काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला आहे. कायम फ्रंट लाईनवर असणाऱ्या कपिल सिब्बल यांच्यासारख्या एका जेष्ठ नेत्याने राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे असेच म्हणावे लागेल. खरे तर, कपिल सिब्बल हे मुळातच एक बंडखोर नेते आहेत. अनेकवेळा त्यांच्यातला बंडखोर स्वभाव ठळकपणे पुढे आला आला आहे. “गांधी कुटुंबाने काँग्रेसच्या नेतृत्वाच्या जबाबदारीतून बाहेर पडावे आणि इतर नेत्यांना नेतृत्व करण्याची संधी द्यावी”. असे खडे बोल त्यांनी सुनावले होते. 

कपिल सिब्बल यांनी थेट कॉंग्रेस नेतृवावर टीकेची तोफ डागण्याची ही काही पहिली वेळ नाही. कपिल सिब्बल यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजेच २००० या वर्षाच्या सुरुवातीलाच थेट पक्ष नेतृत्वावर टीका केली होती. त्यानंतर त्यांनी सोनिया गांधी यांच्या सल्लागारांना मुक्त आणि स्पष्ट चर्चा करण्यासोबतच आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. ‘ग्रँड ओल्ड पार्टी’मधील ती त्यांची सुरवातीची काही वर्षे होती. त्यानंतरही ते सातत्याने पक्षातील खटकणाऱ्या गोष्टींवर स्पष्टपणे बोट ठेवत होते. 

कपिल सिब्बल यांचा काँग्रेसमधील प्रवास

१९९१ मध्ये कपिल सिब्बल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून काँग्रेस आणि अनेक प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी कपिल सिब्बल यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव यांच्याशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. सोनिया गांधी यांचे सल्लागार दिवंगत अहमद पटेल यांच्यासोबत कपिल सिब्बल यांचे चांगले संबंध होते. दोघांनी एकत्र खूप कामे केली होती. त्यामुळे ते सोनिया गांधी  निकटवर्तीय लोकांमध्ये त्यांचा समावेश होत होता. मात्र, राहुल गांधींसोबत त्यांचे सूर कधी जुळलेच नाहीत.

असंतुष्ट नेत्यांचे आधारस्तंभ

सिब्बल यांचा राजीनामा हा जी-२३ या काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या गटाला मोठा धक्का आहे. करण या नाराज नेत्यांच्या यादीत कपिल सिब्बल यांचा समावेश होता. कॉंग्रेसमध्ये गटातटाचे राजकारण मोठया प्रमाणत आहे. पक्षात असंतुष्ट लोकांचा एक गट आहे. कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील या असंतुष्ट गटाचे आधारस्तंभ होते. त्यांनी पक्षातील अनेक नाराज नेत्यांना एकत्र ठेवले होते. ते सतत या नेत्यांच्या संपर्कात असायचे. या नेत्यांमध्ये गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, भुपिंदर सिंह हुड्डा, शशी थरूर आणि मनीष तिवारी यांचा समावेश आहे.सिब्बल हे पक्षातील खटकणाऱ्या बाबींवर जाहीरपणे प्रश्न उपस्थित करत होते. पण, असे असले तरी सर्वोच्च न्यायालयात पक्षासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी ते कायम तयार असायचे. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला राजकीय धक्का बसला आहे

Story img Loader