रसिका शिंदे

मुंबई : कामगारांसाठी झटणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणजे केतन नाईक. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्षपद सांभाळणारे नाईक २०११ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिवशाही सामाजिक- सांस्कृतिक- क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मालाड येथील कुरार गाव या झोपडपट्टीबहुल भागात कार्यरत असताना रक्तदान शिबीर, रोजगार शिबीर, वस्ती स्वच्छता अभियान आणि कामगार कल्याण क्षेत्रात ते गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. कुरार भागात विविध क्षेत्रांत काम करत पुढे त्यांनी आपला मोर्चा राजकीय क्षेत्राकडे वळवला. २०१३ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत त्यांनी प्रवेश केला. कामगारांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या सर्व मागण्या पुर्ण करून देण्याचा मानस ठेवणाऱ्या केतन नाईक यांनी आजवर कामगारांच्या थकीत पगारासह इतर हक्कदेखील मिळवून दिले आहेत.

sharad pawar marathi news
“केंद्रातील सरकार शेतकरीविरोधी”, शरद पवार यांची शिंदखेड्यातील मेळाव्यात टीका
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Mahayuti, Shinde group leader,
महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता, शिंदे गटाच्या नेत्याचे भाकित
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
minister dharmarao baba atram face double challenge in aheri assembly constituency
कारण राजकारण : मुलीच्या बंडामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासमोर दुहेरी आव्हान !
bjp haryana
हरियाणात भाजपाची वाट बिकट, उमेदवार यादी जाहीर होताच पक्षातील नेत्यांचे राजीनामे; काँग्रेस मारणार बाजी?
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
pm narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागितली जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी खेद व्यक्त करताना म्हणाले…

हेही वाचा… कैलास पाटील : शेतकऱ्यांच्या हितासाठी संघर्ष

हेही वाचा… वंदना भगत : महिलांच्या प्रश्नांसाठी संघर्ष

कामगारांना समान न्याय मिळायलाच हवा या मतावर ठाम होत पुढे त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेनेच्या कार्याध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारत बेस्ट कर्मचाऱ्यांनाही त्यांचे थकीत वेतन अथवा कामाच्या योग्य वेळा, पीएफसारख्या इतर सेवासुविधा मिळवून देण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत आहेत. कामगार कल्याणाचे काम करत असताना मुंबईतील कचरा वाहतूक करणाऱ्या कामगारांसाठी त्यांनी लढा उभारला होता. या कामगारांची जबाबदारी महापालिका प्रशासन घेत नव्हते अशा वेळी या कामगारांना किमान वेतन, पगारवाढ व इतर सेवासुविधा मिळवून दिल्या. या कामगारांना पीपीई किटसह इतर सुरक्षा उपकरणे देण्यासाठी आणि त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी केतन नाईक यांनी रस्त्यावर उतरत मुंबई महानगरपालिका भवनावर मोर्चा काढला होता. नंतर या कामगारांना सुरक्षा उपकरणे, गरम पाणी, औषधोपचार अशा सुविधा मिळाल्या होत्या. बेस्ट उपक्रमात काम करणाऱ्या कामगारांच्या वेतन व इतर समस्यांबाबतही ते कार्यरत असतात.