Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकमध्ये १० मे रोजी विधानसभेसाठी मतदान होणार असून त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक अर्ज सादर करत असताना संपत्तीची माहिती द्यावी लागते. त्यानुसार २०१८ च्या तुलनेत २०२३ मध्ये भाजपामधील मंत्र्यांची संपत्ती किती वाढली, याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांच्या संपत्तीमधील जंगम मालमत्तेमध्ये मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. या पाच मंत्र्यांमध्ये आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के. सुधाकर, ऊर्जा मंत्री व्ही सुनील कुमार, सार्वजनिक बांधकाम मंत्री सीसी पाटील, महामंडळे मंत्री एसटी सोमशेखर आणि उद्योग मंत्री मुरुगेश निरानी यांच्या संपत्तीमध्ये वाढ झाली आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे मंत्र्यांनी शपथपत्रात नमूद केल्यानुसार मंत्र्यांच्या संपत्तीची माहिती समोर आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री सुधाकर यांच्यासह १७ आमदारांनी बंडखोरी करून २०१९ साली भाजपामध्ये प्रवेश केला होता आणि पोटनिवडणूक जिंकली होती. २०१८ साली त्यांची जंगम मालमत्ता १.११ कोटी एवढी होती, २०२३ साली २.७९ कोटी एवढी मालमत्ता झाली आहे. याकाळात त्यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये फारशी वाढ झालेली नाही. मात्र सुधाकर यांच्या पत्नी डॉ. प्रिथी जीए यांच्या स्थावर मालमत्तेमध्ये मात्र मोठी वाढ झाली आहे. २०१८ साली १.१७ कोटी असलेली त्यांची संपत्ती वाढून १६.१ कोटी एवढी झाली आहे. यामध्ये त्यांनी मागच्यावर्षी बंगळुरु शहराच्या सदाशिवनगर येथे विकत घेतलेल्या १४.९२ कोटी किमतीच्या घराचा देखील समावेश आहे.

Bahujan samaj vidhan sabha election 2024
बहुजन समाजातील संधीसाधूपणावर उपाय काय?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
BJP office bearers in Maval asserted their position to campaign for Bapu Bhegde of NCP Ajit Pawar party Pune news
देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतरही ‘मावळ पॅटर्न’…!
Loksatta lalkilla Assembly elections in Maharashtra BJP campaign
लालकिल्ला: भाजपचा प्रचार करणार कोण?
बंडखोरीचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात; ‘अकोला पश्चिम’मध्ये हरीश आलिमचंदानींच्या भूमिकेकडे लक्ष; रिसोडमध्ये महायुतीत मिठाचा खडा
Challenges facing by shinde shiv sena candidate in Maharashtra state assembly elections 2024
Ambernath Assembly Constituency : अंबरनाथमध्ये आमदार किणीकरांच्या अडचणीत वाढ
The central government has announced the guaranteed price of six rabi crops
हमीभावाचा अर्थ व अनर्थ
gross state income maharashtra
महाराष्ट्राची दशकभरात पीछेहाट, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष; सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला

हे वाचा >> Karnataka : “हिजाब, हलाल हे मुद्दे महत्त्वाचे नाहीत,” माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा भाजपाला घरचा आहेर

महामंडले मंत्री सोमशेखर यांच्या जंगम मालमत्तेमध्ये आठ पटीने वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यांनीही बंडखोरी करून भाजपातर्फे पोटनिवडणूक लढविली होती. २०१८ साली ६७.८३ लाख असलेली त्यांची जंगल मालमत्ता वाढून ५.४६ कोटी एवढी झाली आहे. ऊर्जा मंत्री कुमार यांची जंगम मालमत्ता तीन पटीने वाढली आहे. २०१८ साली ५३.२७ लाख असेलली त्यांची संपत्ती आता १.५९ कोटी एवढी झाली आहे. तर स्थावर मालमत्तेमध्ये अडीचपट वाढ झाली आहे. स्थावर मालमत्ता १.६८ कोटींवरून ४.०३ कोटी एवढी झाली.

उद्योग मंत्री निरानी यांच्याही जंगम मालमत्तेमध्ये घसघशीत वाढ दिसत आहे. १६ कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता आता २७.२२ कोटींवर पोहोचली. तर स्थावर मालमत्ता ४.५८ कोटींवरून ८.६ कोटींवर पोहोचली आहे. त्यांच्या पत्नी कमला निरानी यांच्या मालमत्तेत डोळे विस्फारणारी वाढ झाली आहे. २०१९ साली ११.५८ कोटी असलेली त्यांची संपत्ती वाढून आता ३८.३५ कोटी झाली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री पाटील यांची जंगम मालमत्ता ९४.३६ लाखांवरून ३.२८ कोटींवर पोहोचली. तर स्थावर मालमत्ता ४.४७ कोटींवरून ७.२ कोटींवर पोहोचली आहे.

हे ही वाचा >> कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा धक्का, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार

प्रतिज्ञापत्रात कुणाची किती संपत्ती (रुपयांमध्ये)

के सुधाकर

२०२३

जंगम मालमत्ता – २.७९ कोटी (पत्नी ६.५९ कोटी)
स्थावर मालमत्ता – २.६६ कोटी (पत्नी १६.१ कोटी)
कर्ज – १.६ कोटी

२०१८

जंगम मालमत्ता – १.११ कोटी
स्थावर मालमत्ता – २.२३ कोटी
कर्ज – १५.९४ लाख

मुरुगेश निरानी

२०२३

जंगम मालमत्ता – २७.२२ कोटी (पत्नी ३८.३५ कोटी)
स्थावर मालमत्ता – ८.६ कोटी
कर्ज – २२.६२ कोटी

२०१८

जंगम मालमत्ता – १६ कोटी (पत्नी ११.५८ कोटी)
स्थावर मालमत्ता – ४.५८ कोटी (२०.३ कोटी)
कर्ज – ८.३१ कोीट (१५.२३ कोटी)

सीसी पाटील

२०२३

जंगम मालमत्ता – ३.२८ कोटी
स्थावर मालमत्ता – ७.२ कोटी
कर्ज – ३.२२ कोटी

२०१८

जंगम मालमत्ता – ९४.३६ लाख
स्थावर मालमत्ता – ४.४७ कोटी
कर्ज – १.०९ कोटी

व्ही सुनील कुमार

२०२३

जंगम मालमत्ता – १.५९ कोटी (पत्नी १.४२ कोटी)
स्थावर मालमत्ता – ४.०३ कोटी
कर्ज – ४५.१५ लाख

२०१८

जंगम मालमत्ता – ५३.२७ लाख (पत्नी ६२.२९ लाख)
स्थावर मालमत्ता – १.६८ कोटी
कर्ज – ६९.४३ लाख

एसटी सोमशेखर

२०२३

जंगम मालमत्ता – ५.४६ कोटी
स्थावर मालमत्ता – ८.९१ कोटी
कर्ज – १.२२ कोटी

२०१८

जंगम मालमत्ता – ६७.८३ लाख
स्थावर मालमत्ता – ८.१४ कोटी
कर्ज – ९२ लाख