या लोकसभा निवडणुकीचे निकाल अनेकांना अनपेक्षित होते. एकीकडे सत्ताधारी भाजपाने दिलेला ‘चारशेपार’चा नारा फोल ठरून त्यांना बहुमत गमवावे लागले, तर दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीने दमदार पुनरागमन केले. याबरोबरच इतरही अनेक आश्चर्यकारक आणि धक्कादायक गोष्टी या निवडणुकीमध्ये घडल्या. अनेक बॉलीवूड स्टार्सही या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. बॉलीवूड स्टार्सनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. मात्र, या निवडणुकीमध्ये कंगना रणौतच्या उमेदवारीची आणि विजयाचीही बरीच चर्चा झाली. मात्र, या लोकसभा निवडणुकीमधील कंगनाच्या विजयाने एक अजबच योगायोग साध्य झाला आहे. एनडीएचा एक महत्त्वाचा आणि दीर्घकाळचा मित्रपक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी सुरुवातीला बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावून पाहिले होते. तेव्हा त्यांनी कंगना रणौतबरोबर पहिला चित्रपट केला होता. आता त्यांचं संसदेत पुनर्मिलन होत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा रंगल्या आहेत. या दोघांचीही फिल्मी कारकीर्द आणि राजकीय आखाड्यातील कामगिरी कशी राहिली आहे, याचा आढावा घेऊयात.

हेही वाचा : मोहन भागवतांच्या कानपिचक्या संघ आणि भाजपामधील अंतर वाढल्याच्या निदर्शक आहेत का?

uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Nitin Gadkari Umarkhed, Nitin Gadkari Kisan Wankhade,
“काँग्रेसने जातीयवाद आणि सांप्रदायिकतेच विष कालवले,” नितीन गडकरी यांची यवतमाळात टीका
Amit Shah on Uddhav Thackeray
Amit Shah : “उद्धव ठाकरे तुमच्यात दम असेल तर…”, अमित शाहांचं भर सभेत खुलं आव्हान, म्हणाले…
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Ramdas Athawales message of unity to Advocate prakash ambedkar
रामदास आठवलेंकडून ॲड.आंबेडकरांना पुन्हा ऐक्याची साद; म्हणाले, ‘आपण दोघेही नरेंद्र मोदींच्या..’
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?

कोण आहेत चिराग पासवान?

चिराग पासवान हे बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे दिवंगत नेता रामविलास पासवान यांचे चिरंजीव आहेत. ते सध्या बिहारमधील हाजीपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचे वडील रामविलास पासवान हे देखील केंद्रीय मंत्री होते. त्यांना राजकारणातील ‘हवामान तज्ज्ञ’ म्हणून ओळखले जायचे. ते तब्बल नऊवेळा लोकसभेचे तर दोनवेळा राज्यसभेचे खासदार राहिले होते. २००० साली स्थापन केलेल्या लोजपाने २००४ साली एनडीए आघाडीत प्रवेश केला. देशाच्या राजकारणाची हवा कोणत्या दिशेने आहे, हे ओळखून त्याबरहुकूम आपल्या पक्षाची रणनीती ठरवण्यामध्ये ते वस्ताद मानले जायचे. त्यांचे चिरंजीव चिराग पासवान यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर बॉलीवूडमध्येही आपले नशीब आजमावून पाहिले होते. मात्र, तिथे फार काही करता न आल्याने त्यांनी राजकारणात उतरून आपल्या वडिलांचा पक्ष सांभळणे सोयीस्कर समजले. त्यांनी पहिल्यांदा २०१४ साली लोकसभेची निवडणूक जिंकून संसदेत प्रवेश केला. पंतप्रधान मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात चिराग पासवान यांना आपल्या वडिलांचेच म्हणजेच अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. लोक जनशक्ती पार्टी हा पक्ष बिहारमधील दलितांचे प्रतिनिधित्व करत असल्याचा दावा करतो. बिहारमधील पासवान या दलित समाजाचे लोक, लोक जनशक्ती पार्टीचे पारंपरिक मतदार आहेत. या लोकसभा निवडणुकीमध्ये लोजपाने बिहारमध्ये पाच जागा लढवल्या होत्या. त्या पाचही जागांवर पक्षाला विजय मिळाला आहे. हाजीपूर मतदारसंघामध्ये चिराग पासवान यांच्यासमोर राष्ट्रीय जनता दलाच्या शिवचंद्र राम यांचे आव्हान होते. मात्र, चिराग पासवान यांनी तब्बल एक लाख ७० हजारांच्या मताधिक्क्याने विजय प्राप्त केला आहे.

