ठाणे : हत्या करणे भाजपच्या डाव्या हाताचा खेळ आहे. जसे महात्मा गांधीची हत्या करण्यात आली. हा देश शांतीसाठी ओळखला जातो. आम्ही गांधी, नेहरू यांची पूजा करणारे आहोत. आम्ही अब्दुल कलामांच्या मार्गाने चालणारे आहोत. परंतु आता हा देश गोळवलकर यांच्या मार्गाने जात आहे, अशी गंभीर टीका राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

मुंब्रा-कळवा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते (शरद पवार गट) जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी एक सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही टीका केली. बदलापूर येथील शाळेमध्ये दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाले होते. याप्रकरणातील शाळेचे दोन विश्वस्थांचा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. आरोपीची आई बोलू लागल्यानंतर त्याची पोलीस वाहनामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या आरोपीला माझे कोणतेही समर्थन नाही. पोलिसांना त्याच्यावर गोळ्या झाडण्याची काय आवश्यकता होती? कारण भीती ही होती की त्याने सांगितले असते की हे दोन विश्वस्त गुन्हेगार आहेत, असा आरोपही आव्हाड यांनी केला. सरकारी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्यापासून वेतन मिळणार नाही. कारण महाराष्ट्राची तिजोरी रिकामी झाली आहे, असेही आव्हाड म्हणाले.

Chief Minister Eknath Shinde started campaigning for assembly elections in Mumbai print politics news
मुंबई झोपडीमुक्त करणार- मुख्यमंत्री
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
BJP state president Bawankule warning about withdrawing BJP's rebel candidate application
अर्ज मागे घेतले नाही तर पक्षाचे दरवाजे बंद; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा बंडखोरांना इशारा
Anis Ahmed Bhai Rebellion Candidacy Congress print politics news
आपटीबार: ‘लाठी भी मेरी और भैस भी मेरी’
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
halba community candidates in three constituencies in nagpur against bjp and congress
हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार 
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा >>>हलबा समाजाच्या उमेदवारीचा फटका कुणाला? भाजप, काँग्रेसवर नाराजी तीन मतदारसंघात उमेदवार देणार

अजित पवार यांच्यावर बोचरी टीका

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे. परंतु एक दिवस अजित पवार येतात आणि शरद पवारांना धक्का देतात. त्यांच्याकडील ‘घड्याळ’ घेतात. अजित पवारांचा गट हा पाकीटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वत:चे वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजलो असतो. ज्या काकांनी देशभरात स्वत:चा पक्ष पसरवला आणि वाढवला. त्या पक्षाला तुम्ही माझं म्हणत हिसकावून घेतले. पण जनतेला सत्य माहीत आहे, असे आव्हाड म्हणाले.