काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा केली आहे. काँग्रसचे खासदार राहुल गांधी समाजातील नाराज आणि अस्वस्थ घटकांना एकत्र करण्यात तसेच एकतेचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. काँग्रेसची विचारधारा नसणाऱ्या लोकांचाही या यात्रेला पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा यशस्वी ठरत आहे, असे कपिल सिब्बल म्हणाले आहेत.
हेही वाचा >>> सुधीर तांबेंच्या निलंबनावर नाना पटोलेंची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, “हायकमांडने…”
यात्रेच्या उद्देशाला घेऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय
काँग्रेस पक्षातील अंतर्गत कार्यपद्धतीला कंटाळून कपिल सिब्बल यांनी मागील वर्षी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी आता काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची प्रशंसा केली आहे. “महाविकास आघाडी ही चांगली संकल्पना आहे. भारत जोडो यात्रेची प्रशंसा केली पाहिजे. या यात्रेच्या राजकीय परिणामाबद्दल बोलायचे झाले, तर यात्रेच्या उद्देशाला घेऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या यात्रेमागे राजकीय हेतू असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मला तसे वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया कपिल सिब्बल यांनी दिली.
हेही वाचा >>> Budget 2023 : “मी मध्यमवर्गीयच, तुमच्या त्रासाची मला कल्पना आहे”; बजेटपूर्वी निर्मला सीतारामन यांचे आश्वासक उद्गार
कार्यपद्धीला कंटाळून दिला होता राजीनामा
कपील सिब्बल यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवत काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर लगेच समाजवादी पार्टीच्या पाठिंब्यावर ते उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर गेले होते. समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून आलेले असताना त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची वाहवा केली आहे.
हेही वाचा >>> “न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न, पण…”, कपिल सिब्बल यांचं टीकास्त्र
जम्मू काश्मीरमध्ये फडकवणार तिरंगा
दरम्यान, भारत जोडो यात्रा सध्या पंजाबमध्ये आहे. या यात्रेने आतापर्यंत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेळ, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यांमधून गेली आहे. ३० जानेवारी रोजी ही यात्रा जम्मू काश्मीरमध्ये पोहोचणार असून राहुल गांधी लाल चौकात तिरंगा फडकवतील. यावेळी काँग्रेसने महत्त्वाच्या विरोधी पक्षांना आमंत्रित केलेले आहे.