कर्नाटकात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर लोकसभेच्या तिकीट वाटपावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये नेते एकमेकांना भिडलेले दिसत आहेत. आपल्या मुलांना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी कर्नाटक मंत्रिमंडळातील दोन नेते संघर्ष करत असल्यामुळे कर्नाटक काँग्रेसमध्ये आतापासूनच तिकीट वाटपावरून पेच निर्माण झालेला आहे. कोण आहेत हे दोन नेते; कर्नाटक काँग्रेसमधील संघर्ष आणि लोकसभेच्या उमेदवार निवडीवर होणारा परिणाम जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.

काही महिन्यांपूर्वीच कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला होता. त्याच काँग्रेसमध्ये २०२४ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीचे तिकीट वाटप डोकेदुखी ठरत आहे. सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक मंत्रिमंडळातील दोन दिग्गज नेते आपल्या मुलांना लोकसभेचे तिकीट मिळावे यासाठी भिडले आहेत. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर या अनुक्रमे आपल्या प्रियांका आणि मृणाल या मुलांना तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नरत आहेत.

Chirag Paswan
Chirag Paswan : उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेसला नवं आव्हान; चिराग पासवान यांनी आखली मोठी योजना
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Ajit Pawar demand to BJP regarding the post of Chief Minister print politics news
मुख्यमंत्रीपद ‘फिरते’ हवे? अजित पवार यांची भाजपकडे मागणी
sharad pawar loyalist jayant patil criticized amit shah narendra modi
मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे  घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
Shetkari Sangharsh Kruti Samiti, Dhananjay Munde,
कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात सर्वपक्षीय ‘शेतकरी संघर्ष कृती समिती’ची मोट
Congress stays away from power can there be happiness in country
चंद्रपूर: काँग्रेस मायावी रावण, सावध रहा…..भाजप नेत्याच्या वक्तव्याने……
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू

हेही वाचा : १९८४ नंतर पहिल्यांदाच शीखबहुल भागात काँग्रेसची सभा; काय असेल काँग्रेसची रणनीती ?

सतीश जारकीहोळी हे प्रख्यात साखर उद्योगपती असणाऱ्या जारकीहोळी कुटुंबातील आहेत. सतीश यांचे दोन भाऊ रमेश आणि बालचंद्र हे भाजपाचे आमदार असून तिसरे भाऊ लखन जारकीहोळी हे कॉंग्रेसचे आमदार आहेत. तसेच सतीश हे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे जवळचे सहकारीही आहेत. १५ वर्षांपूर्वी सिद्धरामय्या यांच्यासह ते जनता दलातून काँग्रेसमध्ये आले होते.

हेब्बाळकर या कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गटातील आहेत. त्यांचे धाकटे भाऊ चन्नाराज हत्तीहोळी २०२१ मध्ये विधान परिषदेवर निवडून आले होते. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला उमेदवारी देऊन शिवकुमार यांना राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या बेळगावी जिल्ह्यात आपला प्रभाव वाढवायचा आहे. बेळगावी जिल्ह्यात बेळगावी आणि चिक्कोडी हे दोन लोकसभा आणि १८ विधानसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना आपापल्या मुलांकरिता बेळगावी मतदारसंघ हवा आहे. कारण या दोहोंच्या मते तो त्यांचा बालेकिल्ला आहे.

कर्नाटक काँग्रेसमध्ये होणारी ही तिकीट वाटपाची लढाई अजून त्यांच्या गटातच सुरू आहे. सतीश जारकीहोळी यांनी नुकतेच सांगितले की, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी त्यांचे कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही निवडणुकीची गणिते बघून एकमेकांना सहकार्य करतो. २०२१ च्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी माझा भाऊ लखन आणि हेब्बाळकर यांचा भाऊ चन्नाराज दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होते. तेव्हाही निवडणुकीची गणिते पाहून आम्ही त्यांचा भाऊ जिंकेल याची तयारी केली होती. माझा भाऊ २०२२ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी जिंकून आला.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारसंघातून तीन संभाव्य उमेदवारांची नावे येत्या काही दिवसांत पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्यात येतील. बेळगावी जिल्ह्यात ओबीसी आणि लिंगायत अशा दोन उमेदवारांना तिकीट देण्याची काँग्रेसची योजना आहे. हेब्बाळकर हे पंचमसाली लिंगायत आहेत, तर जारकीहोळी हे अनुसूचित जमातीतील वाल्मिकी समाजाचे आहेत. त्यामुळे हे दोन्ही योग्य उमेदवार आहेत. आता तिकीट मिळवण्यासाठी प्रियांका आणि मृणाल यांच्यासह अन्य लोकसुद्धा इच्छुक आहेत. आता अंतिम निर्णय पक्षनेतेच घेतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.