भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेसचं दुसरं नाव “भष्ट्राचार, दलाली आणि जातीयवाद” असल्याचं म्हटलं. तसेच, भाजपा रिपोर्टकार्डसह निवडणूक लढवणार असल्याचही त्यांनी सांगितलं. नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात रिपोर्ट कार्डचं राजकारण केलं आणि भाजपा आपल्या रिपोर्टकार्डसह कर्नाटक निवडणुकीला सामोर जाईन.
यावेळी जेपी नड्डा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. तसेच, काँग्रेस मतपेटीचे राजकारण करते, लोकांना जाती आणि प्रातांमध्ये विभागते, त्यांनी जातीयवाद आणि घराणेशाहीच्या राजकारणाला चालना दिली आहे. मात्र भाजपाच्या राजकारणात जातीवाद आणि घराणेशाहीला स्थान नाही. आम्ही जे वचन दिले होते ते पूर्ण केले. कर्नाटकातील भाजपा सरकारने राज्याच्या विकासात कोणतीही कसर सोडली नाही. असंही सांगितलं.
नड्डा तुमाकुरू आणि मधुगिरी विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या शक्ती केंद्रांच्या प्रमुखांच्या बैठकील संबोधित करत होते, कारण एप्रिल-मे महिन्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली आहे. तळागाळात काम करणाऱअया कार्यकर्त्यांची भेट घेऊन पक्ष आणि सरकारचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी या बैठकीत आलो असल्याचे त्यांनी सांगितले.