Karnataka Assembly Session 2025: कर्नाटकात मार्चमध्ये विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनादरम्यान कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी विधानसभेच्या संयुक्त आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दुपारच्या जेवणानंतर झोपू इच्छिणाऱ्या आमदारांसाठी १५ रिक्लाइनर खुर्च्या भाड्याने घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जेवणानंतर आमदारांना बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिक्लाइनर बसवण्यामागची कारणं

खरं तर, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी स्पष्ट केले की, काही ज्येष्ठ आमदारांनी जेवणानंतर विश्रांतीसाठी जागा मागितली होती. जर हे आमदार झोपण्यासाठी बाहेर पडले तर ते दिवसभर परत येणार नाहीत. म्हणून विधानसभा अध्यक्षांनी, विधानसभेच्या लॉबीमध्ये रिक्लाइनर खुर्च्या बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

जर सर्व काही नियोजनानुसार झाले तर, ३ मार्च रोजी सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २२५ विधानसभा आमदार आणि ७५ विधान परिषद आमदारांसाठी सुमारे १५ रिक्लाइनर्स उपलब्ध करण्यात येतील. हे रिक्लाइनर्स सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या लाउंजमध्ये ठेवले जातील. सत्ताधारी काँग्रेसकडे सध्या सभागृहात १३७ आमदार आहेत.

काय म्हणाले विधानसभा अध्यक्ष?

याबाबत अधिक बोलताना कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर म्हणाले की, “रिक्लाइनर खुर्च्यांचा वापर वारंवार होत नसल्याने त्या खरेदी केल्या जाणार नाहीत. त्याऐवजी त्या फक्त अधिवेशनाच्या कालावधीसाठी भाड्याने घेतल्या जातील. माध्यमांच्या वृत्तानुसार, हा उपक्रम विधानसभेतील आमदारांची उपस्थिती आणि वक्तशीरपणा वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी खादर यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत रिक्लाइनर योजनेची घोषणा केली होती. त्यांनी सभागृहाच्या कामकाजात आमदारांचा सहभाग वाढवण्यासाठी नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची आधीच कशी सोय केली आहे, त्याबद्दलही माहिती दिली.

आमदारांची उपस्थिती वाढवण्यास मदत

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना खादर म्हणाले की, नाश्ता आणि दुपारचे जेवण यासारख्या सुविधांमुळे अधिवेशनादरम्यान आमदारांना विधिमंडळाच्या कामकाजात उपस्थिती वाढण्यास मदत झाली आहे.

“जेवणानंतर त्यांना झोपण्याचा पर्याय उपलब्ध करून देऊन, आमदारांवर कामकाजादरम्यान बाहेर जाण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करत आहोत. यामुळे अधिवेशनादरम्यान विधिमंडळातील त्यांची उपस्थिती निश्चित होईल,” असे ते म्हणाले.

खादर यांनी पुढे सांगितले की, “सरकार रिक्लाइनर खरेदी करणार नाही कारण विधिमंडळ अधिवेशन सुरू असताना वर्षातून फक्त तीन महिनेच याची गरज भासेल, म्हणून सचिवालय ते भाड्याने घेईल.”

आमदारांच्या हजेरीसाठी एआय-एनेबल्ड कॅमेरे

दरम्यान, गेल्या वर्षी, विधानसभेचे अध्यक्ष खादर यांनी घोषणा केली होती की, सभागृहात आमदारांच्या उपस्थितीचे निरीक्षण एआय-एनेबल्ड कॅमेऱ्यांद्वारे केले जाईल. यामुळे केवळ वेळेचे पालन करणारे आमदारच नाही तर कामकाजात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्याही समजेल.