उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातील अतिक्रमण हटवण्याचं काम सुरु आहे. यादरम्यान, एका महिलेने स्वत:च्या घराला आग लावून घेतली. यात महिला आणि तिच्या मुलीचा मृत्यू झाला. यानंतर ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. देश संविधानाने नाहीतर बुलडोझरने चालण्याचा भाजपा प्रयत्न करत आहे, असं औवेसी यांनी म्हटलं. याला आता केंद्रीय मंत्रि गिरिराज सिंह यांनी औवेसींना प्रत्युत्तर दिलं आहे. ओवैसी बोलतात तेव्हा तोंडातून विषच बाहेर पडत, अशी घणाघाती टीका गिरिराज सिंह यांनी केली आहे.
गिरिराज सिंह म्हणाले, “ओवैसी बोलतात तेव्हा तोंडातून विषच बाहेर पडत असतं. ओवैसी कधीही कायद्याला धरून बोलत नाही. जिन्ना तर गेले आहेत, पण त्यांच्या वारसदाराच्या रुपाने काही लोकं अद्यापही राहिली आहेत. आजपर्यंत देशात हिंदूकडून एकाही तजियावर दगडफेक करण्यात आली नाही.”
हेही वाचा : प्रचाराच्या तोफा थंडावल्या; TIPRA Motha पक्षामुळे भाजपासमोर कडवे आव्हान
असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले होते?
कानपूरच्या घटनेवर बोलताना असदुद्दीने ओवैसी यांनी म्हटल की, “उत्तर प्रदेशमध्ये बुलडोझरचं राजकारण करणाऱ्यांनी एका आई आणि मुलाचा जीव घेतला. पण, हा देश संविधानाने नाहीतर बुलडोझरने चालतो. भाजपा फक्त तोडफोड करायची आहे, जोडायचं नाही,” असं टीकास्र ओवैसी यांनी केलं.
काय आहे प्रकरण?
सोमवारी कानपूर येथेली मडौली गावात अतिक्रमणाची कारवाई सुरु होती. तेव्हा एका महिलेने आपल्या घराला आग लावली. यामध्ये दोघींचाही होरपळून मृत्यू झाला आहे. यानंतर नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर अधिकारी ज्ञानेश्वर प्रसाद याचं निलंबन करण्यात आलं आहे. पोलीस या अधिकाऱ्याची चौकशी करत आहे.