सुजित तांबडे

राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण देणारा कसबा विधानसभा मतदार संघ हा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राज्यात चर्चेला आला आहे. गेल्या २८ वर्षांपासून या मतदार संघावर भाजपने अधिराज्य गाजवले; पण या निवडणुकीत भाजपचा पाडाव करून काँग्रेसने भाजपच्या या बालेकिल्ल्यावर पुन्हा कब्जा केला आहे. एकेकाळी काँग्रेसचे प्राबल्य असलेला हा मतदार संघ भाजपने कौशल्याने ताब्यात घेतला; पण जुन्या नेतृत्वाला बाजूला करून नव्या नेतृत्वाच्या हातात सूत्रे गेली आणि फाजित आत्मविश्वासाने भाजपचे हे संस्थान खालसा झाले आहे.

Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
smriti irani in Vasai Assembly constituency for Maharashtra Assembly Election 2024
वसईची परिस्थिती जैसे थे; स्मृती इराणी, महायुतीच्या प्रचारासाठी वसईत सभा
BJP counter meeting outside the Jammu and Kashmir Legislative Assembly
जम्मू-काश्मीर विधानसभेबाहेर भाजपची प्रतिविधानसभा; मार्शलच्या सहाय्याने सभागृहाबाहेर काढल्यानंतर पाऊल
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव
ambrishrao Atram Aheri, Aheri, BJP Aheri,
अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही

आरंभीचा काळ काँग्रेसचा

कसबा मतदार संघाची १९५७ मध्ये निर्मिती करण्यात आली. त्याकाळी काँग्रेसचे देशात प्रभुत्व असल्याने काँग्रेसच्या ताब्यात हा मतदार संघ होता. तेव्हापासून हा मतदार संघ पेठांचा राहिला आहे. या भागातील लोकवस्ती ही निम्मी उच्चविद्याविभूषित आणि निम्मी कामगार वर्ग असलेली अशी आहे. या मतदार संघाच्या रचनेत बदल झाल्यानंतरही फारसा फरक पडला नाही. आरंभीचे २० वर्षे हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे.

पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस

पुणे महापालिकेची स्थापना १९५० मध्ये करण्यात आली. पुण्याचे पहिले महापौर बाबुराव सणस यांनी १९६२ च्या निवडणुकीत आमदार म्हणून या मतदार संघाचे नेतृत्त्व केले आहे. सणस हे त्या काळात पुण्याच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्त्व मानले जात असे. त्यांच्या नेतृत्वामुळे हा मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात होता. सणस यांच्यानंतर पुढील दहा वर्षे या मतदार संघात अन्य कोणत्याही पक्षाला शिरकाव मिळू शकला नाही. १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसचे आर. व्ही. तेलंग यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले.

कसब्याच्या निकालाने पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार

कसब्याच्या पहिल्या महिला आमदार

कसब्याच्या पहिल्या महिला आमदार काँग्रेसच्या लिलाताई मर्चंट या आहेत. त्यांनी १९७२ च्या निवडणुकीत विजय मिळविला होता. मात्र. दोन वर्षांनंतर मध्यवधी निवडणुका झाल्या. त्यामुळे त्यांना अल्प कालावधी मिळाला. या मतदार संघाच्या दुसऱ्या महिला आमदार म्हणून मुक्ता टिळक यांनी नेतृत्व केले.

जन संघाचे अरविंद लेले

या मतदार संघात पहिल्यांदा काँग्रेसचा पराभव हा १९७८ च्या निवडणुकीत झाला. त्या निवडणुकीत जन संघाचे अरविंद लेले हे विजयी झाले. त्यानंतरच्या १९८० मध्ये झालेल्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकीटावर पुन्हा निवडून आले. तेव्हापासून भाजपचा या मतदार संघात शिरकाव झाला. लेले यांनी या मतदार संघाची बांधणी केली. मात्र, काँग्रेसचा प्रभाव तेव्हा लोकांवर असल्याने भाजपला सलग यश मिळाले नाही. १९८५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उल्हास काळोखे यांनी विजय संपादन केला होता. या मतदार संघात १९८५ पासून १९९५ पर्यंतचा दहा वर्षांचा काळ हा कधी काँग्रेस, तर कधी भाजपला यश देणारा राहिला आहे.

दिवंगत खासदार अण्णा जोशी

भाजपने १९९० मध्ये दिवंगत खासदार अण्णा जोशी यांना तिकीट दिले आणि जोशी हे निवडून आले. मात्र, त्यांना फारसा कालावधी मिळाला नाही. त्यानंतर जोशी यांनी लोकसभा निवडणूक लढविली आणि ते खासदार झाले. मात्र, त्यांचा या मतदार संघाशी जवळचा संबंध राहिला. सर्वांशी मैत्री करत त्यांनी या मतदार संघावर मजबूत पकड ठेवली होती. मात्र, १९९१ च्या निवडणुकीत काँग्रेसचे वसंत थोरात हे विजयी झाले होते.

१९९५ पासून बापटांचा कसबा

पुण्याचे खासदार गिरीश बापट हे १९९५ मध्ये पहिल्यांदा या मतदार संघात निवडून आले आणि त्यानंतर कसबा आणि बापट असे समीकरण राहिले आहे. सलग पाचवेळा बापट हे या मतदार संघातून निवडून आले. बापट यांचा समाजातील सर्व स्तरावरील लोकांशी असलेल्या अफाट लोकसंपर्कामुळे कसबा हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे समजले जाऊ लागले. बापट यांचा भाजपबरोबरच अन्य पक्षांतील नेते आणि पदाधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रिपूर्ण संबंधांमुळे भाजपचा या मतदार संघातील पाया भक्कम झाला.

महापालिका निवडणुकीत चिंचवडमध्ये भाजपसमोर आव्हान

नेतृत्त्व बदल

बापट हे खासदार झाल्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक या मतदार संघाच्या दुसऱ्या महिला आमदार झाल्या. बापट खासदार होईपर्यंत पुणे महापालिकेत बापट यांचा शब्द अंतिम मानला जात होता. मात्र, त्यानंतर नेतृत्वात बदल झाला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. बापट यांना शहराच्या दैनंदिन राजकारणापासून बाजूला करण्यात आले. नवीन तरुण नेतृत्व उदयास येऊ लागली आणि त्यानंतर कसब्यावरील भाजपची पकड ढिली होत गेली, परिणामी हा मतदार संघ भाजपने गमवला आहे.