भाजपाला २०२४ च्या या लोकसभा निवडणुकीमध्ये बहुमत प्राप्त झालेले नाही. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांच्या आधारावर भाजपाने सत्ता स्थापन केली आहे. या १८ व्या लोकसभेचे वैशिष्ट्य म्हणजे विरोधकांची ताकद वाढली आहे. १० वर्षांपासून संसदेमध्ये विरोधी पक्षनेता नव्हता; मात्र आता राहुल गांधींच्या रूपाने संसदेला विरोधी पक्षनेता प्राप्त झाला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये राहुल गांधींनी सत्ताधारी पक्षावर अनेक प्रकारचे आरोप केले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांनी नीट परीक्षा, अग्निपथ योजना, मणिपूरमधील हिंसाचार व भाजपाच्या हुकूमशाही कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. राहुल गांधींच्या वक्तव्यातील काही भाग संसदेच्या नोंदींमधून काढूनही टाकण्यात आला आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये जवळपास अडीच तास भाषण केले. त्यांनी राज्यसभेतही बुधवारी विरोधकांना उत्तर दिले. त्यांनी लोकसभेमध्ये काँग्रेसवर ‘हिंदूविरोधी’ असल्याची टीका केली; तर राज्यसभेमध्ये टीका करताना त्यांनी काँग्रेसला ‘दलितविरोधी’ ठरविले आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्यघटनेला धोका निर्माण केला आहे, या विरोधकांच्या प्रचारालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यघटनेच्या संरक्षणाचा मुद्दा फारच प्रभावी ठरल्याचे दिसून आले. या मुद्द्याचा भाजपाला मोठा फटका बसला आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि इंडिया आघाडीमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला. या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष ‘परजीवी’ होता आणि तो इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या जोरावर निवडणूक लढत होता, असाही दावा त्यांनी केला. पेपरफुटी आणि मणिपूर घटनेवरूनही विरोधकांनी बराच गोंधळ घातला होता. पंतप्रधान मोदींनी या मुद्द्यावरूनही विरोधकांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा : “हिंसाचारावरुन राजकारण करणाऱ्यांना मणिपूरची जनता नाकारेल”; अखेर मणिपूरबाबत मोदींनी केले भाष्य

Nagpur, Narendra Modi, Narendra Modi marathi news,
मोदी विदर्भात येऊन नागपूरला येणे का टाळतात ? लोकसभेनंतर विधानसभा निवणुकीतही प्रचिती
Natikuddin Khatib, Balapur, Nitin Deshmukh,
‘बाळापूर’ दोन्ही शिवसेनेसह वंचितसाठी आव्हानात्मक, लढतीला धार्मिक रंग;…
Sakoli, Nana Patole, Somdutt Karanjkar, teli vote,
साकोलीत पटोले, करंजेकर व ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत, तेली, कुणबींच्या मतांवर विजय अवलंबून
sillod assembly constituency uddhav thackeray campaign for suresh bankar maharashtra assembly elections 2024
ठाकरेंची सत्तारांविरोधात भाजपला साद मतभेद असतील तर बोलू; पण आधी सिल्लोडमध्ये पराभव करण्याचे आवाहन
minister chandrakant patil express claim about bjps vote share increasing in loksatta loksamvad
मतदान वाढेल; फायदा भाजपला ; चंद्रकांत पाटील यांचा दावा
tasgaon kavathe mahankal assembly constituency rohit patil vs sanjay kaka patil maharashtra assembly elections 2024
लक्षवेधी लढत : दोन पाटलांमधील लढतीत कोणाची बाजी?
no alt text set
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
belapur assembly constituency sandeep naik vs manda mhatre maharashtra vidhan sabha election
लक्षवेधी लढत: भाजपच्या आमदार पुत्राचेच पक्षाला आव्हान
indapur assembly constituency harshvardhan patil dattatray bharne pravin mane maharashtra vidhan sabha election 2024
लक्षवेधी लढत: तिरंगी लढतीत हर्षवर्धन पाटलांचा कस!

