कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्याकडे उमेदवार नेमका कोण याचे उत्तर आजमितीस खात्रीशीरपणे कोणाकडेही नाही. हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे असला तरी विद्यामान आमदारांना पुन्हा मतदारसंघात उतरवले जाणार का, याबाबत पक्षातूनच साशंकता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे अनेक दावेदार असल्याने उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात याचेही अचूक उत्तर मिळत नाही. जिल्ह्यातील अन्य मतदारसंघात सत्तारूढ वा विरोधक यांपैकी कोणाची तरी उमेदवारी निश्चित मानली जात असताना त्याला अपवाद बिनचेहऱ्याचा कोल्हापूर उत्तर मतदारसंघ राहिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दीर्घकाळ काँग्रेस-राष्ट्रवादीचे राजकीय वर्चस्व राहिले आहे. कोल्हापूर शहर त्याला अपवाद बनले आहे. चार दशकांचा इतिहास पाहता येथे पाच वेळा शिवसेनेची सरशी झाली आहे. काँग्रेसने तीन वेळा बाजी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपातून काँग्रेसमध्ये आलेले चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेले राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. करोना संसर्ग काळामध्ये त्यांचे निधन झाले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : सरकारने प्रत्येक धर्माचे रक्षण करावे- फारूक अब्दुल्ला

पोटनिवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी या मतदारसंघात २०१४ साली काँग्रेसकडून लढलेले पण भाजपकडून उतरलेले सत्यजित कदम यांचा पराभव केला. जयश्री जाधव यांनी अडीच वर्षाच्या कालावधीत मतदारसंघाचा किल्ला चांगलाच लढवला आहे. पण पुन्हा त्यांना उमेदवारी मिळणार का, याबद्दल तर्कवितर्क आहेत. यावेळी महायुतीकडून या मतदारसंघात कडवे आव्हान मिळणार असल्याने काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून ताकदीचा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत. तूर्तास, काही मधल्या फळीतील कार्यकर्त्यांची नावे पुढे येत आहेत.

या मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, त्यांच्या पत्नी मधुरीमाराजे छत्रपती यांच्या नावाची चर्चा होती. पण लोकसभेत काँग्रेसकडून शाहू छत्रपती विजयी झाले. त्यामुळे खासदारकीपाठोपाठ आमदारकी छत्रपती घराण्याकडे जाण्याबद्दल प्रश्नचिन्ह लावले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार बदलण्याच्या मन:स्थितीत असली तरी सक्षम उमेदवार कोण याचे उत्तर मात्र मिळत नाही.

कृष्णराज महाडिक

हेही वाचा : RSS UP: लोकसभेत पेपरफुटीचा भाजपाला फटका; उत्तर प्रदेशमध्ये आता RSS सक्रिय, भरतीप्रक्रियेतील उमेदवारांना मदत

महायुतीमध्ये दावेदारांची संख्या अधिक

● राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शिंदे गटाकडून पुन्हा जोरदार तयारी केली आहे.

● पोटनिवडणुकीत तुल्यबळ लढत दिलेले सत्यजित कदम यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळणार असा दावा चालवला आहे. कदम हे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे भाचे असल्याने त्यांना खासदार धनंजय महाडिक यांचेही पाठबळ मिळू शकते.

● या मतदारसंघात खासदार पुत्र कृष्णराज महाडिक यांनीही आपली प्रतिमा उंचावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. समाज माध्यमात सक्रिय असलेले आणि त्यातून मिळणाऱ्या निधीचा विनियोग समाजकार्यासाठी करणारे कृष्णराज हे तरुणांमध्ये लोकप्रिय बनले आहेत.

● २०१४ मध्ये भाजपचे उमेदवार असलेले पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल चिकोडे हे भाजपचे निष्ठावंत या श्रेणीतून उमेदवारी मिळेल अशी खात्री व्यक्त करताना दिसत आहेत. त्यांची भिस्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर आहे.

● राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे महानगर अध्यक्ष आदिल फरास हेही उमेदवारीच्या स्पर्धेत उतरलेले आहेत. यामुळे महायुतीची उमेदवारी नेमकी कोणाला याचे उत्तर या क्षणी कोणाच्याच हातात नाही.

Story img Loader