Yashomati Thakur in Teosa Assembly Constituency : गेल्या पंधरा वर्षांपासून तिवसा हा काँग्रेसचा गड अभेद्या राखणाऱ्या यशोमती ठाकूर यांच्या विरोधात जंग जंग पछाडूनही यश हाती का येत नाही, ही भाजपची चिंता या निवडणुकीतही कायम राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत यशोमती ठाकूर यांनी आपली स्थिती मजबूत केली असली, तरी त्यातून विरोधकांचीही संख्या वाढली आहे.

१९७८ मध्ये अस्तित्वात आलेल्या तिवसा मतदारसंघात आतापर्यंत झालेल्या नऊ निवडणुकांत काँग्रेसने पाच वेळा विजय मिळवला आहे. काँग्रेसचे भैय्यासाहेब ठाकूर, शरद तसरे, भाकपचे भाई मंगळे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९९९ आणि २००४ मध्ये भाजपच्या साहेबराव तट्टे यांनी सलग दोन वेळा येथून विजय मिळवला होता. तेव्हापासून भाजपला या मतदारसंघात सूर गवसलेला नाही.

Maharashtra Assembly Elections 2024 will opposition in maharashtra get Leader of opposition post
विरोधी पक्षनेतेपद विरोधकांना मिळू शकते का ?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
Who is George Soros
जॉर्ज सोरोस कोण आहेत? भाजपला त्यांच्याविषयी इतका राग का? ते खरेच ‘काँग्रेसमित्र’ आणि ‘भारतशत्रू’ आहेत का?
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Mallikarjun kharge loksatta
धनखड सरकारचे प्रवक्ते! मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल; हा जाट समुदायाचा अपमान भाजपचे प्रत्युत्तर
Rahul Narvekar
Rahul Narvekar : शिवसेना, राष्ट्रवादी व्हाया भाजपा, सर्वात कमी वयाचे विधानसभाध्यक्ष; राहुल नार्वेकरांची राजकीय कारकीर्द कशी आहे?
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान

हेही वाचा : Jharkhand: भाजपाचा झारखंडसाठी गेम प्लॅन तयार; हेमंत सोरेन यांना आगामी निवडणुकीत धक्का बसणार?

२००९ पासून हा मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यात यशोमती ठाकूर यांनी यश मिळवले आहे. २००४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. त्याचा लाभ त्यांना गेल्या तीन निवडणुकांमध्ये झाला. २०१४ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर यांच्या सख्ख्या बहिणीनेच त्यांच्या विरोधात बंड पुकारून त्यांना आव्हान दिले होते, पण तिवस्याच्या मतदारांनी यशोमती यांना पुन्हा संधी दिली. विदर्भातील एकमेव काँग्रेस उमेदवार म्हणून विजयी होण्याचा मान त्यांनी मिळवला होता.

सप्टेंबर २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ‘महाजनादेश यात्रे’ची सुरुवात ही तिवसा मतदारसंघातील गुरुकुंज मोझरी येथून केली होती. त्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. शिवसेनेचे राजेश वानखडे यांना १० हजार ३६१ मतांनी पराभव पत्करावा लागला. राजेश वानखडे यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासह भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, रविराज देशमुख हेही उमेदवारीसाठी दावेदार आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटानेही या ठिकाणाहून तयारी चालवली आहे.

हेही वाचा : Haryana Politics : हरियाणात भाजपा की काँग्रेस? दुष्यंत चौटाला अन् चंद्रशेखर आझाद यांच्या युतीमुळे कुणाचे ‘टेन्शन’ वाढवणार?

मिश्र वस्तीचा मतदारसंघ

मराठा-कुणबी, माळी आणि मुस्लीम मतदारांची संख्या तुलनेने अधिक असली, तरी धनगर आणि तेली समाजाची मतेही भरपूर असल्याने हा मतदारसंघ बहुजातीय व बहुभाषिक असा आहे. कोणत्याही एका जातीय घटकाचे वर्चस्व या ठिकाणी नाही. नगर परिषद नसलेल्या आणि चार तालुक्यांमध्ये विभागल्या गेल्याने विस्तीर्ण बनलेला हा मतदारसंघ संपूर्ण ग्रामीण आहे. येथे २०.८८ टक्के अनुसूचित जातीचे मतदार, ५.१७ टक्के अनुसूचित जमातीचे तर १०.२ टक्के मुस्लीम मतदार आहेत.

हेही वाचा : SP BSP Alliance : सपा-बसपा एकत्र येणार? भाजपाच्या मायावतींवरील टीकेला अखिलेश यादवांचं उत्तर; नव्या आघाडीची चर्चा, बसपाचेही दरवाजे खुले?

विरोधक एकवटण्याची शक्यता

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना तिवसा मतदारसंघातून १० हजार ५७६ इतके मताधिक्य मिळाले. या मतदारसंघावरील काँग्रेसचे वर्चस्व या निमित्ताने अधोरेखित झाले. यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली होती. बळवंत वानखडे यांच्या विजयामुळे यशोमती यांचे स्थान अधिक बळकट झाले असले, तरी त्यांच्या विरोधक आता एकवटले आहेत. बडनेराचे आमदार रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वितुष्ट आणखी वाढले आहे. यशोमती ठाकूर यांचे विरोधक राजेश वानखडे यांना बळ देण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न आहे.

Story img Loader