कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. याच कारणामुळे सत्ता कायम राखण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. मात्र निवडणूक तोंडावर आलेली असताना भाजपामध्ये गटबाजी आणि अंतर्गत नाराजी पाहायला मिळत आहे. भाजपाचे नेते तथा माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा निवडणुकीच्या राजकारणातून बाहेर पडलेले असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते सक्रिय झाले आहेत. परिणामी कर्नाटक भाजपाच्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
हेही वाचा >>> ठाकरे गट फुटत नसल्याने नागपूरमध्ये शिंदे गटाकडून मनसेला खिंडार; नागपूर जिल्हा सचिवाचा पक्षप्रवेश
शिकारीपुरा जागेवर कोणाला संधी मिळणार
बी एस येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुरा या जागेवर कोणाला संधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या जागेसाठी बी एस विजयेंद्र यांना तिकीट दिले जाऊ शकते. यावरच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाला तिकीट द्यायचे हे पक्ष ठरवेल. हा निर्णय कोण्याच्याही घरात घेतला जाऊ शकत नाही, अस रवी म्हणाले आहे. बी एस येडियुरप्पा त्यांचे पुत्र बी एस विजयेंद्र यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वत:चे प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच कारणामुळे भाजपाचे अरुण सोममान्ना, सी टी रवी यांनी विजयेंद्र यांच्या भूमिकेबद्दल आक्षेप व्यक्त केला आहे.
हेही वाचा >>> रामचरितमानसवरून पुन्हा एकदा JDU-RJD आमनेसामने; जेडीयूचा नेता म्हणाला, “आता कुराण आणि बायबल…”
विजयाची क्षमता लक्षात घेऊनच एखाद्या व्यक्तीला तिकीट दिले जाईल
“एखाद्या जागेवर कोणाला तिकीट द्यायचे हे कोणाच्याही घरात किंवा कोणाच्याही मर्जीने ठरवले जाणार नाही. कोणीतरी कोणाचा मुलगा आहे, या एका निकषावरून तिकीट दिले जाणार नाही. विजयेंद्र यांना तिकीट द्यायचे की नाही ते पक्ष ठरवेल. विजयाची क्षमता लक्षात घेऊनच तिकीट दिले जाईल. त्यासाठी सर्वेक्षण केले जाईल. हा सर्वेदेखील निप:क्षपणे केला जाईल,” असे रवी म्हणाले.
हेही वाचा >>> भाजपाला बिहारमध्ये हवे आहेत नवे सहकारी; केंद्रीय सुरक्षा व्यवस्था देऊन नवे सहकारी जोडण्याचा प्रयत्न
विजयेंद्र यांना शिकारीपुरा या जागेवरून तिकीट मिळणार का?
दरम्यान, येडियुरप्पा यांच्या हस्तक्षेपामुळे कर्नाटक भाजपामधील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे आगामी काळात येडियुरप्पा यांचे पुत्र विजयेंद्र यांना शिकारीपुरा या जागेवरून तिकीट मिळणार का? विजयेंद्र यांच्या माध्यमातून येडियुरप्पा पुन्हा एकदा आपले वर्चस्व निर्माण करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.