मुख्यमंत्रीपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी आरोपी असलेले कल्याण पूर्वेचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळू न देण्यासाठी शिवसेनेने चंग बांधला असून तो मतदारसंघ महेश गायकवाड यांना मिळावा असा शिंदे गटाचा आग्रह आहे. त्यासाठी कल्याण पूर्व घेऊन कल्याण पश्चिम देण्याची शिंदे गटाची तयारी आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमचे भाजपचे इच्छुक नरेंद्र पवार यांना उमेदवारीची लॉटरी लागू शकते.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आमदार गणपत गायकवाड शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात मागील पाच महिन्यांपासून तुरुंगात आहेत. ते तुरुंगात असले तरी त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या मतदारसंघात कार्यरत आहेत. लोकसभेच्या प्रचारात त्या कधी उद्धव ठाकरे यांच्या गटाबरोबर तर कधी शिंदे सेनेबरोबर पाहायला मिळाल्या. असे असले तरी शिंदे गटाचा गणपत गायकवाड यांच्याविषयीचा वैरभाव कायम आहे. गायकवाड यांचे समर्थकही शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांशी फटकून असतात.
हेही वाचा >>>कारण राजकारण: आदित्य ठाकरेंसाठी वरळी यंदा कठीण?
खासदार श्रीकांत शिंदे हे आपले समर्थक महेश गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. कल्याण पूर्वेतून महेश गायकवाड यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गटाकडे असलेला कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडण्याची शिंदे गटाची तयारी आहे. यासाठी या मतदारसंघातील विद्यामान आमदार विश्वनाथ भोईर यांची समजूत काढली जाईल, असे सांगण्यात येते. काहीही झाले तरी गणपत गायकवाड यांना महायुतीची उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न आहेत. त्यामुळे भाजपमध्ये मात्र कमालीची अस्वस्थता आहे.
कल्याण पूर्वेवर विशेष लक्ष
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी फक्त अंबरनाथ मतदारसंघ शिंदे गटाच्या ताब्यात आहे. उर्वरित डोंबिवली, उल्हासनगर, कल्याण पूर्व हे मतदारसंघ भाजपकडे, कल्याण ग्रामीण मनसेकडे तर कळवा-मुंब्रा हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढावी म्हणून मुख्यमंत्री स्वत: आग्रही आहेत. त्यातही कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण मतदारसंघात शिंदे गटाचा चांगला प्रभाव असल्याने या दोन मतदारसंघांवर शिवसेनेचे लक्ष आहे.
हेही वाचा… निवृत्त’ हितेंद्र ठाकूर पुन्हा लढणार?
कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड यांची उमेदवारी हाणून पाडण्यासाठी शिंदे गट कल्याण पश्चिम मतदारसंघ भाजपला सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.
भाजपमध्ये अस्वस्थता
आमदार गणपत गायकवाड हे सुरुवातीची दहा वर्षे अपक्ष म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली. कल्याण पूर्वेत आमदार गायकवाड यांचा हुकमी मतदार आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार गायकवाड यांनी आपण महायुतीच्या उमेदवाराबरोबर असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या पत्नी महायुतीच्या व्यासपीठावर दिसत होत्या. ठाकरे गटाच्या कल्याण लोकसभेतील उमेदवार वैशाली दरेकर यांना कल्याण पूर्वेत ५४ हजार पडलेली मते ‘कोणाची’ हे लपून राहिलेले नाही. या मतदारसंघात शिंदे यांना ८७ हजार मतदान झाले. तुरुंगात असले तरी गायकवाड पत्नीच्या माध्यमातून कामाला लागले आहेत. वेळप्रसंगी पत्नीला रिंगणात उतरविण्याची त्यांची तयारी आहे.
हेही वाचा… Assembly Election 2024: भाजपच्या ठाण्यात केळकरांची कोंडी?
प्रत्येक राजकीय पक्ष २८८ जागांवर निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याप्रमाणे शिवसेनाही प्रत्येक मतदारसंघात तयारी करत आहे. कल्याण पूर्वेचाही त्यात समावेश आहे. नंतर युतीचे नेते काय निर्णय घेतात, त्यावर जागावाटप ठरेल.- गोपाळ लांडगे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना.
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल. तो निवडूनही आणला जाईल. येथे उमेदवार कोण असेल याचा निर्णय प्रदेश नेते घेतील.- नरेंद्र सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष, भाजप (कल्याण जिल्हा)