कर्नाटकमध्ये राजकीय पक्षांना काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपाचे नेतेही तयारीला लागले असून येथे सभा, बैठकांच्या माध्यमांतून जनतेशी संपर्क साधण्यात येत आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाला लिंगायत समाजामध्ये लोकप्रियता असलेल्या बी एस येडियुरप्पा यांची कमतरता भासणार आहे. कारण येडियुरप्पा यांनी नुकतेच निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, कर्नाटकमधील एका कार्यक्रमात येडियुरप्पा यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. मोदींमुळेच मी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री होऊ शकलो, असे येडियुरप्पा म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “आपण कुठे राहतोय? भारत की उत्तर कोरिया?” प्रसार भारतीने हिंदुस्थान समाचारशी करार केल्यानंतर विरोधकांचा सवाल

मोदी यांना कर्नाटकच्या भूमीने कायमच प्रेरणा दिलेली

शिवमोग्गा येथील विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात बी एस येडियुरप्पा बोलत होते. यावेळी त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे स्मरण केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृपेमुळेच राजकारणात मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो, असे येडियुरप्पा म्हणाले. तसेच मोदी यांना कर्नाटकच्या भूमीने कायमच प्रेरणा दिलेली आहे. संत बसवण्णा यांच्या शिकवणीचा मोदी यांच्यावर कायमच प्रभाव राहिलेला आहे, असेही येडियुरप्पा म्हणाले.

सगळं काही मोदींच्या कृपेमुळेच

“माझ्या ६० वर्षांच्या राजकारणात मी फक्त सात वर्षे सत्तेत होतो. मात्र या सात वर्षांत मी राज्यभर फिरलो. तसेच समानता, सामाजिक न्याय यासाठी मी काम केले. मोदी यांच्या आशीर्वादामुळेच मी हे करू शकलो,” असे बी एस येडीयुरप्पा म्हणाले.

हेही वाचा >>> अरविंद केजरीवाल यांचे साथीदार, दिल्ली सरकारमध्ये सांभाळली अनेक महत्त्वाची खाती; अटक झालेले मनिष सिसोदिया कोण आहेत?

मोदी बसवण्णांच्या शिकवणीचा उल्लेख करतात

“कर्नाटक राज्याकडून मोदी यांना बरेच काही मिळालेली आहे. कर्नाटक ही बसवण्णांची भूमी आहे. येथे काम हीच पूजा असल्याचे म्हटले जाते. केंद्र सरकारला मेक इन इंडिया, स्कील इंडिया आदी योजनांची प्रेरणा याच शिकवणीतून मिळालेली आहे. मोदी जेथे कुठे जातात तेथे बसवण्णा यांच्या शिकवणीचा उल्लेख करततात,” असे येडियुरप्पा म्हणाले.

“नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाने मी खासदार, आमदार, मुख्यमंत्री झालो. मी जनतेचा ऋणी आहे. माझ्या ६० व्या वाढदिवसाला दिवंगत नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी हजेरी लावली होती. माझ्या ८० व्या वाढदिवशी पंतप्रधान नोदी उपस्थित राहिले आहेत. म्हणूनच माझा वाढदिवस संस्मरणीय ठऱला,” असेही येडियुरप्पा म्हणाले.

हेही वाचा >>> मनिष सिसोदियांच्या अटकेनंतर विरोधकांची एकजूट, काँग्रेस मात्र गप्प; जाणून घ्या कोणत्या पक्षाची काय भूमिका?

येडियुरप्पांची कमतरता भरून काढणाऱ्या नेत्याचा शोध सुरूच

दरम्यान, येडियुरप्पा यांचे कर्नाटकच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. कर्नाटकमध्ये १७ टक्के लिंगायत समाज आहे. त्यामुळे निवडणूक जिंकायची असेल तर या समाजाची मतं फार महत्त्वाची आहेत. येडियुरप्पा यांचे लिंगायत समाजाच चांगले वजन आहे. मात्र त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेतल्यामुळे येडियुरप्पा यांची जागा भरून काढणाऱ्या प्रभावी लिंगायत नेत्याचा भाजपाकडून शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka former cm b s yediyurappa calls pm narendra modi global citizen prd