भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे खासदार गौतम गंभीर एका मुलाखतीमुळे खूप चर्चेत आले. माजी क्रिकेटपटूंनी पान मसाल्याच्या जाहिराती केल्यामुळे गौतम गंभीरने त्यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गौतम गंभीर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासमोरच भाजपाच्या नेत्यांना, खासदारांनाही फैलावर घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला ९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिल्ली येथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गंभीर यांनी आपल्या नेहमीच्या तापट स्वभावाचे दर्शन घडवून दिले, त्यामुळे पक्षात त्यांच्याबद्दल अस्वस्थता आहे. २०१९ साली पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ५५ टक्के मतदान घेऊन गंभीर यांनी विजय मिळवला होता.

गंभीर यांच्या वर्तनाचा दाखला देऊन भाजपामधील काही नेत्यांनी त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर दुसऱ्या गटाचे मानणे आहे की, गंभीर यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये. जेणेकरून पक्षाला त्यांच्यापासून दूर होण्याची संधी मिळू शकेल. तर काहींनी गंभीर यांच्या वर्तनावर आणि त्याच्या रागीट स्वभावावर तीव्र आक्षेप नोंदविला आहे. दिल्लीच्या विश्वास नगरमधील भाजपाचे आमदार ओम प्रकाश शर्मा यांनी सांगितले की, गंभीर यांचे याआधीही अनेकदा स्वपक्षातील पदाधिकाऱ्यांसमवेत खटके उडालेले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, भाजपा दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेव, गांधी नगरचे आमदार अनिल वाजपेयी आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गंभीरचे वाद झालेले आहेत. त्यावर गंभीर किंवा त्याच्या समर्थकांनी आजवर भाष्य केलेले नाही.

FIITJEE Chairman DK Goel abused employee during an online meeting video viral on social media
“कोर्टात जा आणि तक्रार कर…”, नामांकित कोचिंग इन्स्टिट्यूटच्या चेअरमनने केली शिवीगाळ, मीटिंगमध्ये कर्मचाऱ्याला ओरडला अन्…, पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Nana Patole
Nana Patole : “आमचे सर्व खासदार…”, महाराष्ट्रात ‘ऑपरेशन लोटस’च्या चर्चांवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Devendra Fadnavis, Eknath Shinde and Ajit Pawar stake claim to form Mahayuti govt in Maharashtra
मुख्यमंत्री केवळ तांत्रिक व्यवस्था’ : तिघांनाही एकत्रित निर्णय घेण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच
Rashtriya Swayamsevak Sangh on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड होताच संघ स्वयंसेवकामध्ये आनंद…..
delay in Maharashtra Chief Minister face announcement
अग्रलेख : विलंब-शोभा!

हे वाचा >> Video: विराटशी झालेल्या भांडणावर गौतम गंभीरनं अखेर सोडलं मौन! १ मेच्या रात्री नेमकं काय घडलं? म्हणाला…!

भाजपाच्या एका नेत्याने सांगितले की, ही पहिली वेळ नाही. याच्या आधीही गंभीर यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर अवमान केला आहे. यावेळी बदल एवढाच झाला की, मंचावर केंद्रातील वरिष्ठ मंत्री उपस्थित होत्या. प्रश्न फक्त एवढाच आहे की, अशा स्वभावाच्या व्यक्तिला पक्ष आणखी किती काळ सहन करणार आहे. गांधी नगरचे आमदार वाजपेयी यांच्यासमवेत नुकताच गंभीर यांचा जाहीर वाद झाला. मागच्यावर्षी झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीटवाटपावरूनही कार्यालयीन पदाधिकारी यांच्यासमवेत जिल्हा बैठकात गंभीरचे वाद झाले होते, अशीही माहिती या नेत्याने दिली.

पक्षातील आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, गंभीर यांच्या वर्तनावर केवळ राष्ट्रीय नेतृत्वच बंधन आणू शकतात. खासदार असल्यामुळे प्रदेश कार्यकारिणी त्यांच्यावर काहीही कारवाई करू शकत नाही. आम्ही फक्त राष्ट्रीय नेतृत्वाला याबद्दल कारवाई करण्यास सुचवू शकतो. आता पुढे बघू केंद्रातून त्यांच्यावर काही कारवाई होते की नाही.

