केरळ भाजपामध्ये उपाध्यक्षा शोभा सुरेंद्रन यांना राज्य कोअर कमिटीत स्थान न दिल्याने त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. यावरून केरळ भाजपात सध्या अतंर्गत वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. शोभा सुरेंद्रन सध्या दिल्लीत असून त्यांनी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सोनं तस्करी प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश यांनी सीपीआय नेत्यावर केलेल्या आरोपी चौकशी करावी, अशी मागणीही केली आहे.

हेही वाचा – उत्तर प्रदेशच्या राजकारणात तीन दशके होता दबदबा, पण भाजपाच्या काळात धक्क्यांवर धक्के; आझम खान यांना पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार?

”मी १९९५ पासून भाजपात आहे. यादरम्यान मी विविध पदांवर काम केले आहे. तसेच केरळचा जो भाग डाव्यांचा गढ मानल्या जातो. त्या भागाचं मी नेतृत्त्व केलं आहे. भाजपाची कोअर कमिटी ही केरळमधील नागरिकांच्या हृदयात आहे. त्यामुळे मला त्या कमिटीचे सदस्यपद मिळेल, अशी खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया शोभा सुरेंद्रन यांनी दिली आहे. शोभा सुरेंद्रन या केरळ भाजपा उपाध्यक्षपद होण्यापूर्वी भाजपच्या राज्य सरचिटणीस होत्या. गेल्या ऑक्टोबरमध्ये त्यंना भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वगळण्यात आले होते.

हेही वाचा – Himachal Pradesh Poll: ‘पेन्शन’ योजना आणि ‘अग्निपथ’ ठरणार हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीतले कळीचे मुद्दे, वाचा सविस्तर…

दरम्यान, २१ ऑक्टोबर रोजी एका मल्याळम वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतींमध्ये स्वप्ना सुरेश यांनी राज्याचे माजी अर्थमंत्री थॉमस आयझॅक, कडकमपल्ली सुरेंद्रन आणि माजी विधानसभा अध्यक्ष पी. श्रीरामकृष्णन यांनी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली होती, असा गंभीर आरोप केला होता.

हेही वाचा – “सत्तेत येऊ अन्यथा विरोधी बाकावर, मात्र…” हिमाचल प्रदेश निवडणुकीवर आप पक्षाने भूमिका केली स्पष्ट

या आरोपाबाबत बोलताना, शोभा सुरेंद्रन म्हणाल्या, “सीपीआय(एम) नेते राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्याशी वाद घालून या मुद्यावरून लक्ष घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वप्ना यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयनदेखील या मुद्यावर बोलायला तयार नाहीत” तसेच यासंदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

Story img Loader