काँग्रेस हिंदूविरोधी आणि दलितविरोधी

राहुल गांधी यांच्या या भाषणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अत्यंत परिणामकारक पद्धतीने भाजपा आणि आरएसएसला उद्देशून धर्माचा खरा अर्थ विशद करून सांगितला. त्यासाठी आपल्या भाषणामध्ये त्यांनी पुरेसा वेळ घेतला आणि सर्व धर्मांच्या प्रमुखांची छायाचित्रे दाखवून मांडणी केली. राहुल गांधी यांनी धर्मासंबंधी अशी मांडणी पहिल्यांदाच केली आहे, असे नाही. याआधीही त्यांनी भाजपाचा धर्म विखार वाढविणारा असून, तो खरा हिंदू धर्म नसल्याची मांडणी केली आहे. त्यावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर देत काँग्रेसला ‘हिंदूविरोधी’ ठरविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “जी विधाने केली गेली, त्याबद्दल भारतातील लोक त्यांना कधीच माफ करणार नाहीत. हिंदू एक समुदाय म्हणून सहिष्णू आहेत. म्हणूनच आपल्या देशात इतकी विविधता असूनही लोकशाही नांदते आहे. हिंदू हिंसक आहेत, असे वक्तव्य करण्यात आले. ही तुमची मूल्ये आहेत का? देशातील हिंदू समाजाबद्दल असा द्वेष?” नरेंद्र मोदी यांनी या वक्तव्यावरून काँग्रेसला ‘हिंदूविरोधी’ ठरविण्याचा प्रयत्न केला. अगदी राहुल गांधींच्या भाषणावेळीही नरेंद्र मोदींनी उठून संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक ठरविणे ही बाब गंभीर असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर भाजपा धर्माच्या नावावर देशभर हिंसा आणि भयाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप करून “नरेंद्र मोदी म्हणजे हिंदू समाज नाही, भाजपा म्हणजे हिंदू समाज नाही, आरएसएस म्हणजे हिंदू समाज नाही,” असे ठाम प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले होते.

जानेवारी महिन्यामध्ये अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पाडूनही भाजपाला अयोध्येमध्ये (फैजाबाद लोकसभा मतदारसंघ) विजय प्राप्त करता आलेला नाही. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी सत्ताधारी पक्षावर बरेचसे तोंडसुख घेत टोमणेही मारले आहेत. विशेष म्हणजे फैजाबाद लोकसभा मतदारसंघात विजयी ठरलेले समाजवादी पार्टीचे उमेदवार अवधेश प्रसाद यांना पुढील बाकावरच बसवले जाते. या सगळ्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसला हिंदूविरोधी ठरविण्याचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला. दुसऱ्या बाजूला राज्यसभेमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्षनेते आहेत. ते पक्षातील एक प्रमुख दलित चेहरा म्हणून ओळखले जातात. मात्र, राज्यसभेमध्ये बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला ‘दलितविरोधी’ ठरविण्याचाही प्रयत्न केला.

राज्यघटनेच्या संरक्षणाला आणीबाणीच्या मुद्द्याने प्रत्युत्तर

राज्यघटनेच्या संरक्षणाच्या मुद्द्याला आणीबाणीच्या मुद्द्याने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, “ते असे म्हणत होते की, ही पहिलीच अशी निवडणूक आहे, की ज्यामध्ये राज्यघटनेचा मुद्दा प्रमुख ठरला आहे. मात्र, ते १९७७ ची निवडणूक विसरले आहेत का? आणीबाणीनंतर झालेली ही निवडणूकदेखील लोकशाही आणि राज्यघटनेच्या संरक्षणासाठीच लढवली गेली होती. त्यावेळीही मतदारांनी हे दाखवून दिले होते की, लोकशाही त्यांच्या धमन्यांतून वाहते.” इंडिया आघाडीने या मुद्द्यावरून एवढा प्रचार करूनही भाजपाचा फार जागांवर पराभव झाला नाही. “राज्यघटनेच्या संरक्षणाच्या मुद्द्यावरून ही निवडणूक लढवली गेली असली तरीही सत्तेवर येण्यासाठी आम्हीच पात्र आहोत, असे लोकांना वाटले. तुम्ही (काँग्रेस) अनेक पापे केली आहेत. राज्यघटना हा शब्दच तुम्हाला शोभत नाही. काँग्रेस हाच राज्यघटनेचा सर्वांत मोठा शत्रू आहे.” राहुल गांधींनी सरकारी अध्यादेश फाडल्याच्या जुन्या घटनेचा उल्लेखही त्यांनी केला. काँग्रेससाठी गांधी कुटुंब हे राज्यघटनेच्याही वर आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सुस्पष्ट बहुमत मिळाल्याचा मुद्दा अधोरेखित