गंभीर यांच्या गैरव्यवहाराची केंद्राकडे तक्रार

मागच्यावर्षी आमदार वाजपेयी यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्याकडे गंभीर यांच्याशी निगडित एका प्रकरणाची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी केली होती. महानगरपालिकेच्या प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडची जमीन गंभीरच्या सामाजिक संस्थेला सामुदायिक किचन, ग्रंथालय आणि इतर प्रकल्पांसाठी बेकायदेशीररित्या देण्यात आली होती. वाजपेयी यांनी या प्रकरणात गंभीर यांचे नाव न घेता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही मागच्यावर्षी फेब्रुवारीमध्ये पत्र लिहिले होते. गंभीर यानेच त्याच्या एनजीओच्या माध्यमातून “जन रसोई” चालविण्यासाठी जागा मिळावी, यासंदर्भात पत्र दिले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून तीन हजार लोकांना एक रुपयामध्ये जेवण दिले जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तसेच या जागेवर ग्रंथालय उभारण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते.

हे ही वाचा >> गौतम गंभीरचं मोठं विधान; म्हणाला, “२००७ व २०११च्या वर्ल्डकपचं श्रेय एका व्यक्तीलाच…”, रोख नेमका कुणाकडे?

बुधवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासमोर झालेल्या गोंधळाबाबत माहिती देताना प्रत्यक्ष साक्षीदारांनी सांगितले की, गंभीर यांनी कार्यक्रमस्थळी आल्या आल्या आमदार ओम प्रकाश शर्मा यांच्या उपस्थितीवरून प्रश्न विचारला. शर्मा यांचा मतदारसंघ वेगळा असून ते याठिकाणी कशासाठी आले? असा पवित्रा गंभीरने घेतला. तसेच आमदारांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि काही व्यावसायिकांची बंद दाराआड बैठक घेतल्याच्या मुद्द्यावरही गंभीरने कडाडून टीका केली. दिल्लीमधील भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गंभीर आणि इतरांचे खटके उडण्याचे कारण श्रेयवाद असल्याचे सांगितले जाते. सीतारमन यांना कार्यक्रमाला कुणी आणले, याच्या श्रेयावरून वाद निर्माण झाला होता.

दिल्लीमधील भाजपा कार्यालयीन पदाधिकाऱ्याने सांगितले, “त्यांनी (गंभीर) त्यांच्या मतदारसंघात जन रसोई कॅन्टीन सारखे सामाजिक उपक्रम हाती घेतले. पण पक्षाच्या बैठकांना आणि कार्यक्रमांना मात्र त्यांची अनुपस्थिती असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या महिन्यात तीन देशांचा मोठा दौरा करून भारतात परतले होते. तेव्हा पालम विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीचे आमदार खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र गौतम गंभीर यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली. गंभीर यांनी खासदार झाल्यापासून पक्षातील अनेकांशी वैर घेतले आहे. वैयक्तिक स्तरावर खेळाडू म्हणून ते कदाचित लोकप्रिय असू शकतील, पण त्यांच्यात संघ भावनेचा अभाव आहे.” आणखी एका पदाधिकाऱ्याने सांगतिले की, जर गंभीरच्या जागी दुसरा कुणीही नेता असता तर पक्षाने त्याच्यावर आतापर्यंत कारवाई केली असती.

तर काही लोक गंभीरला पाठिंबा देणारेही आहेत. त्यांच्या एका समर्थकाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, गंभीरचे विरोधक त्याला जाणूनबुजून लक्ष्य करत आहेत. गंभीर एक मुक्त विचारांचा माणूस असून आपले विचार ठामपणे मांडणे, ही त्याची शैली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गंभीरची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र पक्षातीलच काही नेत्यांनी रचले आहे. त्याच्या लोकसभा मतदारसंघातील गंभीर एकमेव लोकप्रिय नेता आहे. राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून मतदारसंघात सामाजिक सेवा देण्याचा उपक्रम तो राबवत होता. पक्षातील स्वार्थी लोक गंभीरचा विरोध करत असून त्याला लक्ष्य करत आहेत, असा आरोप या नेत्याने केला.

Story img Loader