Congress Ravindra Dhangekar in Assembly Election 2024 पुणे : मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा मतदारसंघात विजय मिळवून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी भाजपला मोठा धक्का दिला. त्या ‘चमत्कारा’च्या जोरावर धंगेकरांनी लोकसभाही लढवली. पुण्याचे राजकारण ढवळून काढणारी कसब्याची जागा भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई बनली आहे. मात्र, धंगेकर यांच्याविरोधात कोणाला उभे करायचे, हाच तिढा भाजपला सोडावा लागणार आहे. या मतदारसंघात भाजपमधून तीन दावेदार असून त्यापैकी उमेदवारी कोणाला मिळते, यावर निवडणुकीची गणिते ठरू शकतील.
कसबा पेठ हा भाजपचा बालेकिल्ला. २८ वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले. १९९५ पासून २०१९ पर्यंत गिरीश बापट आणि २०१९ मध्ये मुक्ता टिळक हे या मतदारसंघातून निवडून गेले. परंतु, २०२३मध्ये टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणूक अवघ्या राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. भाजपने पुणे महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना रिंगणात उतरवले तर, काँग्रेसकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली. भाजपने पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करूनही धंगेकर यांनी विजय मिळवला. त्या पराभवानंतर भाजपच्या उमेदवार निवडीवर आणि पक्षांतर्गत संघर्षावरही प्रश्न उपस्थित झाले. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपसमोर उमेदवाराचा प्रश्न उभा ठाकला आहे.
हेही वाचा >>> “आम्ही तुम्हाला का घाबरायचं?”; बसपाच्या नेत्याच्या हत्येनंतर दिग्दर्शक पा रंजीत काढलेल्या मोर्चामुळे राजकारण तापले
विद्यामान आमदार रवींद्र धंगेकर यांची काँग्रेसकडून उमेदवारी पक्की मानली जाते. मात्र, भाजपमध्ये या जागेसाठी तीन दावेदार आहेत. गेल्या निवडणुकीत टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी न देता भाजपने रासने यांना रिंगणात उतरवले. मात्र, आता पुन्हा टिळक यांचे चिरंजीव कुणाल हे स्पर्धेत उतरले आहेत. त्यातच गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यादेखील उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. रासने यांनीही पुन्हा उमेदवारी मिळेल, या आशेने आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. कसबा पेठ जिंकण्यासाठी व्यूहरचना करण्याआधी भाजपला उमेदवार निश्चित करावा लागणार आहे.
हेही वाचा >>> अर्थसंकल्पात बिगर-एनडीएशासित राज्यांकडे दुर्लक्ष? विरोधक संसदेत अर्थसंकल्पाला विरोध का करत आहेत?
धंगेकर कायम चर्चेत
पोटनिवडणुकीतील विजयापासून रवींद्र धंगेकर यांनी पद्धतशीरपणे स्वत:ला चर्चेत ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना चांगली टक्कर दिली. गिरीश बापट हे २०१९मध्ये सव्वातीन लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. यंदा मात्र धंगेकर यांचा दीड लाखांनी पराभव झाला. कसबा पेठमधूनही ते पिछाडीवर पडले. मात्र, त्यानंतरही पुणे ड्रग्ज प्रकरण, पोर्श अपघाताच्या निमित्ताने आंदोलने करत धंगेकरांनी आपले आव्हान कायम ठेवले आहे.
‘कौटुंबिक’ पेच
लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पुण्यात झाली. त्या सभेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी बापट यांच्या स्नुषा स्वरदा यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यामुळे गिरीश बापट यांचा कसब्याचा वारसा स्वरदा यांच्याकडे दिला जाण्याची चर्चा सुरू झाली. त्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यामुळे उमेदवारीवर त्यांचा दावा मोठा आहे. परंतु, मागील पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबीयांना डावलणे भाजपला महागात पडले होते. त्यामुळे या दोन कुटुंबांपैकी कोणाकडे कसब्याचे तिकीट सोपवायचे, हा पेच भाजपपुढे आहे.