काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला उत्तर देण्यासाठी कर्नाटक भाजपाकडून ‘जन संकल्प’ यात्रा काढण्यात येणार आहे. यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे. भाजपाची ही ‘जन संकल्प’ यात्रा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली निघणार असल्याचेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – अमित शहा यांच्या आगामी दौऱ्यात पश्चिम महाराष्ट्रात राजकीय फेरबांधणी, भाजपची पकड घट्ट करण्याकडे लक्ष

कर्नाटकमध्ये भाजपाने केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच या यात्रेत मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे इतर पदाधिकारीही सहभागी होणार आहेत.

“काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेला उत्तर देण्यासाठी भाजपा ‘जन संकल्प’ यात्रा काढणार आहे. कर्नाटकमध्ये आम्ही जनतेच्या हिताची अनेक कामे केली आहेत. ही कामे जनतेपर्यंत पोहोचवणे हा यात्रेचा उद्देश आहे. तसेच आम्ही २०२३ची विधानसभा निवडणूक जिंकण्याचाही संकल्प करणार” असल्याची माहिती अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. या यात्रेला रायचूरमधून सुरूवात होणार आहे. तसेच कोप्पल, विजयनगर आणि बेल्लारी या शहरांमधून जाणार आहे. दरम्यान, याबाबत बोलताना मंत्री अश्वथनारायण म्हणाले, “ही यात्रा पूर्वनियोजित होती. प्रत्येक पक्षाला आपले पक्षाचे कार्यक्रम करण्याचे स्वातंत्र आहे. फक्त काँग्रेसने यात्रा काढावी आणि बाकीच्यांनी केवळ बघत राहावे, हे शक्य नाही.”

हेही वाचा – “दुसरे भाषायुद्ध लादू नका”, हिंदी भाषेला अधिकृत दर्जा देण्याबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आक्रमक

या ठिकाणी होणार जन संकल्प यात्रा

भाजपाच्या या जनसंकल्प यात्रेदरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी म्हैसूरमध्ये मागासवर्गीय मोर्चा, ३० ऑक्टोबर रोजी कलबुर्गीमध्ये ओबीसी मोर्चा, १३ नोव्हेंबर रोजी हुबळीमध्ये शेतकरी मोर्चा, २७ नोव्हेंबर रोजी शिवमोग्गा येथे युवा मोर्चा, २७ नोव्हेंबर रोजी बल्लारीमध्ये एसटी मोर्चा तसेच बेंगळुरूमध्ये महिला मोर्चा, २५ डिसेंबर रोजी विजयपुरा अल्पसंख्याक मोर्चा काढण्यात येणार आहे.