Karnataka Ticket Allocation for Assembly Election : कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे मोठे नेते बीएस येडियुरप्पा यांना भाजपाने या वेळी तिकीट नाकारले आहे. लिंगायत समाजाचे मातब्बर नेते म्हणून येडियुरप्पा यांच्याकडे पाहिले जाते. मात्र या वेळी त्यांना तिकीट न देता फक्त त्यांचा मुलगा बीवाय विजयेंद्र यालाच उमेदवारी देण्यात आली. ही रणनीती थेट दिल्लीतून ठरविण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात विजय सोहळ्यास उपस्थिती लावली होती. या विजय सोहळ्याला संबोधत करत असताना त्यांनी, घराणेशाहीच्या राजकारणाला आपण लांब ठेवले आणि जनतेने आपल्याला मतदानाच्या स्वरूपात पाठिंबा दिला. मतदार घराणेशाहीच्या राजकारणाला थारा देत नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले होते.

तसेच मे महिन्यात हैदराबाद येथे भाषण करताना ते म्हणाले, “ज्या ज्या ठिकाणी घराणेशाहीच्या राजकारणाला तिलांजली दिली गेली, त्या त्या ठिकाणी विकास आणि प्रगती झाली आहे. परिवारवादाचे राजकारण लोकशाहीसाठी घातक असून ज्या ठिकाणी परिवार पक्षाची सत्ता आली, त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला. कुटुंबाला आपल्या हातातच सत्ता जास्तीत जास्त काळ राहावी, असे वाटते,” हैदराबाद येथे केलेल्या या भाषणातून मोदी यांनी ‘भारत राष्ट्र समिती’ पक्षाला लक्ष्य केले.

Rahul Gandhi questions EC over more voters in Maharashtra than total adult population
प्रौढांच्या संख्येपेक्षा जादा मतदार; महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून राहुल गांधी यांचा दावा
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Akshata Murty chaturang loksatta
पालकत्वाचा संस्कार रुजवण्याची गोष्ट…
ajit pawar said cm listens to his daughter who has her 10th exam
एकुलती एक असल्याने मुख्यमंत्र्यांना मुलीचे ऐकावे लागते, अजित पवार
dhananjay munde karuna sharma Controversy
Karuna Munde: ‘वाल्मिक कराडचा मुलगा कोट्याधीश, पण धनंजय मुंडेंचा मुलगा बेरोजगार’, करुणा मुंडेंनी मुलाबाबत का सांगितलं?
Rahul Gandhi urges PM Modi to acknowledge the failure of the Make in India initiative.
Make In India योजना अपयशी? राहुल गांधी म्हणाले, “पंतप्रधानांनी मान्य करावे की…”
Anjali Damanias allegations against Minister Dhananjay Munde are part of BJPs conspiracy says anil deshmukh
दमानियांचे मुंडेवरील आरोप, अनिल देशमुखांना वेगळीच शंका
Devendra Fadnavis alleges Rahul Gandhi
Devendra Fadnavis : “महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही”, फडणवीसांचे विधानसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर

हे वाचा >> तिकीटवाटपात काँग्रेस-भाजपाकडून लिंगायत समाजाला मानाचे स्थान; लिंगायत नेत्यांना तिकीट देण्यात चढाओढ

मागच्या वर्षी येडियुरप्पा यांच्या मुलाला विधान परिषदेची उमेदवारी देण्यास विरोध करण्यात आला होता. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये येडियुरप्पा यांनी निवडणुकीच्या राजकारणातून माघार घेण्याचे जाहीर केले. आपल्या मुलाला शिवमोग्गा जिल्ह्यातील शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी, यासाठी ते प्रयत्नशील होते. भाजपाने १० मे रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी उमेदवारांच्या ज्या याद्या जाहीर केल्या त्यांमधून बाप-लेकांच्या जोड्यांवर काट मारली आहे. घराणेशाहीला बाजूला ठेवून भाजपाने एक प्रकारे कर्नाटकमधील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस पक्षावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) या पक्षावर गौडा परिवाराचा प्रभाव आहे.

घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात भाजपाने देशभरात आघाडी घेतली आहे. या माध्यमातून प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस आणि त्या त्या राज्यातील प्रादेशिक पक्षांना नामोहरम करणे, हा यामागचा उद्देश दिसत आहे. राज्यांच्या निवडणुकीत भाजपाने ही रणनीती आता अवलंबिली असली तरी या रणनीतीकडे मोठ्या परिप्रेक्ष्यातून पाहायचे झाल्यास भाजपा एकप्रकारे २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी करत असल्याचे दिसते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राज्या राज्यातील प्रादेशिक पक्ष एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकतात. अशा वेळी त्यांच्यावर टीका करण्यासाठी भाजपाकडे घराणेशाहीच्या विरोधातील मुद्दा तयार असेल.

हे ही वाचा >> बेळगावमधील सर्वाधिक जागा मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस पक्षात चुरस; सीमावाद मोठा प्रश्न

आठ वेळा आमदार राहिलेल्या येडियुरप्पा यांच्याऐवजी भाजपाने त्यांचा मुलगा विजयेंद्रला उमेदवारी दिली. त्याचप्रमाणे विजयनगरचे आमदार आनंद सिंह यांचा मुलगा सिद्धार्थ सिंह याला उमेदवारी दिली. आनंद सिंह तीन वेळा विजयनगर येथून निवडून आले होते. तसेच हुक्केरी मतदारसंघासाठी निखिल कट्टी यांना तिकीट देण्यात आले. माजी आमदार उमेश कट्टी यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात येत आहे.

