बादल कुटुंबाविरुद्ध बंड पुकारणाऱ्या कर्नेल सिंग पंजोली यांना शिरोमणी अकाली दलने पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. १३ फेब्रुवारी रोजी शिरोमणी अकाली दलाच्या शिस्तपालन समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीनंतर शिस्तपालन समितीचे अध्यक्ष सिकंदर सिंग मलुका यांनी याबाबत माहिती दिली.
हेही वाचा – Nagaland Election : नागालँड जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसली, जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस
यासंदर्भात बोलताना, कर्नेलसिंग पंजोली यांना पक्षविरोधी कृत्य केल्याबाबत दोषी ठरवण्यात आले आहे. शिस्तपालन समितीच्या बैठकीत यावर एकमताने निर्णय घेण्यात आला. तसेच कर्नेलसिंग पंजोली यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले, अशी प्रतिक्रिया सिकंदर सिंग मलुका यांनी दिली.
हेही वाचा – मध्य प्रदेशच्या वनमंत्र्याची जीभ घसरली; भरसभेतून युवकाला शिवीगाळ, म्हणाले…
पुढे बोलताना, यापुढे पक्षविरोधी कृत्यं खपवून घेणार नसून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच कर्नेलसिंग पंजोली यांना यापूर्वीही पक्षविरोधी कारवाई केल्याच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली.