आरक्षण, कांदाप्रश्न, महायुतीतील विरोध या गोष्टीदेखील छगन भुजबळांसाठी आव्हानात्मक ठरणार आहेत.

नाशिक : गेल्या चार विधानसभा निवडणुकांमध्ये येवला मतदारसंघावर वर्चस्व मिळवणाऱ्या छगन भुजबळांकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह तर आहे, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाविना त्यांना आगामी निवडणूक लढवावी लागणार आहे. मराठा आरक्षण, कांदा प्रश्न याबरोबरच महायुतीतील घटक पक्षांच्या नेत्यांचा विरोध या आव्हानांनाही त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही छगन भुजबळ यांच्या राजकीय मुत्सद्देगिरी आणि डावपेचांची परीक्षा पाहणारी ठरणार आहे.

Rahul Narwekar
Rahul Narwekar : संख्याबळ नाही तरीही मविआला विरोधी पक्षनेतेपद देणार का? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
Independent MLA Sharad Sonawane.
MLA Sharad Sonawane : अपक्ष आमदाराची महायुतीकडे मंत्रिपदाची मागणी, विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसत झळकावला फलक
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Sharad Pawar asserts that distrust in the electoral system should be removed print politics news
मारकडवाडीवरून कलगीतुरा, निवडणूक यंत्रणेबद्दल अविश्वास दूर करा; शरद पवारांचे मारकरवाडीत प्रतिपादन
Congress Shiv Sena Thackeray faction leaders meet Chief Minister for opposition demand for Assembly Deputy Speaker Leader of Opposition post Print politics news
विधानसभा उपाध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपदाची विरोधकांची मागणी; मुख्यमंत्र्यांची भेट
Radhakrishna Vikhe Patil On Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil : “तेव्हाच सांगितलं होतं आधी निवडून तर या”, राधाकृष्ण विखेंचा बाळासाहेब थोरातांवर हल्लाबोल

येवला मतदारसंघ सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न दाखवून २००४ पासून छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत भुजबळ यांच्या मतांमध्ये वाढच झाली आहे. २००४ मध्ये त्यांना ७९ हजार ३०६, २००९ मध्ये १०६४१६, २०१४ मध्ये ११२७८७ आणि २०१९ मध्ये १२६२३७ मते मिळाली. २००४ मध्ये भुजबळ यांच्या पाठीशी तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठ नेते उभे राहिल्याने शिवसेनेचे तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांचा त्यांनी ३५ हजार ६४९ मतांनी पराभव केला होता. प्रारंभी भुजबळ यांना साथ देणारे माणिकराव शिंदे हेच २००९ मध्ये त्यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार म्हणून उभे ठाकले. तरीही भुजबळ यांनी त्यांचा ५० हजार १८० मतांनी पराभव करून मतदारसंघात आपल्यासमोर कोणीच प्रतिस्पर्धी नसल्याचे दाखवून दिले. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी शिवसेनेचे संभाजी पवार यांना धूळ चारली.

२००४ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत भुजबळ यांच्याविरोधात सर्व विरोधकांनी एकत्र येत लढत देण्याचा प्रयत्न केला, परंतु, राजकीय डावपेच आणि मुत्सद्देगिरीत भुजबळ हे विरोधकांना कायम पुरून उरले. प्रत्येक निवडणुकीत प्रारंभी विरोध करणारे, प्रचार रंगात आल्यानंतर भुजबळ यांच्या तंबूत कसे शिरतात, हे नेहमीच विरोधकांना न उमगलेले कोडे ठरले आहे. मात्र, आगामी निवडणूक भुजबळ यांच्या या गुणांची कसोटी पाहणारी ठरणार आहे.

हेही वाचा >>> चंद्राबाबू नायडूंची एक साद आणि १६० आमदारांनी दिली साथ; नक्की काय घडलं?

राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर भुजबळ यांनी सत्तेसाठी अजित पवार यांना साथ दिली. संतप्त शरद पवार यांनी अजित पवार गटाविरोधातील आपली पहिली जाहीर सभा येवल्यातच घेतली होती. त्यातच मराठा आरक्षणाच्या विषयावरून मनोज जरांगे हे वारंवार भुजबळ यांना लक्ष्य करत असल्याने मराठा समाज उघडपणे जरांगे यांना साथ देत आहे. येवला मतदारसंघात कांदा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. निर्यातबंदी, निर्यात शुल्क यासंदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे कांदा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले असून त्याची झळ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दिंडोरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. भारती पवार यांना बसली. येवला विधानसभा मतदारसंघात डॉ. पवार यांच्यापेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांना १३ हजार २०५ मताधिक्य मिळाले. भुजबळ यांच्यासाठी हे मताधिक्य धोकादायक मानले जात आहे. येवल्यातील अल्पसंख्याक समाजाने कायमच भुजबळ यांना साथ दिली आहे. परंतु, भुजबळ सध्या भाजपबरोबर असलेल्या अजित पवार गटात असल्याने हा समाज त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता अधिक आहे.

हेही वाचा >>> विधानसभेत लढण्यासाठी काँग्रेसला किती जागा मिळणार?

विरोधात कोण?

निफाड तालुक्यात झालेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवार यांचे स्वागत भाजपच्या जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी केले. त्यांनी उघडपणे भुजबळ यांच्याविरोधात उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. येवल्यातून शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे, ठाकरे गटाकडून कुणाल दराडे इच्छुकांच्या रांगेत आहेत.

भुजबळांच्या विरोधातील बाबी

मराठा आरक्षण, कांदा उत्पादकांची नाराजी, अल्पसंख्याक समाजाची भाजपविषयी असलेली नाराजी, मतदारसंघातील पाणी समस्या कायम असणे, येवला शहरातील अतिक्रमणांकडे होणारे दुर्लक्ष, अंगणगावातील बोटिंग क्लब, नाट्यगृृहाची दुरवस्था, या भुजबळ यांच्याविरोधात जाणाऱ्या बाबी आहेत. भुजबळ यांनी येवल्यात केवळ भव्य शासकीय इमारती उभ्या केल्या. परंतु, इतर विकास कामे केली नसल्याचा आक्षेप त्यांच्याविषयी घेतला जातो.

Story img Loader