बॉलीवूडची ‘क्वीन’ ते खासदार कंगना रणौत

कंगना रणौतचा राजकीय प्रवास अलीकडेच सुरू झाला आहे. ती आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे तोंडभरून कौतुक करण्यामुळे कंगना रणौतला राजकारणात रस असल्याच्या चर्चा आधीपासूनच होत्या. या लोकसभा निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशमधील मंडी मतदारसंघातून तिला भाजपाकडून तिकीट मिळाल्यानंतर या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. भाजपाकडून तिकीट मिळाल्यानंतर कंगनाने ट्विट करत म्हटले होते की, “भारत आणि भारतीय जनता पक्ष या दोहोंवर माझे प्रेम आहे. मला भाजपाकडून कायमच पाठिंबा मिळाला आहे. आज भाजपाने माझे नाव लोकसभेची उमेदवार म्हणून जाहीर केले. माझे जन्मस्थळ असलेल्या हिमाचलच्या मंडी या ठिकाणाहून मला उमेदवारी देण्यात आली आहे, माझ्यासाठी हा खूप मोठा बहुमान आहे. मी एक चांगली कार्यकर्ता होईन आणि लोकसेवेसाठी काम करेन.” या निवडणुकीमध्ये कंगनासमोर काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान होते. कंगनाने ५ लाख ३७ हजारांहून अधिक मते मिळवून ७४ हजार मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे.

हेही वाचा : “संघाकडे मदत न मागितल्याने भाजपाची खराब कामगिरी”; RSS चा भाजपाला घरचा आहेर

’मिले ना मिले हम’ म्हणत पुन्हा भेटले!

२०११ साली कंगना रणौत आणि चिराग पासवान यांनी ‘मिले ना मिले हम’ नावाच्या चित्रपटात एकत्र काम केले होते. तन्वीर खान यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने फारच सुमार कामगिरी केली होती. या चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त नीरु बाजवा आणि सागरिका घाटगे यांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट इतका फ्लॉप ठरला की त्याची फारशी कुणी दखलही घेतली नाही. पहिल्याच चित्रपटाने इतकी सुमार कामगिरी केल्यानंतर चिराग पासवान यांनी सिनेमा जगताला रामराम केला आणि आपला राजकीय पक्ष सांभाळणे पसंत केले. दुसरीकडे, कंगना रणौतने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात २००४ साली ‘आय लव्ह यू बॉस’ या चित्रपटाच्या माध्यमातून केली. त्यानंतर २००५ साली आलेल्या ‘गँगस्टर : अ लव्ह स्टोरी’ या महेश भट्ट यांच्या चित्रपटामुळे कंगना किमान दखलपात्र झाली. त्यानंतर कंगना अनेक छोटे-मोठे चित्रपट करत राहिली. २०१३ साली आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटाने कंगनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर ती अधिक चर्चेत आली. आता तिच्या फिल्मी कारकिर्दीला उतरती कळा लागलेली असली तरीही ती आघाडीची अभिनेत्री मानली जाते. ‘इमर्जन्सी’ या आगामी चित्रपटात ती इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. पहिल्या चित्रपटानंतर चिराग पासवान इतर कोणत्याच चित्रपटामध्ये दिसले नाहीत. मात्र, १३ वर्षांनंतर ‘फिर मिले हम’ असे म्हणत संसदेत या दोघांचीही पुन्हा भेट झाली आहे.