केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी कर्नाटक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यातून ते कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं रणसिंग फुंकतील. या दौऱ्यादरम्यान ते मंड्या जिल्ह्यात एका मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला एक लाख लोकांची गर्दी अपेक्षित आहे. या भागात काँग्रेस आणि जेडी(एस)चं वर्चस्व अधिक आहे. आगामी निवडणुकीत हा बालेकिल्ला भेदण्याचा प्रयत्न भाजपाचा असणार आहे. याच पार्श्वभूमीवर अमित शाह मंड्या जिल्ह्यातून प्रचाराला सुरुवात करतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित शाह गुरुवारी सायंकाळी बेंगळुरू येथे पोहोचतील. शुक्रवारी ते मंड्या येथील सभेला संबोधित करतील आणि एका मेगा डेअरीचं उद्घाटन करतील. यानंतर अन्य एका कार्यक्रमासाठी ते बंगळुरूला परततील. या दौऱ्यात ते कर्नाटकातील भाजपाच्या प्रमुख नेत्यांचीही बैठक घेणार आहेत. तसेच मल्लेश्वरम येथील सौहर्दा सहकारी फाउंडेशनलाही अमित शाह भेट देणार आहेत. शनिवारी ते भाजपाचे बूथ प्रमुख आणि बूथ-स्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्याच दिवशी संध्याकाळी ते नवी दिल्लीला रवाना होतील. असा त्यांचा हा कर्नाटक दौरा असणार आहे.

हेही वाचा- ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान राहुल गांधींच्या सुरक्षेत हलगर्जीपणा? काँग्रेसचे थेट अमित शाहांना पत्र; केली मोठी मागणी

कर्नाटकचे सहकार मंत्री एस टी सोमशेकर यांनी पत्रकारांना सांगितलं, “मंड्या येथील सभेमुळे भाजपाला बळ मिळेल. आगामी निवडणुकीत मंड्या जिल्हा जेडी(एस) आणि काँग्रेसचा बालेकिल्ला राहणार नाही. त्यांनी आधीच मंड्या लोकसभा मतदारसंघ गमावला आहे.” अपक्ष खासदार सुमलता अंबरीश हे सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.

हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या मातोश्री रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राहुल गांधींचं ट्वीट, म्हणाले “एका आई आणि मुलामधील प्रेम…”

“आगामी निवडणुकीत मंड्या, म्हैसूर, चामराजनगर, हसन आणि रामनगरा जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. या भागात पक्ष मजबूत करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जात आहे,” अशी माहितीही सोमशेकर यांनी दिली.