल्या आमदारांना केले आहे.

transgenders pune police
पुणे : तृतीयपंथीयांसाठी पोलीस ठाण्यात कक्ष
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Keshavrao Jagtap statement
बारामतीचा विकास हाच अजित पवार यांचा ध्यास- केशवराव जगताप
interfaith couple legal protection by maharashtra government
आता बिनधास्त करा प्रेमविवाह! ,सरकार देणार ‘सेफ हाऊस’
delhi woman chief minister
Delhi Chief Minister: दिल्लीत पुन्हा ‘महिलाराज’? मुख्यमंत्रीपदासाठी ‘या’ महिला आमदारांची नावं चर्चेत!
ichalkaranji municipal corporation
इचलकरंजी महानगरपालिकेचा एक हजार कोटींचा जीएसटी परतावा मिळावा, राहुल आवाडे यांची मागणी
Delhi Election 2025
Delhi Elections : मसाज पार्लरच्या कंपन्या एग्झिट पोल्स घेतायत की काय? आपच्या खासदाराची टिप्पणी
Maharashtra FM Ajit Pawar on state budget
राज्याच्या अर्थसंकल्पात ‘लाडक्या बहिणी’, सामान्य नागरिक केंद्रबिंदू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

झारखंडमध्ये कोणाचे किती आमदार?

सध्या सत्ताधारी युतीमध्ये एकूण ४७ आमदार आहेत. यात जेएमएमचे २९, काँग्रेसचे १७ आणि राजद पक्षाचा १ आमदार आहे. यातील ४५ आमदार बुधवारच्या बैठकीला उपस्थित होते. ८१ आमदारांच्या झारखंडच्या विधानसभेत भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीत एकूण २९ आमदार आहेत. यात भाजपाचे २६, तर एजेएसयू पक्षाचे ३ आमदार आहेत.

“सर्व आमदार एकत्र, षडयंत्र यशस्वी होणार नाही”

बुधवारच्या बैठकीनंतर झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर या बैठकीविषयी माहिती दिली. तसेच मुख्यमंत्री सोरेन आणि राज्य सरकारची भूमिका सांगितली. “बैठकीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. सर्वच आमदारांनी मुख्यमंत्र्यांप्रती विश्वास व्यक्त केला, तर मी नेहमीच तुमच्यासोबत होतो आणि भविष्यातही असेन, असे सोरेन यांनी आमदारांना सांगितले. सर्व आमदार कोणत्याही परिस्थितीत एकत्र आहेत. सरकार विरोधातील कोणतेही षडयंत्र यशस्वी होणार नाही. सोरेन यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विकासाचे आणि जनहिताचे काम करत राहील,” असे एक्सवरील पोस्टमध्ये म्हणण्यात आले होते.

सरफराज अहमद यांच्या राजीनाम्याचे कारण काय?

गांडेय मतदारसंघाचे आमदार सरफराज अहमद यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे मी हा राजीनामा दिला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. तर ईडीकडून सोरेन यांच्यावर काही कारवाई झाल्यास, सोरेन यांच्या पत्नीला गांडेय या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवता यावी आणि त्यांना मुख्यमंत्रिपद देता यावे, म्हणून सरफराज यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे, असा आरोप भाजपाने केला आहे. सोरेन यांनी भाजपाच्या आरोपांना कोणताही आधार नाही, हे सर्व दावे निरर्थक आहेत असे स्पष्टीकरण दिले आहे.

ईडीची बुधवारी ठिकठिकाणी छापेमारी

दरम्यान, एकीकडे हेमंत सोरेन यांना ईडीची सातवी नोटीस आलेली असताना बुधवारीच ईडीने साहेबगंजचे उपायुक्त राम निवास यादव आणि सोरेन यांचे माध्यम सल्लागार अभिषेक प्रसाद ऊर्फ पिंटू यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर छापेमारी केली. येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे

Story img Loader