आगामी कर्नाटक निवडणुकीत भाजपा गुजरात आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांच्या तिकीट वाटप मॉडेलचे अनुकरण करू शकते. विशेष म्हणजे ज्यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता नाही, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे दिग्गज नेते बी एस येडियुरप्पा यांचाही समावेश आहे.

एवढंच नाही तर भाजपाच्या वरिष्ठ सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सरकारविरोधी लाट दूर करण्यासाठी जवळपास २० टक्के विद्यमान आमदारांना निवडणुकीसाठी तिकीट नाकरले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय तिकीट त्यांना नाकारले जाण्याची शक्यता आहे, ज्यांचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या सगळ्यावर आपल्या धाकट्या मुलाच्या पुनर्वसनासाठी धडपडणारे येडियुरुप्पा काय प्रतिक्रिया देतील हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र मागील वेगळी त्यांनी राजीनामा दिला तेव्हा भाजपाच्या महत्त्वाच्या लिंगायत मतांना त्याचा फटका बसला होता. याशिवाय उमेदवार फेरबदल करणे हे भाजपासाठी धोक्याचे ठरू शकते, कारण भाजपा सध्या जुन्या लोकांच्या असंतोषाचा सामना करत आहे.

st mahamandal upi ticket loksatta
ST Bus Tickets UPI : सुट्ट्या पैशाच्या वादावर एसटीचा यूपीआयचा तोडगा
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Narendra Modi JP Nadda
भाजपावर मतदारांसह देणगीदारांचीही कृपा, वर्षभरात तब्बल ३,९६७ कोटींच्या देणग्या, ८७ टक्के वाढ
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
aditi tatkare
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे ३० लाख अर्ज बाद होणार? आदिती तटकरे म्हणाल्या, “ऑक्टोबरमध्ये…”
margin of victory in elections depends on voter participation IISER Pune developed model
निवडणुकीतील विजयाचे अंतर मतदारांच्या सहभागावर अवलंबून; ‘आयसर पुणे’ने विकसित केले मॉडेल
Raigad and Nashik
Guardian Minister : रायगड व नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती; मंत्र्यांच्या नाराजीनाट्यानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय!
Arvind Kejriwal
“दिल्लीतल्या भाडेकरूंनाही मोफत वीज व पाणी देणार”, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांची मोठी घोषणा

कर्नाटकात गुजरातप्रमाणेच मुख्यमंत्री बदलला जाणार नाही. कारण आता निवडणुकीसाठी केवळ तीन महिने बाकी आहेत. त्यामुळे हे निश्चित आहे की जर भाजपा पुन्हा सत्तेत आली तर बसवराज बोम्मई हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील.

“सर्व विद्यमान आमदारांना तिकीट दिले जाणार नाही, काही ज्येष्ठांना वयाच्या कारणास्तव वगळले जाऊ शके. तर काहींना तिकीट नाकरले जाईल कारण त्यांच्या मतदारसंघात जनमत त्यांच्या विरोधात आहे.” असे भाजपाच्या एक ज्येष्ठ नेत्याने सांगितले आहे. येडियुरप्पा हे ७९ वर्षांचे असताना, सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले आहे की, ज्यांना वगळले जाऊ शकते त्यामध्ये माजीमंत्री के एस ईश्वरप्पा(वय-७४) आणि जी एच थिपारेड्डी(वय-७५) यांचा समावेश आहे.

असे म्हटले जात आहे की, अमित शाह यांनी आपल्या कर्नाटक दौऱ्यांमध्ये भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंह यांनी उपस्थित सदस्यांपैकी एक तृतीयांश जणांना बाहेर करण्याच्या, आपल्या निर्णयाबाबत प्रदेश समितीला माहिती दिली होती. जेणेकरून नव्या चेहऱ्यांना संधी देता येईल. यासाठी खराब कामगिरी, निवडणूक लढण्यासाठीची कमी योग्यता आणि अलोकप्रियता हे मापदंड असतील. असे सांगितले जात आहे की भाजपा नेतृत्वाने त्या आमदारांनाही तिकीट देण्यास नकार दर्शवला आहे, जे तीन किंवा त्यापेक्षा अधिकवेळा आमदार राहिलेले आहेत.

Story img Loader