‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तानी संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. तो एप्रिल २०२३ पासून आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात आहे. मात्र, पंजाबमधील खडूर साहिब मतदारसंघातून तो निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.

तुरुंगातून निवडणूक लढविण्याविषयीचे नियम काय आहेत?

लोकप्रतिनिधित्वाचा कायदा १९५१ नुसार, गुन्हा सिद्ध होऊन दोन वर्षे वा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे, अशा व्यक्ती संसदेच्या अथवा विधानमंडळाच्या सदस्य होण्यासाठी अपात्र ठरतात. या कायद्याच्या कलम ८ (३)नुसार, “आधीपासून सदस्य असलेल्या व्यक्तीवर गुन्हा सिद्ध होऊन, दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीची शिक्षा झाल्यास त्या व्यक्तीचे सदस्यत्व तत्काळ रद्द होते. तसेच त्याच्या सुटकेनंतरही सहा वर्षांकरिता ती व्यक्ती अपात्रच राहते.”

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त

मात्र, ज्या व्यक्तींवर अद्याप खटला सुरू आहे, त्यांना निवडणूक लढविण्यापासून हा कायदा परावृत्त करीत नाही. अमृतपाल सिंग याच्यावरील गुन्हा अद्याप सिद्ध झालेला नाही. त्यामुळेच तो लोकसभेची निवडणूक लढवू शकतो. याआधीही अशा प्रकारे अनेकांनी लोकसभेची निवडणूक लढवली आहे.

हेही वाचा : कलम ३७० वर काँग्रेसचे मौन तरीही आम्ही समजून घेतोय; ओमर अब्दुल्लांचं विधान

उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी अमृतपाल सिंगला तुरुंगाबाहेर यावे लागेल?

नाही. निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी संबंधित उमेदवार किंवा अनुमोदकाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर संपूर्ण नामांकन अर्जासह उपस्थित राहावे लागते. फक्त अनुमोदक व्यक्ती त्या मतदारसंघाची मतदार असावी लागते. याचा अर्थ असा आहे की, अमृतपाल सिंगला आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वत: निवडणूक अधिकाऱ्यांसमोर उभे राहण्याची गरज भासणार नाही.

लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यानुसार, अपक्ष उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी १० अनुमोदकांची गरज असते; तर मान्यताप्राप्त राष्ट्रीय अथवा प्रादेशिक पक्षाला फक्त एका अनुमोदकाची गरज असते. मात्र, नामांकन दाखल करताना प्रत्येक उमेदवाराला आपल्यावर दाखल असलेल्या खटल्याचीही माहिती सादर करावी लागते. त्यामध्ये दोन वर्षे किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित कोणत्याही प्रलंबित खटल्यांचा सविस्तर तपशील सादर करावा लागतो.

खडूर साहिब मतदारसंघाचा इतिहास काय आहे?

खडूर साहिब ठिकाणाला शीख धर्मीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्व आहे. या ठिकाणी शिखांच्या आठही गुरूंनी भेट दिल्याचे सांगितले जाते. १९९२ पासून या मतदारसंघामध्ये शिरोमणी अकाली दल (बादल) या पक्षाचाच विजय होत आला होता. मात्र, २०१९ मध्ये पहिल्यांदाच काँग्रेसचे उमेदवार जसबीर सिंग डिम्पा विजयी झाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिरोमणी अकाली दलाने आमदार विरसा सिंग वलतोगा यांना उमेदवारी दिली आहे; तर काँग्रेसने माजी आमदार कुलबीर सिंग झिरा यांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षाकडून माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी गुरींदर सिंग ढिल्लाँ यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

अमृतपाल सिंगला अटक का झाली आहे?

तीस वर्षीय अमृतपाल सिंग हा खलिस्तानसमर्थक असून, ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख आहे. मार्च २०२३ पासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर एप्रिल २०२३ मध्ये अमृतपाल सिंगने पंजाबमधील मोगा जिल्ह्यात आत्मसमर्पण केले. अमृतपाल सिंगवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय खून, अपहरण यांसह अनेक गुन्हे दाखल त्याच्यावर दाखल आहेत. पंजाबातील जल्लूपुर गावातील रहिवासी असलेल्या अमृतपाल सिंगने १२ वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. २०१२ साली अमृतपाल सिंग दुबईला गेला होता. तिथे त्याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय होता. तिथून २०२२ मध्ये भारतात परतल्यावर तो या संघटनेचा प्रमुख झाला. ‘खालसा राज्य’ स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील असलेली ही संघटना अभिनेता दीप सिंधूने सुरू केली आहे.

हेही वाचा : अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी पत्नी सुनीता यांनी केलेला अर्ज फेटाळला? काय आहे नियम?

भिंद्रनवालेशी केली जाते तुलना

अमृतपाल सिंगची तुलना १९८४ साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील कारवाईत मारल्या गेलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्याशी केली जाते. त्याचे कारण अमृतपाल सिंगनेही जर्नेलसिंग भिंद्रनवालेप्रमाणेच वेगळ्या खलिस्तानची मागणी आहे. अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंग याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२३ ला अमृतपाल आपल्या समर्थकांसह तलवारी आणि बंदुका घेऊन लवप्रीत सिंगची सुटका करण्यासाठी अजनाला पोलीस ठाण्यात गेला होता. तेव्हा समर्थकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करीत गोंधळ घातला. त्यात अनेक पोलीस जखमी झाले होते. अखेर दबावाखाली येत पोलिसांनी लवप्रीत सिंगच्या सुटकेचे आश्वासन दिले होते. तेव्हापासून अमृतपाल सिंग पोलिसांच्या रडारवर होता. आता तो अटकेत आहे.