या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ‘चारसौपार’ जाणार असल्याचा दावा भाजपाने प्रचारामध्ये केला होता; मात्र भाजपाला २४० जागा मिळाल्या आहेत. त्यावरून काँग्रेस आणि विरोधकांनी वारंवार तोंडसुख घेतले आहे. मात्र, यावरही पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्त देत म्हटले की, तिसऱ्यांदा सत्ता प्राप्त करणे ही गोष्ट ऐतिहासिक आहे. स्वातंत्र्यानंतर फक्त दुसऱ्यांदा असे घडले आहे. लोकसभा निवडणुकीबरोबरच ज्या राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली आहे, तिथेही भाजपाला चांगले यश मिळाल्याचा मुद्दा नरेंद्र मोदींनी अधोरेखित केला. त्याआधी राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगढ या तीन राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्येही भाजपाला चांगले यश मिळाले असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. “आता महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड या राज्यांमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. तिथे विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा अधिक मते लोकसभा निवडणुकीमध्ये मिळाली आहेत,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेसला विरोधी बाकांवर बसण्याचा आदेश जनतेने दिला आहे आणि जेव्हा त्यांच्याकडे काहीही तर्क नसतात, तेव्हा ते संसदेत गोंधळ घालतात, असे म्हणत नरेंद्र मोदींनी राहुल गांधींना ‘बालकबुद्धी’ म्हणूनही संबोधले. पंतप्रधान मोदींनी ‘इंडिया’ आघाडीवरही सडकून टीका केली. सध्या इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष काँग्रेसबरोबर आहेत, त्यांना आणीबाणीच्या काळात बरेच काही सहन करावे लागले आहे. “मात्र, याला संधीसाधूपणा, असे म्हणतात. जर त्यांना राज्यघटनेचा आदर असता, तर त्यांनी असे केले नसते,” असेही मोदी म्हणाले.

हेही वाचा : राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?

मणिपूरवरून प्रत्युत्तर

मणिपूरमधील हिंसा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपाने काहीही प्रयत्न केले नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. पंतप्रधान मोदी मणिपूरबाबत साधा ‘ब्र’ही का उच्चारत नाहीत, असा सवाल करणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “शांततेसाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. अगदी केंद्रीय गृहमंत्री तिथे जाऊन राहिलेत. असे यापूर्वीच्या सरकारमध्ये कधीही घडले नव्हते. गृह राज्यमंत्रीही काही आठवडे तिथे राहिले होते आणि यंत्रणांशी सातत्याने संवाद साधत होते. लोकांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. सगळे वरिष्ठ सरकारी अधिकारीदेखील सातत्याने प्रत्यक्ष तेथे जाऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. शांततेसाठीचे सगळे प्रयत्न आम्ही करीत आहोत”, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपले सरकार काय प्रयत्न करीत आहे, याची माहिती देत असतानाच पंतप्रधान मोदींनी काँग्रेस पक्षावर टीका करण्याची संधीही सोडली नाही. १९९३ साली केंद्रामध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना मणिपूरमध्ये झालेल्या गोंधळाचीही आठवण त्यांनी करून दिली. “राजकारण करण्यापेक्षा आपण सर्वांनीच एकत्र येऊन, त्या ठिकाणची परिस्थिती शांत करण्यासाठी योगदान दिले पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे. जे घटक मणिपूरच्या आगीमध्ये तेल ओतण्याचे काम करीत आहेत, त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी हा प्रकार थांबवावा. अशा घटकांना मणिपूर नक्कीच नाकारेल. तशीही वेळ येईल.”