मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ठाणे आणि कल्याण हे दोन मतदारसंघ प्रतिष्ठेचे असल्याने या दोन्ही मतदारसंघांवर त्यांनी जोर लावला आहे. त्यातही कल्याणमध्ये पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाहीत. त्यातूनच कल्याणमध्ये मनसेशी जुळवून घेण्यावर त्यांनी भर दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याणमध्ये मनसेचे राजू पाटील हे आमदार आहेत. डाॅ. शिंदे यांच्याबद्दल मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी या एका जागेसाठी मतदारसंघातील छोट्या मोठ्या सर्वच पक्षांना गोंजरण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे यांनी मुलासाठी मनसेचे एक जादा इंजिन लावण्याची तयारी ठेवली आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरील बैठकीत महायुतीतील राज मार्गासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी लाल गलिचा अंथरल्याचे कळते.

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

१९७७ पासून भाजपचा बालेकिल्ला असलेला कल्याण मतदारसंघ १९९६ पासून शिवसेनेचा गड झाला आहे. १९८४ चा अपवाद वगळता (काँग्रेसचे शांताराम घोलप) हा मतदारसंघ शिवसेना किंवा भाजपचा राहिलेला आहे. २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लाटेत या मतदारसंघातून नुकतेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन बाहेर पडलेले डाॅ. श्रीकांत शिंदे हे पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर २०१९ मध्ये ते अडीच लाख मतांनी पुन्हा विजयी झाले आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांचा या उमेदवारीला विरोध आहे. मध्यंतरी शिंदे आणि भाजपमध्ये फारच ताणले गेले होते. श्रीकांत शिंदे यांनी परत निवडणूक न लढविण्याची भाषा केली होती. श्रीकांत शिंदे यांचे स्थानिक भाजप नेत्यांशी फारसे जमत नसले तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वांना बरोबर घेऊन जाण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

हेही वाचा – आढळरावांविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्यांचे मनोमिलन कसे होणार? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

भाजपचा विरोध लक्षात घेऊनच इतर पक्षांची ताकद मुलाच्या मागे उभी करीत आहेत. या मतदारसंघात मनसेचे विद्यमान आमदार प्रमोद (राजू) पाटील हे मागील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यांनी एक लाख २२ हजारापेक्षा जास्त मते घेतलेली आहेत. सध्या कल्याण ग्रामीणचे आमदार असलेल्या प्रमोद (राजू) पाटील यांची ताकद महत्वाची मानली जाते. त्यामुळे या प्रतिष्ठेच्या एका जागेसाठी शिंदे यांना महायुतीतील राज मार्ग मान्य आहे. त्याबदल्यात मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघ मनसेला सोडण्याची तयारी असल्याचे समजते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan constituency shrikant shinde everything by cm for good of child print politics news ssb