मुलांना उमेदवारी देत असताना भाजपाने काही ठिकाणी मुलांऐवजी वडिलांनाच उमेदवारी देऊ केली आहे. जसे की, ज्येष्ठ नेते गोविंद कारजोळ यांचा मुलगा गोपाल कारजोळ आणि व्ही. सोमण्णा यांचा मुलगा अरुण सोमण्णा यांना तिकीट नाकारण्यात आले आहे. व्ही. सोमण्णा यांना तर चामराजनगर आणि वरुणा अशा दोन मतदारसंघांतून उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सोमण्णा यांचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी दोन मतदारसंघांतून उमेदवारी देण्यात आल्याचे भाजपा नेते सांगतात. मुरुगेश निराणी आणि रमेश जारकीहोळी या भाजपा नेत्यांनाही आपल्या मुलांना उमेदवारी मिळवून द्यायची होती. पण केंद्रीय नेत्यांनी ज्या प्रकारे घराणेशाहीविरोधात कार्यक्रम राबवला, तो पाहता या नेत्यांनी आपली मागणी पुढे न करणेच योग्य ठरेल.

फेब्रुवारी २०२३ मध्ये, बंगळुरू येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, २०१४ पासून भारतातील राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडले आहेत. देशातील घराणेशाहीच्या राजकारणाला मूठमाती देण्याचा प्रयत्न मोदीपर्वात करण्यात येत आहे. “प्रादेशिक पक्षांतील घराणेशाहीमुळे फक्त एकाच कुटुंबातील सदस्यांना संधी मिळते. ज्यामुळे इतरांना पुढे येण्यास वाव मिळत नाही. जर तुम्ही सत्ताधारी कुटुंबात जन्माला आला असाल तरच तुम्हाला सत्ता उपभोगता येते, अन्यथा तुम्हाला महत्त्व नाही. आमच्या काळात ज्याच्यात कुवत आहे, त्याला संधी दिली जात आहे. हा सर्वात मोठा बदल सध्या घडत आहे,” अशी भूमिका शाह यांनी मांडली होती.

शाह पुढे म्हणाले की, समाजवादी विचारधारा असलेला राष्ट्रीय जनता दल पक्ष जातीयवादी पक्षात आणि नंतर कुटुंबवादी पक्षात रूपांतरीत झाला. हेच कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाच्या बाबतीत म्हणता येईल. त्यांच्या घरातील प्रत्येक जण राजकारणात आहे. मला कधी कधी आश्चर्य वाटते की, प्रत्येक जण जर राजकारणात आहे, तर त्यांचे घर कोण सांभाळत असेल?

काँग्रेस आणि जेडीएसच्या तिकीटवाटपात घराणेशाहीला झुकते माप

भाजपाने घराणेशाहीच्या विरोधात मोर्चा उघडला असताना काँग्रेस आणि जेडीएसने मात्र काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांना तिकिटे वाटली आहेत. माजी केंद्रीय गृहमंत्री केएच मुनीयप्पा आणि त्यांची कन्या रूपकला शशीधर यांना तिकीट मिळाले आहे. तर ९२ वर्षीय शामानूर शिवशंकरप्पा आणि त्यांचे पुत्र एसएस मल्लिकार्जुन, आमदार रामलिंगा रेड्डी आणि त्यांची कन्या सौम्या रेड्डी या जोड्यांना काँग्रेसने तिकीट देऊ केले आहे. तर जेडीएसने माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि त्यांचे पुत्र निखिल आणि ज्येष्ठ नेते जीटी देवेगौडा आणि त्यांचे पुत्र हरीश गौडा यांनाही तिकीट दिले आहे.

बाप-लेक नाही पण कुटुंबीयांना भाजपाकडून उमेदवारी

भाजपाने बाप-लेकांच्या किंवा लेकींच्या जोड्यांना तिकीट दिले नसले, तरी एकाच कुटुंबातील दोन सदस्यांना संधी दिलेली आहे. बेळगावमधून जारकीहोळी बंधू रमेश आणि भालचंद्र भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. भाजपा खासदार अन्नासाहेब जोले यांच्या पत्नी आणि राज्यमंत्री शशिकला जोले निपाणीमधून निवडणूक लढवत आहेत. खासदार उमेश जाधव यांचा मुलगा अविनाश जाधव याला चिंकोळी येथून उमेदवारी दिली. तर दिवंगत आमदार आनंद ममानी यांच्या पत्नी रत्ना ममानी यांना सौंदत्ती येथून उमेदवारी देऊ केली आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलीन कतील जेडीएसच्या घराणेशाहीवर टीका करताना म्हणाले की, कुटुंबाच्या कचाट्यात एखादा पक्ष अडकल्यास त्याचे काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेडीएस पक्ष. भाजपाने ५२ नव्या चेहऱ्यांना उमेदवारांच्या यादीत स्थान दिल्यानंतर कतील यांनी हे वक्तव्य केले. तर दुसरीकडे जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी भाजपाच्या या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, घराणेशाहीच्या राजकारणापेक्षाही सांप्रदायिक राजकारण हे देशासाठी अधिक घातक आहे. “परिवारवादी पक्षांकडून देशाला धोका नाही, तर भाजपासारख्या जातीयवादी पक्षाकडून धोका आहे. भावनिक मुद्दे उकरून राजकीय स्वार्थ साधणाऱ्या पक्षाकडून लोकशाहीला खरा धोका आहे आणि संवैधानिक मूल्यांनाही यातून तडा जातो,” अशी भूमिका एचडी कुमारस्वामी यांनी मे २०२२ मध्ये मोदींच्या घराणेशाहीवरील टीकेनंतर मांडली होती.

Story img Loader