Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha Assembly Constituency : भारत भालके यांच्या निधनानंतर तीन वर्षांसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बनलेले भाजपचे समाधान आवताडे यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यापासून विजय मिळवण्यापर्यंत आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या जागेसाठी भाजपमधूनही काही जण इच्छुक असून अन्य पक्षांमधील इच्छुकांच्या संख्येतही वाढ झाली आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात २०१९च्या निवडणुकीत भारत भालके हे विजयी झाले होते. मात्र, भालके यांचे आकस्मिक निधन झाले. त्या पोटनिवडणुकीत भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. आणि आवताडे यांचा विजय झाला. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी लाट असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात भाजपला यश मिळविण्यासाठी खूप जोर काढावे लागले. या काळात फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मोडून काढण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांना भाजपत घेतले. जिल्ह्यात भाजपचा दबदबा वाढला होता. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चित्र उलट फिरले. सोलापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा ज्या भाजपकडे होत्या, त्या काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेल्या.

pandharpur mangalwedha Assembly Constituency
Pandharpur Assembly Constituency: पंढरपूर विधानसभा: पुन्हा आवताडे की भालके? काँग्रेस-राष्ट्रवादीत कुणाचा विजय?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Maharashtra assembly election 2024 Sharad Pawar NCP releases fourth list of 7 candidates
Sharad Pawar NCP 4th Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; सात उमेदवारांची घोषणा, कोणाला कुठून मिळाली संधी?
Dispute in Mahavikas Aghadi over election seat allocation in Solapur
सोलापुरात जागावाटपावरून आघाडीत बिघाडी; जिल्ह्यातील चार मतदारसंघांत संघर्ष
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”
maval assembly constituency
मावळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी
Yamini Jadhav Byculla Assembly Election 2024 in Marathi
Byculla Assembly Election 2024 : विधानसभेला भायखळा मतदारसंघात कोण बाजी मारणार? मविआ की महायुती?
kolhapur, Chandgad Vidhan Sabha Constituency, ncp, rajesh patil, BJP, Shivaji Patil, congress, Vinayak patil, Kolhapur politics, chandgad vidhan sabha analysis, sattakaran article,
गटातटाच्या राजकारणावर चंदगडाची आमदारकी अवलंबून

हेही वाचा : भाजपची तिसरी यादी जाहीर, विरोधानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये जुन्या यादीमधील बहुसंख्य नावे कायम

या मतदारसंघातील विद्यामान आमदार समाधान आवताडे यांना अवघा तीन वर्षांचा कालावधी मिळाला. सुरुवातीला परिचारक, आवताडे हे एकत्र होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीनंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाल्याची चर्चा आहे.

मागच्या विधानसभेला भाजपचे तिकीट मिळावे यासाठी अनेक इच्छुक होते. मात्र, यंदा हे वातावरण तसे राहिलेले नाही. विकासकामे केली असली, तरी वातावरणाचा मुद्दा चर्चेत आहे. पक्षातील, मित्र पक्षातील इच्छुक उघडपणे शरद पवारांची भेट घेतात. त्याला व्यापक प्रसिद्धी मिळवतात. यामागे वातावरण बदलाची दिशा की अन्य राजकारण याचीही चर्चा सुरू आहे. मात्र यंदा ही लढत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट होण्याची शक्यता फारच कमी वाटत असून, त्यामुळे मतदारसंघातील चुरस आताच वाढली आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील पहिला उमेदवार म्हणून दिलीप धोत्रे यांची पंढरपुरात उमेदवारी जाहीर केली. मात्र, पंढरपुरातील ठरावीक क्षेत्राशिवाय धोत्रे यांचा मतदारसंघात फारसा प्रभाव दिसत नाही. त्यामुळे आपली उमेदवारी रुजवण्यासाठी धोत्रे यांना मोठे कष्ट या मतदारसंघात घ्यावे लागतील. विद्यमान आमदार समाधान आवताडे यांना भाजपमधूनच खुले आव्हान मिळण्याची शक्यता असून अन्य पक्षांमधूनही ताकदीचे उमेदवार इच्छुक असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे.

हेही वाचा : Mallikarjun Kharge : खरगे कुटुंबाच्या संस्थेला चुकीच्या पद्धतीने जमीन हस्तांतर केल्याचा भाजपाचा आरोप; सिद्धरामय्यांनंतर मल्लिकार्जुन खरगेंना घेरण्याचा प्रयत्न?

इच्छुकांची संख्या मोठी

भाजप आणि फडणवीसांचे निष्ठावंत म्हणून परिचित असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांनीदेखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. परिचारक यांच्या कार्यकर्त्यांचा ‘तुतारी हाती घ्या’ असा आग्रह आहे. परिचारक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांची भेट घेतल्याची टीका त्यांचे राजकीय विरोधक करीत आहेत. मात्र, परिचारक यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही. दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांनी मतदारसंघात गेल्या तीन वर्षांच्या काळात थेट संपर्क जरी ठेवला नसला, तरी भालके परिवाराला मानणारा एक मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. कष्टकरी आणि झोपडपट्टी परिसरातील मते भालकेंच्या परड्यात आजपर्यंत पडत आली.